सागाची लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


teakwood tree सागवानाचे गुणधर्म : सागाचे विशेष गुणधर्मामुळे चंदनानंतर सागाचे लाकूड मुल्यवान आहे. हे लाकूड अतिशय टिकाऊ आहे. वाळवी, बुरशी व हवामानाचा या लाकडावर परिणाम होत नाही. हे लाकूड दुभागत नाही. भेगा पडत नाहीत. लाकडावर काहीही परिणाम होत नाही. अनेक कामांसाठी या लाकडाचा उपयोग होतो. अनेक शतके या लाकडाचा उपयोग जहाजाचे बांधकामात होतो.

सागाच्या झाडाचे औषधी गुणधर्म आहेत. फुलांचा उपयोग पित्त, ब्रांकायटीस व लघवीचे विकारावर होतो. बियामुळे लघवी साफ होते. पानातील अर्कामुळे क्षयरोगाचे सूक्ष्म जंतू वाढण्यास प्रतिबंध होतो. पानापासून लाल किंवा पिवळा रंग मिळतो. त्याचा उपयोग सुती, रेशीम व लोकरीचे कापड रंगविण्यासाठी होतो. सागाची पाने फार मोठी असल्याने त्यापासून पत्रावळ्या व द्रोण बनविता येतात. शिवाय या पानापासून भाताचे शेतात काम करणारे मजूर पावसापासून स्वसंरक्षणासाठी 'इरले' तयार करतात. झोपडी साकारण्यासाठी या पानांचा उपयोग होतो. सालीची औषधी उपयोग ब्रान्कायटीसमध्ये होतो. सालीपासून ऑक्झालीक अॅसिड वेगळे काढतात. लाकडाच्या भुशापासून प्रभावित कोळसा बनवितात.

teakwood tree हवामान : सागाच्या झाडांच्या वाढीसाठी तेजस्वी सूर्यप्रकाश आवश्यक असतो. या झाडांना पाणथळ जमीन सहन होत नाही किंवा जमिनीतील क्षारांचे जास्त प्रमाण मानवत नाही. वार्षिक १००० ते १५०० मि. मी. पर्जन्यमानाचे प्रदेशात दक्षिणेतील उष्ण, दमट पानझडीचे जंगलात वाढतात. या झाडांना जून ते ऑगस्ट महिन्यात फुले लागतात, तेव्हा हि झाडे सुंदर दिसतात. नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यांत या झाडांची पाने गळतात. तेव्हा जंगलातील जमिनीवर वाळलेल्या पानांचा दाट थर जमलेला असतो. पावसाळ्यात ही पाने कुजून झाडांना नैसर्गिक खत मिळते. पानांमुळे पावसाने जमिनीची धूप होण्यास प्रतिबंध होतो. दमट प्रदेशात फार कमी होते. तर निमकोरड्या प्रदेशात ती पुरेशी होते.

teakwood tree जमीन : सागाच्या झाडाच्या वाढीसाठी जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ उत्तम असतो. जमिनीचा सामू ६ पेक्षा कमी असलेल्या जमिनीत ही झाडे दिसत नाहीत. तसेच सामू ८.५ पेक्षा अधिक असलेल्या जमिनीत या झाडांची वाढ चांगली होत नाही. या झाडांना विशेषत : जांभया खडकाची जमीन मानवत नाही. या जमिनीतील सागाची झाडे खुरटी राहतात. पण इतर खडकाच्या जमिनीत जांभ्या खडकाची जमीन मिसळलेली असल्यास ही झाडे वाढतात. तसेच या झाडांना कापसाची काळी जमीन मानवत नाही. चुन्याच्या खडकाचे खोल पोयटा जमिनीत रूपांतर झालेले असल्यास ही झाडे जमिनीत चांगली वाढतात. तथापि, चुन्याच्या टणक खडकातील उथळ जमिनीत या झाडांची वाढ कमी होते. झाडांची चांगली वाढ जमिनीची खोली, जमिनीतील ओलावा, पाण्याचा निचर व सुपिकता यावर अवलंबून असते. ही झाडे मऊ वाळूच्या खडकात ते पोयट्याच्या जमिनीत चांगली वाढतात.

