जर्मिनेटर

जर्मिनेटरचे फायदे

 • जर्मिनेटरमुळे बियांची उगवण पूर्ण व लवकर होते. मृदजन्य व बीजजन्य रोग प्रतिबंधक व प्रभावी.
 • आले व हळदीचे कंदाची लवकर, निरोगी आणि १०० % उगवण होते. आले व हळद पुढे 'लागत' नाही.
 • केळीचे मुनवे, कांदा गोट, लसून बेणे तसेच गुलछडी, लिली, ग्लॅडिओलसचे कंद व्यवस्थित उगवतात.
 • कांद्याचे जुने व न उगवणारे बी जर्मिनेटरच्या प्रक्रियेने उगवते.
 • जर्मिनेटरमुळे उत्तम उगवण झाल्याने दर्जेदार महागड्या संकरित बियांची (तैवान पपई, कलिंगड, खरबुज, झेंडू) बचत होऊन, रोपे चांगली जगून उत्पन्नात वाढ झाल्याचा अनुभव हजारो शेतकर्‍यांनी घेतला आहे.
 • रोपे जर्मिनेटरमध्ये संपूर्ण बुडवून लावल्यास जोरदार वाढतात. नांग्या पडत नाहीत व जारवा चांगला निघतो.
 • जर्मिनेटरमुळे पाण्याचा ताण रोपे सहन करू शकतात, आंबवणी-चिंबवणी उशिरा केली तरी चालते.
 • बहर धरणे, खोडवा घेण्यासाठी उपयुक्त.
 • बिजोत्पादनासाठी हमखास उपयोगी.
 • उसाचे बेणे जर्मिनेटरमध्ये संपूर्ण बुडवून लावल्यास उगवण पूर्ण होते व फुटवे चांगले फुटतात.
 • द्राक्षाचे एप्रिल, ऑक्टोबर छाटणीच्यावेळी फवारणीस उपयोगी, डोळे एकसारखे फुटतात. काडी, फूट जोमदार वाढण्यासाठी. फुलोरा निघाल्यावर फवारणी व घडांचे डिपींगसाठी, बेदाणा निर्मितीस अप्रतिम.
 • सप्तामृत (थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट, प्रिझम, न्युट्राटोन, हार्मोनी) बरोबर जर्मिनेटर फवारल्यास मर, मुळकुजव्या, करकोचा गळ (Collar Rot) यावर प्रतिबंधक होतो.
 • ढगाळ वातावरण, कडक ऊन असले तरी मेथी, कोथिंबीर, कोबी, पालेभाजी व इतर पिकात मर होत नाही किंवा पाने पिवळी पडत नाहीत.
 • नर्सरी, वनशेती रोपे, कलमे याकरिता हमखास फायदेशीर.
 • जर्मिनेटरमुळे द्दिदल शेंगवर्गीय (Leguminous) पिकांच्या मुळावर नत्रस्थिरीकरणाच्या गाठीत प्रचंड, अपरिमित वाढ होते. त्यामुळे जैविक नत्र पिकास मिळून रासायनिक खतात बचत, खर्च, दुष्परिणामापासून मुक्तता व पहिल्या खताच्या मात्रेत (Basal Dose) १०० % बचत.
जर्मिनेटर वापरण्याचे प्रमाण

बीज प्रक्रियेसाठी: सर्व प्रकारच्या बियांसाठी १ किलो बी + २० ते २५ मिली जर्मिनेटर + १ लि. पाणी या प्रमाणात ६ ते ७ तास भिजवून सावलीत वाळवावे व नंतर लावावे. कठीण कवचाचे बी तसेच थंडी असल्यास गरम पाणी वापरावे व त्यात रात्रभर 'बी' भिजवावे.

रोपांसाठी : १० लि. पाणी + ५० ते १०० मिली जर्मिनेटर या द्रावणामध्ये रोपे संपूर्णपणे बुडवून, उपसून मग लावावीत.