हरळीचा नाश कमी खर्चात कसा कराल?

तुरखाट्याचा अजून एक नाविन्यपूर्ण उपयोग असा की, शेतातून तूर काढल्यानंतर या तुरखाट्या हरळीच्या शेतामध्ये अंथरून घ्याव्यात. एक महिन्याचे अंतराने दोन पाणी भरगच्च द्यावे. जेणेकरून अंथरलेल्या तुरखाट्या ह्या पाण्यामध्ये चार बोटे बारे तोडल्यानंतर १५ मिनिटे रानामध्ये राहिले पाहिजे. म्हणजे आमचे लक्षात असे आले की, हा प्रयोग केल्यानंतर साधारण ३ ते ४ महिन्यात तुरखाट्यातील तुरट अंशामुळे हरळीचा नाश होतो. वरील सर्व बाबींचे व्यवस्थित नियोजन केले असता तुरीच्या उत्पादनात वाढ होऊन भरमसाठ किमतीने तूर आयात करण्याची गरज राहणार नाही. त्याचबरोबर तुरीचे आहारातील महत्त्व व उपयोग लक्षात घेतल्यास चोरटी निर्यात करण्याचीही गरज राहणार नाही व कोणत्याही विषारी तणनाशकाचा हरळीचा उपद्रव कमी करण्यासाठी जमीन व पिकांवर वाईट परिणाम न होता, न करता तुरखाट्याचा विशिष्ट पद्धतीने वापर केल्याने हरळीचा साध्या, सोप्या पद्धतीने कमी खर्चिक, पर्यावरण समृद्ध करून नाश करता येईल. याचे प्रयोग देशाच्या अनेक भागात करणे गरजेचे आहे व तसा पाठपुरावा करण्यासाठी आमच्याकडे सविस्तर कळवावे.

Related Articles