डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी व कल्पतरू वापरून शाश्वत सेंद्रिय शेती

श्री. पवार रामराव रेशमाजी, मु. सायाळ, पो. कोरेगाव, ता. लोहा, जि. नांदेड.


हळदीला डॉ.बावसकर तंत्रज्ञान व कल्पतरू वापरून अधिक व दर्जेदार उत्पादन घेतले. पीक कोणतेही असो सेंद्रिय शेतीमध्ये पंचामृत व कल्पतरू वापरून हमखास अधिक व दर्जेदार उत्पादन घेता येते. हा माझा स्वत: चा अनुभव आहे. शेवग्यातील या रामेश्वरी जातीच्या हळदीचे १,१०,००० रू. झाले. ओली हळद (बारके कंद) १००० रू. क्विंटल दराने विकली गेली. हे सर्व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी व कल्पतरूमुळे शक्य झाले. सेंद्रिय खतावरील शेवगा, मोसंबीचे प्लॉट पाहून राज्यपालांच्या हस्ते माझा सत्कार करण्यात आला. त्यावेळीचे कृषिमंत्री मा. रणजित देशमुख यांनी भेट देऊन प्रशंसा केली.