teakwood tree लागवडीच्या पद्धती :

१) बियांची पेरणी : मध्य प्रदेशचे काही भागात व उत्तर महाराष्ट्रात शेतातील खड्ड्यात सागाचे बी पेरतात. एका खड्ड्यात २ किंवा ३ बिया टोकतात. पण या पद्धतीत सागाची बारीक रूपे मरतात व अनेक ठिकाणी गॅप (तुटाळ) पडतात.

२) रोपांची / कलमांची लागवड : महाराष्ट्र, मध्य प्रदेशात काही भाग व ओरिसातिल शेतात सागाची रोपे लावतात. सागाची रोपे रानात (टोपलीत) तयार करतात किंवा नर्सरीतून आणतात. ही रोपे ३ - ४ महिने वयाची आणि ३० सें. मी. उंच वाढलेली शेतात लागवडीसाठी योग्य होतात.

३) खोड स्टम्पांची लागवड : नर्सरीतील एक वर्ष वयाचे जोमदार व निरोगी रोपापासून स्टम्प तयार करतात. याकरिता योग्य नसलेली रोपे वाफ्यात जागीच वाढू देतात. पुढील वर्षी या रोपापासून स्टम्प तयार करतात. लागवडीसाठी निवडलेल्या स्टम्पच्या मुळ्या सरळ असाव्यात. दुभागलेल्या नसाव्यात. सिंचनाकरिता पाणी उपलब्ध असल्यास १५ महिन्याच्या रोपापासून स्टम्प तयार करता येतात. जेथे नर्सरीची सोय नाही अशा भागात असे दोन वर्षच्या रोपापासून स्टम्प तयार करावे लागतात.

teakwood tree सागाचे रोपातील/ कलमातील अंतर : सागाच्या झाडातील अंतर अनेक बाबींवर अवलंबून असते. सागाच्या शुद्ध बियांची प्रत उत्तम असल्यास आणि जमीन हलकी असल्यास झाडातील अंतर कमी ठेवावे. तथापि, उत्कृष्ट प्रतीचे लाकूड मिळण्यासाठी सागाच्या दोन ओळींतील अंतर ४ मीटर आणि दोन झाडांतील अंतर २ मीटर ठेवावे. म्हणजे एक हेक्टर जमिनीत १२५० सागाची झाडे लागवड करता येतात. सामान्यपणे सुरुवातीला सागाच्या शेतातील रोपातील १.८ x १.८ मीटर अंतर योग्य मानतात. प्रयोगात ३.६ मीटर x २.७ मीटर आणि ३.६ मीटर x ३.६ मीटर या अंतरावर लागवड केल्याचे आढळून आले आहे. जास्त व मध्यम पावसाच्या (१५०० मि. मी. पेक्षा अधिक) प्रदेशात रोपातील अंतर २.५ x २.५ किंवा २.७ x २.७ मीटर ठेवल्याने वाढ जलद होते आणि झाडाचा मुकुट लवकर तयार होतो.

teakwood tree रोपांस जर्मिनेटर चा वापर : रोपांची लागवडीनंतर मर होऊ नये म्हणून लागवडीच्यावेळी १० लि. पाण्यास ५० मिली जर्मिनेटर + ५० ग्रॅम प्रोटेक्टंट याप्रमाणे द्रावण तयार करून प्रत्येक रोपाच्या पिशवीत ५० मिली द्रावण ओतून ते त्या पिशवीत अर्धा तास मुरू द्यावे. नंतर रोपांची लागवड खड्डयामध्ये करावी किंवा रोपांची लागवड केल्यानात्णार वरील प्रमाणातील ५० ते १०० मिली द्रावण रोपावरून मुळापर्यंत जाईल अशा रितीने ड्रेंचिंग (आळवणी) करावे.

