हळदीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर मर न होता पांढऱ्या मुळीत वाढ, २।। एकरात ७० क्विंटल वाळलेली हळद होण्याचा अंदाज
श्री. विनोद नामदेव विनकरे, मु.पो. ब्राम्हणवाडा, ता. उमरखेड, जि. यवतमाळ,
मो. नं. ९८५०३९७६४६
माझा मुख्य व्यवसाय हा शेती असून माझेकडे एकूण १० एकर मध्यम ते हलक्या प्रतिची जमीन
आहे. गेली १० -१२ वर्षापासून दरवर्षी मी हळदीचे पीक घेतो. यावर्षी आमच्या भागात पाऊस
कमी प्रमाणात असल्याने हळदीचे पीक येईल की नाही असे वाटत होते. अशा परिस्थितीत ठीबकवर
१।। एकर व मोकाट पाण्यावर १ एकर अशी २.५ एकर हळद लावली. यावेळी आमच्या भागातील डॉ.बावसकर
टेक्नॉंलॉजी प्रतिनिधी भेटले. त्यांनी मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीबद्दल माहिती देऊन
तंत्रज्ञाना हळदीसाठी वापरण्यास सांगितले,
मात्र सुरूवातीला मी फारसे लक्ष दिले नाही.
प्रतिनिर्धीनी मला पुन्हा भेटल्यावर एकदा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरून हळदीमध्ये फरक
बधा असे सांगितले. त्यांनतर मग मी सहारा कृषी सेवा केंद्र, ब्राम्हणवाडा येथून डॉ.बावसकर
टेक्नॉंलॉजीचे सप्तामृत आणून फवारले, तर उगवून आलेल्या कोंबाची मर झाली नाही. वाढ होऊन
पानांमध्ये तेज दिसून आले. जर्मिनेटर व प्रिझमचे ड्रेंचिंग केल्याने पांढऱ्या मुळांची
वाढ जोमात झाली. या अनुभवामुळे वेळ न घालवता लगेच पुन्हा सप्तामृत औषधे आणून दुसरी
फवारणी केली. त्याने पानांवर करपा, ठिबके आले नाहीत. थाईवर, क्रॉपशाईनर, हार्मोनीमुळे
पाने निरोगी, सरळ, टवटवीत, हिरवीगार झाली. या अवस्थेत जोराचा पाऊस झाला तरी त्याचा
पिकावर नुकसानकारक परिणाम झला नाही. पुढे राईपनर, न्युट्राटोनची फवारणी केली, त्यामुळे
कंदाचा आकार व वजनात वाढ झाली. नेहमीपेक्षा फण्या मोठ्या दिसू लागल्या. आता सध्या पीक
पुर्णपणे निरोगी असून २।। एकरारून वाळवून ७० क्विंटल हळद होईल असा अंदाज आहे.
पुढील वर्षी मात्र लागवडीपासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे कल्पतरू सेंद्रिय खत व जर्मिनेटर बेणे प्रक्रियापासून ते पुढे काढणीपर्यंत सप्तामृत फवारण्या व जर्मिनेटर ड्रेंचिंगसाठी वापरणार आहे.
पुढील वर्षी मात्र लागवडीपासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे कल्पतरू सेंद्रिय खत व जर्मिनेटर बेणे प्रक्रियापासून ते पुढे काढणीपर्यंत सप्तामृत फवारण्या व जर्मिनेटर ड्रेंचिंगसाठी वापरणार आहे.