रासायनिक खतापेक्षा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृत, हार्मोनी व कल्पतरूमुळे आल्याचा प्लॉट अनेक पटीने सरस शिवाय खर्च १५ हजार रू. कमी
श्री. बाबाजी विठ्ठल वामन,मु.पो. काळवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे - ४१२ ४१२.
मोबा. ९८६०२२६२४२
आह्मी २५ मे २०१० मध्ये १ - १ एकरचे २ प्लॉट आले लागवड केली होती. एकरी १००० किलो बेणे
वापरले. माहीम जातीचे बेणे जामखेडवरून ४५ रू. किलो दराने आणले होते. या आल्यासाठी ४
फुट रुंदी, १ फुट उंची आणि २०० फुट लांबीचे बेड तयार केले होते. २ बेडमध्ये १ फुटाचे
अंतर ठेऊन ठिबक सिंचनाची सोय केली होती. प्रथम बेड तयार करताना शेणखत आणि कल्पतरू सेंद्रिय
खताचा (एकरी ६ बॅगा) वापर केला. नंतर ३ महिन्यांचा प्लॉट असताना खाणणी करताना ३ बॅगा
कल्पतरू खत वापरले. या प्लॉटला जादा असल्याने पाणी फार कमी गरजेपुरतेच दिले.
या आल्याला २।। महिन्याचा प्लॉट असताना थ्राईवर, क्रॉपशाईनरची एक फवारणी केली. या फवारणीमुळे आणि कल्पतरू खताच्या वापराने आल्याची वाढ अतिशय जोमाने झाल्याची जाणवली. एकाचवेळी १ - १ एकरचे २ प्लॉट आले लावलेला असताना एकाला डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरले, तर दुसरा प्लॉट पुर्णत: रासायनिक औषधे - खतावर घेतला होता. तर रासायनिक औषधे वापरलेल्या प्लॉटपेक्षा डॉ.बावसकर तंत्रज्ञाना वापरलेला प्लॉट १ ते १।। फुट उंच होता. तसेच ५ महिन्याचा हा प्लॉट असताना थ्राईवर, क्रॉपशाईनर, हार्मोनीची फवारणी घेतली होती. या २ फवारण्यांमुळे प्लॉट सुरूवातीपासून शेवटपर्यंत पुर्णपणे निरोगी होता.
दुसऱ्या प्लॉटला रासायनिक औषधांच्या ५ - ६ फवारण्या कराव्या लागूनही प्लॉटच्या वाढीत मोठी ताफावत होती. शिवाय याला उत्पादन खर्च ही १२ ते १५ हजार रू. जादा झाला आहे. बियाण्यासह सुरूवातीपासून ९५ हजार रू. खर्च आला, तर डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरलेल्या प्लॉटला ८० हजार रू. खर्च आला.
दोन्ही प्लॉटची काढणी १ एप्रिलपासून करणार आहे. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी उत्पादन घेतलेल्या प्लॉटचे आले निरोगी आणि उत्तम दर्जाचे असून हे बेणे लागवडीस योग्य असल्याने बेणे म्हणून विकणार आहे. यापासून एकरी १५ टन उत्पादन मिळेल असे वाटते. नवीन लागवडी १५ मे ते ३० मे या काळात होतात. तेव्हा उत्तम दर्जाच्या बेण्यासाठी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा.
रासायनिक औषधांचा वापर केलेल्या प्लॉटपासून १२ टनापर्यंत उत्पन्न निघेल असे वाटते.
सरासरी या दोन एकरातून १० ते १२ लाख रू. उत्पन्न मिळेल, असा अंदाज आहे.