खते : रोप लागवडीच्या वेळी खड्ड्यात १० ते १५ किलो पुर्ण कुजलेले शेणखत, पाला पाचोळा, २०० ते २५० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, २५० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे. नंतर दुसरा हप्ता पावसाळा संपण्यापुर्वी - पावसाळयाच्या शेवटी कल्पतरू सेंद्रिय खत २५० ग्रॅम आणि सुखं अन्नद्रव्याचा द्यावा. त्यानंतर दरवर्षी पावसाला सुरू झाल्यावर पहिला पाऊस पडल्यानंतर कल्पतरू सेंद्रिय खत ५०० ग्रॅम ते ५ वर्षानंतरच्या झाडास १ किलो खोडाभोवती गाडून द्यावे. बागायती क्षेत्रामध्ये या मात्रेत दीड पट वाढ करून खत द्यावे आणि आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. सागाच्या झाडाच्या मुळ्या उथळ असल्याने जमिनीच्या पृष्ठभागाजवळ ओलावा असावा लागतो. उथळ जमिनीत ओलावा कमी असल्याने ही झाडे खुरटी राहतात. त्यामुळे टेकड्यांपेक्षा दरीत सागाच्या झाडांची वाढ चांगली होते. कारण तेथे झाडांच्या वाढीवर विपरित परिणाम होतो. चांगल्या जमिनीत हवेच्या अभिसरणामुळे सागाची झाडे चांगली वाढतात. कारण मुळ्यांना भरपूर प्राणवायू मिळतो.

कॅल्शियम : सागाच्या झाडाच्या वाढीसाठी कॅल्शियम अत्यावश्यक असतो. जमिनीत पुरेशा प्रमाणात कॅल्शियम उपलब्ध असल्यास झाडांची वाढ चांगली होते.

नत्र : सागाच्या झाडांना नत्र अत्यावश्यक असतो. जमिनीचे पृष्ठभागात ०.१३ ते ०.७० टक्के नत्र असतो. १०० सें. मी. खोली पर्यंत नत्राचे प्रमाण कमी होत जाते. नत्रामुळे सागाच्या झाडाची उंची वाढते.

स्फुरद : जमिनीत पुरेशा प्रमाणात स्फुरद उपलब्ध असल्यास सागाच्या झाडांची वाढ चांगली होते. ज्या जमिनीत ०.०२२ ते ०.१०८ % स्फुरद असतो. त्या जमिनीत सागाची पूर्ण वाढ चांगली होते. जमिनीतील स्फुरदच्या अभावाला ही झाडे संवेदनशील असतात.

पालाश : काही जमिनीत पालाशचे प्रमाण ०.५४ ते १.८० टक्के पृष्ठभागात असते. उपथरात पालाशचे प्रमाण ०.४० ते १.३ टक्के असते.

फवारणी : झाडांची रोगप्रतिकार शक्ती वाढून वाढ जोमाने होण्यासाठी तसेच बुंद्याची जाडी वाढीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर पुढीलप्रमाणे करावा.

१) पहिली फवारणी : (लागवडीनंतर १५ ते २१ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १५ ० मिली. + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (लागवडीनंतर १॥ महिन्यांनी ) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + न्युट्राटोन २५० मिली + हार्मोनी २५० मिली. + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (लागवडीनंतर २॥ महिन्यांनी ) : जर्मिनेटर ७५० मिली.+ थ्राईवर ७५० मिली.+ क्रॉंपशाईनर ७५० मिली. + राईपनर ५०० मिली + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली + हार्मोनी ३०० मिली. + २०० लि.पाणी.

