डॉ.बावसकर तंत्रज्ञानामुळे कापूस एकरी १६ क्विंटल तर तूर ४ क्विंटल
श्री. विलास नारायणराव श्रीराव, मु.पो. वरूड, ता.वरूड, जि. अमरावती- ४४४९०६.
मो. नं. ९४२१७३८७०३
२ वर्षापुर्वी मी बी. टी. कॉटन हे वाण ५' x १.५' या अंतरावर लागवड केली व त्यामध्ये
तुरीचे १ तास (ओळ) लावले. जमीन मध्यम प्रतीची असून ठिबक पद्धतीने ओलीत असते. यावेळी
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी सागर र. रेवस्कर हे माझ्याकडे येवून त्यांनी डॉ.बावसकर
टेक्नॉंलॉजीची माहिती दिली. त्यांच्या माहिती नुसार जर्मिनेटर, कॉटनथ्राईवर व प्रिझम
हे पहिल्या फवारणीत वापरले व जमिनीतून १०:२६:२६ व कल्पतरू सेंद्रिय खत वापरले असता
१५ दिवसातच रिझल्ट दिसायला लागले. त्यावेळी पांढऱ्या माशीचा सगळीकडे जास्त प्रादुर्भाव
असताना माझ्या प्लॉटमध्ये कपाशीवर अजिबात पांढरी माशी व तुडतुडे नव्हते. तसेच सागर
यांच्या सल्ल्यानुसार ४० दिवसानंतर तिसरी फवारणी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृताची
केली असता कापशीला भरपूर पाती व बोंडे धरली.
चौथी फवारणी ६० दिवसानंतर पाती गळ होऊ नये यासाठी कॉटन थ्राईवर व क्रॉपशाईनर
वापरले. यासर्व फवारण्या केल्यानंतर असे निदर्शनात आले की, बाजुच्या शेतातील कपाशी
लाल्या रोगाने ग्रासली होती व माझी कपाशी लाल्या रोगाने ग्रासली होती व माझी कपाशी
४ फुट उंच वाढून बोंडांच्या संख्येने व त्याच्या
वजनाने कपाशी झाडे वाकली होती. पाने हिरवी करकरीत होती. तेव्हा आजुबाजुचे शेतकरी मला
विचारी, भाऊ काय वापरीत आहे? तेव्हा त्यांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती देऊन कंपनी
प्रतिनीधी रेवसकर यांची भेट घालून दिली. मला मागील वर्षी एकरी १६ ते १७ क्विंटल कापूस
व तूर ४ क्विंटल झाली होती. यावर्षीही तेवढीच होईल अशी खात्री आहे. या पुर्वी मला कापूस
एकरी फक्त ७ ते ८ क्विंटल पिकत होता. मात्र आता डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करीत
असल्यामुळे हा चमत्कार घडत आहे. गेल्या २ वर्षांपासून या तंत्रज्ञानाचा वापर मी करीत
आहे व मला ते चांगले वरदान ठरले आहे. देशभरातील शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान वापरावे
व अनुभवावे. तेव्हाच ते शेतकरी येणाऱ्या संकटावर मात करू शकतील असे मला वाटते.