५ एकरात २ हंगामात डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने कोथिंबीरीचे ५ ते ६ लाख

श्री. विवेक कोलते,
मु.पो. पिसर्वे, ता. पुरंदर, जि. पुणे.
मो. ९६६५९२५०३७



मी मागील ५ - ६ वर्षापासून डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने कोथिंबीर, मेथीचे अतिशय सर्जेदार उत्पादन घेऊन बाजारभावही इतरांच्या तुलनेत दीडपट घेत आहे.

दरवर्षी मी अक्षय्य तृतीयेच्या अगोदर ८ दिवस आणि अक्षय्य तृतीयेनंतर ८ द्विअस धना कितीही पेरतो. या कोथिंबीरीचे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने पैसे हमखास होतात. चवथ भरणीच्या (भरणीनक्षत्र/ पितृपंधरवाडा) आठ दिवस अगोदर आणि चवथ भरणीनंतर ८ दिवस धना टाकला. असता येणाऱ्या कोथिंबीरीस बाजारभाव चांगले राहतात.

५ एकर जमीन काळी कसदार आहे. या जमिनीत अगदोर धना फोकायचा. नंतर काकर पाळी घालायची. नंतर सारे पाडायचे. बी उगवेपर्यंत रात्रीच्या २ ते ३ पाण्याच्या पाळ्या द्यायच्या. नंतर आठवड्याला पाणी देतो.

एकरी ६० किलो धना बी वापरतो. कांद्याच्या बारदाण्यात २५ - ३० किलो धना बॅरलमध्ये १०० लि. पाणी घेऊन त्यामध्ये ५०० मिली जर्मिनेटर टाकतो. अशा द्रावणात कांद्याच्या बारदाण्यातील धना बुडवून यावर दगड ठेवून रात्रभर भिजत ठेवतो. या पद्धतीने जर्मिनेटरची बीजप्रक्रिया करतो. तर इतरांपेक्षा ३ ते ४ दिवस धना लवकर व एकसारखा उगवून येतो. शिवाय पाने लवकर फुटतात. उगवल्यानंतर १२ व्या दिवशी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनरचे प्रत्येकी ४० मिली प्रति पंपास प्रमाण घेऊन पहिली फवारणी करतो. त्यानंतर १० दिवसांनी दुसरी फवारणी वरीलप्रमाणेच घेतो आणि कोथिंबीर काढणीच्या ३ - ४ दिवस अगोदर क्रॉपशाईनर ५० ते ६० मिली प्रति पंपास घेऊन फवारणी करतो.

पहिल्या २ फवारण्यांनी कोथिंबीरीची वाढ फुटवे झपाट्याने होतात. मर अजिबात होत नाही. कोथिंबीर दाट झाली तरी काडी, पाला पावसाळ्यात देखील सडत नाही. पाने हिरवीगार रुंद तयार होतात आणि काढणीच्या अगोदर क्रॉपशाईनरची फवारणी केल्याने कोथिंबीर आदल्या दिवशी काढून दुसऱ्या दिवशीच्या विक्रीस मार्केटला आणली तरी हिरवीगार अगदी तेलातून बुडवून काढल्यासारखी चमकदार दिसते. त्यामुळे बाजारभाव मार्केटमध्ये ५०० - ६०० रू. शेकडा असताना आम्हाला ८०० ते १००० रू. पर्यंत मिळतो.

मी कोथिंबीर पुर्ण वाढ झाल्यानंतर म्हणजे ३८ ते ४० - ४२ दिवसाची होईपर्यंत काढणी करतो. त्यामुळे वाढ चांगली होते. फुले लागण्यापुर्वी काढणी संपवितो. या गड्डी तयार होऊन ४० किलो बियापासून (धन्यापासून) १३ ते १४ हजार गड्डी उत्पादन मिळते.

उत्तम आलेले पीक थकवा घालवते

या तंत्रज्ञानामुळे या कमी कालावधीतील मेथी, कोथिंबीरीपासून एवढे पैसे होतात की कितीही थकवा आला आणि शेतात गेलो तर पिके पाहून मन प्रसन्न होते. सर्व थकवा निघून जातो. पुर्वी मी १ ते २ पंप औषध फवारले तर लगेच कंटाळा येत असे, मात्र आता मी स्वत: एका दिवसात १३ - १४ पंप औषध न थकत फवारतो.

स्वत: लक्ष देऊन स्वत: कष्ट करून डॉ.बावसकर तंत्रज्ञानाच्या आधाराने ४ एकरातून या २ हंगामातील मेथी कोथिंबीरीपासून ५ ते ६ लाख उत्पन्न दरवर्षी घेतो. आमचा कांदा बटाट्याचा पुणे मार्केटला गाळा आहे. तेथे होईल तेवढा व्यापार करून शेतीकडे जास्त लक्ष देतो.

मित्राला १४०० तर मला १४००० गड्डी भाव ६०० रू./ शेकडा असताना आम्हाला १ हजार

मी आणि आमच्या गावातील चंद्रकांत विठ्ठल कोलते यांनी एकाच दुकानातून ४० - ४० किलो धन घेऊन फोकला होता. त्यांनी त्यांच्या पद्धतीने कोथिंबीर घेतली मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने घेतली. दोघांची जमीन शेजारी शेजारीच होती. जमीन एकाच प्रतीची, पाणी एक सारखेच, हंगामही एकच, बियाणे एकच तरीही त्यांना ४० किलो धन्यापासून १४०० गड्डी निघाली. तर आम्हाला १४ हजार गड्डी निघाली. त्यावेळी इतरांना ६०० रू. भाव असताना आम्हाला १००० रू. शेकडा भाव मिळाला.

उन्हाळ्यात कोथिंबीरी क्रॉपशाईनर फवारल्याने वळवाच्या पावसाने झोडपली तरी कोथिंबीर हिरवीगार टवटवीत राहते. इतरांच्या अशावेळी फांद्या, पाने फाटून गळून पडून पुर्ण प्लॉट वाया जातात.