४ ) चौथी फवारणी : (लागवडीनंतर ३॥ ते ४ महिन्यांनी ) : जर्मिनेटर १ लि. + थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम + प्रिझम ७५० मिली. + न्युट्राटोन ७५० मिली + हार्मोनी ४०० मिली. + २५० लि.पाणी.

teakwood tree सागावरील किडी :

अ) नर्सरीतील रोपावरील किडी :

१) हुमणी : अळ्या जमिनीत राहून सागाच्या रोपांच्या मुळ्या खातात. जून महिन्यात अकाली पडलेल्या पावसाने जमीन भिजली की, प्रौढ भुंगे जमिनीतून निधून रात्री झाडावर बसतात. झाडाची पाने खातात. मादी भुंगे वाळूच्या सैल जमिनीत अंडी घालतात. ती जमिनीत ८ ते ३० सें. मी. खोल राहते. अर्धवट कुजलेली पाने व मुळ्या खाते. पूर्ण वाढलेली अळी सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात कोषावस्थेत राहते. भुंगे जून महिन्यात पावसाला सुरू होईपर्यंत जमिनीत लपून राहतात. एका वर्षात या किडीची एकच पिढी जन्मते. हुमणीच्या अळ्या महाराष्ट्र व मध्यप्रदेशमधील नर्सरीतील सागाच्या ८० टक्के रोपांचे नुसासन करतात.

२) क्रिकेट : हे काळसर तपकिरी किडे सुमारे ५० मि. मी. लांब असतात. त्यांना लांब मिशा (अॅन्टेना) असतात. जमिनीत खोल बिळात राहतात. सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यात या बिळात ते अंडी घालतात. मे - जून महिन्यात पिले प्रौढ होतात आणि बिळातच राहतात रात्री बिळाबाहेर येऊन कोवळी सागाची रोपे खातात. शिवाय पिले व प्रौढ किडे रोपांच्या जमिनीतील मुळ्य खातात.

३ ) वाळवी : नर्सरीतील रोपांचे वाळवीपासून नुकसान होते. वाळवी मुळ्या व साल खाते. शिवाय सोटमुळात शिरल्याने रोपे मरतात. चाळवीच्या काही प्रजाती मोठ्या झाडांचेही नुकसान करतात.

नियंत्रणाचे उपाय : जमिनीत राहणाऱ्या किडींचे नियंत्रण अवधड व खर्चाचे असते. दर हेक्टरी एक किलो ग्रॅम कर्बोफ्युरान (३ जी) दाणेदार जमिनीतील चरात टाकावे. एक किलोग्रॅम बियांना २.५ मि.लि. क्लोरोपायरीफॉस पेरणीपूर्वी लावल्याने हुमणीपासून नुकसान कमी होते . हुमणीचे भुंगे रात्री कडुनिंबाचे झाडावर बसलेले असतात. तेव्हा संध्याकाळी या झाडावर कीडनाशकाची फवारणी करावी. एक लिटर पाण्यात २ ग्रॅम कार्बारील मिसळून जून ते मध्ये जुलैपर्यंत ३ - ४ वेळा फवारणी करावी. लहान झाडामधील मोकळ्या जागेत खोल नांगरणी करून जमिनीतील अळ्या उन्हात उघड्या पाडाव्या, म्हणजे पक्षी हुमणीच्या अळ्या आवडीने खातात. क्रिकेट व वाळवीचे नियंत्रण दाणेदार कार्बोफ्युरान जमिनीत मिसळल्याने होते. (हुमणीच्या जैविक नियंत्रणासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी कृषी मार्गदर्शिका पण नं. १३, १४ पहावे)

ब) झाडाची पाने खाणारी कीड :

१) गवती टोळ : नर्सरीतील रोपांची पाने व फांद्या गवती टोळ आधाशीपणाने खातात. या किडीला ठीपाक्याचे टोळ (लोकस्ट) असेही म्हणतात. ही कीड दमट (केरळ) प्रदेशात आढळते. एक वर्षात एक पिढी जन्मते. मादी ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात जमिनीत अंडी घालते. प्रौढ किडी ५ महिने जगतात. सागाची पाने आवडीने खातात. एका सागाचे पानावर सुमारे २० ते ३० किडी आढळल्या आहेत. या किडीमुळे झाडांच्या फांद्या खाली वाकतात.

