हळदीवर ना रोगराई, ना किडीचा स्पर्श, डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने दिला हर्षच हर्ष !

श्री. संजय फकिरराव वाघमारे, मु.पो. परजना, ता. उमरखेड, जि. यवतमाळ.
मो. ९६२३९४०३८९


माझ्याकडे एकूण ६ एकर जमीन आहे. मी हळद पिकाची नव्याने लागवड करत आहे. त्यामुळे ह्या पिकाबद्दल मला फार काही माहिती नव्हती. तेव्हा मी आमच्या भागातील कंपनी प्रतिनिधी सतीश दवणे (मो.नं. ९४२३६६२६५१) सरांची मदत घेतली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी हळद पिकाची लागवड (२२/०६/२०१६) केली असता सुरवातीला लागवड करते वेळेस एकरी कल्पतरू खत २ बॅग, सिंगल सुपर फॉस्फेट ३ बॅग, निंबोळी पेंड १०० किलो वापरले आणि बेड करून घेतले.

नंतर बिजप्रक्रियासाठी जर्मिनेटर ५०० मिली + हार्मोनी १०० मिली + क्लोरो १०० मिली + ५० लि. पाणी या प्रमाणे घेतले व १० ते १५ मिनिटे बिजप्रक्रिया करून लागवड केली असता माझ्या शेतातील सर्व हळद एकसमान आणि लोकांच्या हळदीच्या ४ दिवस अगोदर निघाली. नंतर ड्रिप मधून एकरी १ लि. जर्मिनेटर + १ लि. प्रिझम सोडले. त्यामुळे पांढऱ्या मुळ्यांची संख्या जास्त निघाली. हळदीची वाढ निरोगी, हिरवीगार दिसत होती. यावर्षी आमच्या भागात हुमणीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होता. मात्र माझ्या शेतात हुमणीचा प्रादुर्भाव झाला नाही. तसेच मर, मुळकुज, कंदकुज ह्या रोगांचा प्रादुर्भाव दिसला नाही. तसेच त्यांनी सांगितल्याप्रमाणे पंचामृतच्या २ फवारण्या व सप्तामृताच्या २ फवारण्या अशा एकूण ४ फवारण्या केल्या व २ वेळा आळवणी केली. त्यामुळे माझ्या शेतातील हळद डिसेंबर महिन्यात सुद्धा करपा, उशीरा येणारा करपा, टिक्का मुक्त होती. त्यामुळे मला यावर्षी साधारण २५ ते २७ क्विंटल वाळलेली हळद होण्याची शक्यता आहे. कारण डिसेंबर महिन्यात १५ तारखेला १ गड्ड्याचे वजन ८५० ग्रॅम झाले आहे. काढणीस अजून २ महिने बाकी आहेत. त्यामुळे मला हळदीचे अपेक्षीत उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे. तसेच मी मासिक वर्गणीदार सुद्धा आहे. त्यातील शेतकऱ्यांच्या यशस्वी यशोगाथा मधून मी हळद पीक घेण्याचे ठरवले होते. यापुढे मी इतर पिकांसाठी देखील डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचाच वापर करणार आहे.