अलिबाग तोंडलीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी फायदेशीर
श्री. सुरेश मानसिंगराव निंबाळकर,
मु.पो. ओझर्डे, ता. वाई, जि. सातारा.
फोन
नं. (०२१६७) २६८३३८
मी गेली ७ - ८ वर्षापासून तोंडली पीक करत असून मागील वर्षी १० गुंठे तोंडल्याची ६'
x ६' वर बांगड्या करून लागवड केली. ३०० बेणे बसले. तोंडल्याला सप्तामृत वापरले. अलिबागची
तोंडली लांब असतात, त्यामुळे भाव जास्त मिळतो. याला धार नसते. पिकायला उशीर लागतो.
तोंडलीला लोखंडी मांडव केला आहे. सप्तामृत व कल्पतरू वापरले. सुरूवातीला दीड महिन्यात
वेल मांडवावर जातो आणि २ महिन्यात तोडा चालू होतो. आठवड्यातून ३ वेळा तोडा करतो. एका
वेळेस १० गुंठ्यातून ४० - ५० किलोचे ३ बाचके (१५० किलो तोंडली) निघतात. विशेष म्हणजे
तोडणी करून काही तोंडली चुकून वेलीवर तशीच राहिली आणि ती दुसऱ्या तोड्याला तोडली तरी
ती कोवळी राहतात.