२) पाने खाणाऱ्या अळ्या : तेजस्वी पिवळ्या रंगाचे पतंग दिवसा सावलीत लपलेले असतात. रात्री अंडी घालण्यासाठी लांब अंतरावर उडून जातात. मादी कोवळ्या सागाच्या पानाच्या खालील बाजूला हिरवट रंगाची अंडी घालते. प्रौढ अळी फिकट हिरव्या ते पिवळ्या रंगाची, २२ ते २५ मि. मी. लांब असते. ही अळी पानाच्या शिरामधील मऊ हिरवा भाग खाते. पानातील उघड्या शिरा शिल्लक राहतात. या अळीला स्पर्श केला की, ती वळवळ करीत रेशमी धागा पकडून पानावरून खाली पडते. महाराष्ट्रात सागाच्या झाडावर या अळ्यांनी जास्त संख्या मे - जून महिन्यात आणि मध्ये प्रदेशात सप्टेंबर महिन्यापासून असते. मोठ्या पट्ट्यात सागाचे झाडावरील पाने अळ्यांनी खाल्लेली असतात. त्यामुळे झाडाच्या फांद्या वाळतात. नवीन झाडे मरतात. मिश्र जंगलापेक्षा शुद्ध सागाचे जंगलाचे या किडीमुळे जास्त नुकसान होते. प्रकाश सापळ्याच्या सहाय्याने या किडीचे सागाच्या झाडावरील अस्तित्व समजते.

३ ) प्रोडेनिया लिटुरा : ही कीड शेतातील पिकावर, बागेतील झाडावर आणि जंगलातील सागाचे झाडावर आढळते. अळ्यांना जुनी पाने आवडतात. एका वर्षात या किडीच्या ५ पिढ्या जन्मतात. एक मादी ५०० अंडी देते. तरूण अळ्या पाने खाण्यात अधाशी असतात. शिरासह संपूर्ण पान खातात. अळी अवस्था ३ आठवडे असते.

४) पाने खाणारे भुंगे : १५ प्रजातीचे भुंगे सागाच्या झाडाची पाने खातात. हे भुंगे पावसात थव्याने सागाचे झाडावर येतात आणि रात्री झाडाची पाने खातात.

५) खोडकिडा : दक्षिण भारतात ही कीड जिवंत, रोगट, अयोग्य पद्धतीने छाटलेल्या किंवा नुकसान झालेल्या सागाचे खोड पोखरते. मादी झाडाच्या जखमेत अंडी घालते. अळी तेजस्वी लाल रंगाची असते. ती झाडात अनियमित बोगदे करते. वसंत ऋतूत या किडीचा पतंग दिसतो. सागाच्या निरोगी झाडांना या किडीपासून अपाय होत नाही.

६) इंडरवेला : या किडीच्या अळ्या सागाच्या झाडाची साल खातात. संत्र्याच्या फळझाडाचेही ही कीड नुकसान करते. अळ्यांचे दिर्धायुष्य जून ते एप्रिलपर्यंत असते. पतंग मे ते जुलै महिन्यात उडत असतो. अळी खोडातील बोगद्यात राहते आणि रात्री बोगद्यातून बाहेर येऊन खोडावरील साल खाते. इजा झालेली साल रेशीम धाग्याचे चटईखाली असते. त्यात सालीचे तुकडे व अळीची विष्ठा असते.

सागावरील रोग :

अ) मुळ्यांचे रोग :

१) मर रोग (विल्ट) : स्युडोमोनास या सूक्ष्म जंतुमुळे हा रोग होतो. लहान पट्ट्यातील सागाचे झाडांना या रोगाची बाधा होते. झाडाची पाने करपल्यासारखी दिसतात. रोगाची बाधा झालेले झाड मरते. कधीकधी झाडावरील तरून पाने सुकलेली असतात. त्यानंतर संपूर्ण झाड पिवळे दिसते.

उपाय : नर्सरीतील जमिनीचे निर्जंतुकीकरण (Sterilization) करावे. म्हणजे या रोगाचे नियंत्रण होते. याशिवाय निंदणी व आंतरशागत करावी. ज्या जमिनीत सतत रोगाची रोपांना बाधा होते तेथे नर्सरी न करता जागा बदलावी.

