२० गुंठे झेंडूपासून ३४ हजार रू. निव्वळ नफा
श्री. सागर हिरामण जाधव, मु. परसुल, पो. भाटगाव, ता. चांदवड, जि. नाशिक.
मोबा. ९८८१०८०८७४
मी २० गुंठे मध्यम प्रतीच्या जमिनीत इंन्डसच डिप ऑरेज झेंडूची लागवड जूनच्या पहिल्या
पंधरवाड्यात केली. लागवड केल्यानंतर १५ ते २० दिवसांनी प्लॉटमध्ये गेलो होतो. तर वाढ,
फुटवा नव्हता व भरपूर प्रमाणात करपा होता. त्यानंतर इतर रासायनिक औषधे फवारणी पण करपा आटोक्यात
येत नव्हता. प्लॉट रोगट दिसत होतो. तेव्हा चांदवड येथील संतोष अॅग्रो एजन्सीमध्ये डॉ.बावसकर
टेक्नॉंलॉजीच्या औषधाकडे नजर गेली. त्यांना त्याविषयी विचारले. त्यांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी
कंपनीचे प्रतिनिधी श्री. शिंदे यांच्याशी संपर्क करून दिला. त्यांनी मला जर्मिनेटर
६० मिली + थ्राईवर ६० मिली + क्रॉंपशाईनर ६० मिली + प्रिझम ४० मिली + हर्मिनी २५ मिली
अशी १५ लिटरसाठी फवारणी घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे फवारणी घेतली. परिणामी करपा
पुर्ण नाहिसा होऊन फुलकळी भरपूर निघाली. पुर्णपणे रोगट प्लॉट सरस झाला. (संदर्भ - कव्हरवरील
फोटो) २० गुंठे क्षेत्रात खर्च वजा जाता ३४,००० / - रू. निव्वळ नफा झाला. तो पण भाव
कमी असताना. २० ते २५ रू. किलो प्रमाणे फुले विकली. विश्वास वाटत नव्हता, इतका सरस
प्लॉट झाला. येणारे जाणारे लोक प्लॉटकडे बघत रहात. इतका सरस प्लॉट डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या
फवारणीने झाला. खरच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीला मी धन्यवाद देतो.