पावसाने पिवळी पडलेली पपई डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीबे दुरुस्त, १ लाख व अजून १८ टन उत्पादन

श्री. सिताराम सखाराम भालेकर,
मु.पो. रामसगाव, ता. घनसावंगी जि. जालना.
मो. ८०८०५१३८१५


मी २ एकरमध्ये तैवान पपईची लागवड ७ x ७ फुटावर २३/१२/२०१५ रोजी केली आहे. या प्लॉटला पाटाने पाणी देतो. जमीन भारी आहे. पपई पीक २ महिन्याचे असताना १९:१९:१९ खताच्या ४ बॅगा व सुपर फॉस्फेट ३ बॅगा असे बांगडी पद्धतीने दिले. तसेच पारंपारिक पद्धतीने रासायनिक औषधांच्या फवारण्या करत होती. पीक ६ - ७ महिन्याचे असताना पावसळ्यात शेतात खूप पाणी साचले. त्यामुळे पपई प्लॉटमधील बरीच झाडे पिवळी पडली. यावर रासायनिक औषधांच्या फवारण्या करत होतो, मात्र पपईवरील पिवळेपणा काही कमी होत नव्हता. मला आमच्या पाहुण्यांकडून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी विषयी माहिती मिळाली. त्यानुसार कंपनी प्रतिनिधी श्री. गणेश कसाब (मो. नं. ७७९८६१०६५०) यांना सविस्तर माहितीसाठी भेटलो. त्यांना प्लॉटवर बोलावून प्रत्यक्ष पीक परिस्थिती दाखविली. त्यांनी मला जर्मिनेटर १ लि. + प्रिझम १ लि. + बुरशीनाशक ३०० ग्रॅम या सर्वांचे २०० लि. पाण्यातून ड्रेंचिंग (आळवणी) करण्यास सांगितले व त्याप्रमाणे मी औषधे वापरली. ड्रेंचिंगनंतर ३ - ४ दिवसातच पानांचा पिवळेपणा कमी होऊन नवीन फुट निघू लागली. तसेच पिवळेपणामुळे जी फुलगळ होत होती ती थांबली. त्यानंतर सप्तामृत औषधांच्या नियमीत फवारण्या करू लागलो. त्यामुळे झाडावर फळांची संख्या वाढून पोषणही चांगल्याप्रकारे झाल्याने उत्पादनात वाढ झाली. मला आजपर्यंत १ लाख रु. चे उत्पन्न मिळाले असून ९०० झाडांवर अजून प्रत्येकी २० किलो माल म्हणजे अजून १८ टन उत्पादन निघेल. ती पोसण्यासाठी डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा वापर चालू आहे.