डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या डिपींगमुळे कलर, चमक व फुगवण उत्तम होऊन सनबर्न नाही

श्री. राजाराम रामचंद्र जाधव,
मु. पो. सोनजाब, ता. दिंडोरी, जि. नाशिक.
मोबा. ८३०८९७३४५०


मी राजाराम चंद्रभान जाधव, रा. सोनजाब येथे ४ एकर द्राक्ष बागे आहे.

मागील वर्षी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी शिंदे यांची भेत झाली. त्यावेळी मी डिपींग करत होतो. त्यावेळी शिंदे यांनी राईपनर व न्युट्राटोन डिपींगमध्ये घेण्यास सांगितले. त्याने कलर चमक फुगवण चांगली होईल असे सांगितले. मला नवीन प्रयोग करण्यास आवडतात. शिंदेच्या सल्ल्यानुसार काही झाडांचे घड राईपनर ५ मिली + न्युट्राटोन ५ मिली १ लि. साठी प्रमाण घेऊन डिप केले. कालांतराने माझ्या असे निदर्शनास आले की, ज्या घडांवर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर केला त्यांचा कलर चमक फुगवण व विशेष म्हणजे ज्या घडांवर हे तंत्रज्ञान वापरलेले नव्हते त्यापेक्षा हे घड एकसारखे काळे व टपोरे दिसून आले. त्यावेळी डॉ.बावसकर तंत्रज्ञानावर माझा विश्वास अधिक बसला व चालू वर्षी पुर्ण काळी सोनाकाला डिपींगमध्ये क्रॉंपशाईनर, राईपनर,न्युट्राटोन प्रत्येकी ५ मिली / १ लि. साठी घेतले.

परिणामी कलर, चमक फुगवण तर मिळालीच पण विशेष म्हणजे डिपमध्ये क्रॉंपशाईनर वापरल्यामुळे शोधून सुद्धा सनबर्न कुठेही दिसला नाही. इतर माझ्याबरोबरच्या द्राक्ष बागेमध्ये सनबर्न आहे आणि अजून तीन फवारण्या राईपनर +न्युट्राटोन + क्रॉंपशाईनरच्या घेणार आहे. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी किमया मी स्वत: च्या प्रयोगातून अनुभवली.