२) मूळ कुज (रूट रॉट) रोग: सागाचे झाडाची छाटणी केल्यानंतर किंवा विरळणी केल्यानंतर सागाच्या स्टम्पला या रोगाची बाधा होते. स्टम्पवरून या रोगाचा प्रसार मुळ्यावर होतो. या मुळ्यांशी संपर्क येऊन या रोगाचा प्रसार होतो. निरोगी मुळ्या पांढऱ्या असतात. रोगट मुळ्या गर्द पिवळ्या असतात. ही बुरशी बाह्य लाकडावर (सॅपवूड) पसरते आणि तेथील तंतू कुजल्याने पिवळे दिसतात. रोगट झाडे वाऱ्याने मोडतात. काही ठिकाणी या रोगाची बाधा १०० टक्के झाडांना होते.

या रोगाचे नियंत्रणासाठी १०० लि. पाण्यात १ लि. जर्मिनेटर आणि ५०० ग्रॅम कॉपर ऑक्झीक्लोराईड घेऊन हे द्रावण प्रत्येक सागाच्या झाडाच्या बुंध्याशी प्रत्येकी १ लि. याप्रमाणात सोडून झाडास पाणी द्यावे. म्हणजे औषधांचा अंश मुळ्यापर्यंत पोहचून मुळ कुज थांबते व जारवा वाढतो. त्यामुळे झाडाची थांबलेली वाढ जोमाने होते.

आ) खोडाचे रोग : केरळ व कर्नाटकातील जास्त पावसाच्या प्रदेशातील सागाचे झाडावर हा रोग आढळतो. खोडावरील जखमेतून बुरशी आत प्रवेश करते. या बुरशीची बाधा झालेल्या तरूण फांद्या मरतात. जुन्या फांदीला बाधा झाल्यास साल तडकते. झाडावर कँकरची वाढ होते. त्यामुळे गाभ्यातील लाकूड कुजते आणि लाकूड पोकळ बनते.

इ) पानांचे रोग :

१) पानावरील ठिपके : 'सर्कोस्पोरा टेक्टोना' या बुरशीमुळे सागाचे झाडावरील पानावर मंद तपकिरी ते करड्या तपकिरी रंगाचे ठिपके किंवा पुणे विभागात पांढऱ्या रंगाचे अनियमित ठिपके पडतात. तर महाराष्ट्रात सागाचे पानावर करपा रोगामुळे Zanthomonas ठिपके पडतात ते वरच्या भागावर तपकिरी रंगाचे पाण्याने भरलेले उठावदार असतात.

२) पानांचा करपा रोग(Rizoctonia Solani) : या बुरशीमुळे सागाची पाने करपतात. सुरुवातीला पानावर करड्या तपकिरी रंगाचे, पाण्याने भरलेले चट्टे असतात. ते थोड्या दिवसात संपूर्ण पानावर पसरतात. त्यामुळे झाडावरील १०० % पाने गळतात. मान्सूनच्या जास्त पावसात (ऑगस्ट महिन्यात) जास्त नुकसान होते. ही बुरशी जमिनीत असते. खोडातून पानात शिरते. रोगट झाडे काढून टाकल्यास रोगाच्या प्रसाराला प्रतिबंध होतो.

३) भुरी रोग : तीन प्रकारच्या बुरशी सागाच्या भुरी रोगाला कारणीभूत आहेत. या रोगाचा प्रादुर्भाव मध्य व दक्षिण भारतातील सागाच्या नर्सरीत व जंगलात दिसून येतो. या बुरशी रोगामुळे सागाच्या पानांचे वरच्या पृष्ठभागावर खडूची पांढरी भुकटी पसरावी त्याप्रमाणे बुरशी वाढलेली असते. त्यानंतर बुरशीचा रंग निळसर करडा होतो. नैसर्गिक पाने गळतात त्यावेळी भुरी रोगाची ही पाने गळतात. त्यामुळे सागाच्या झाडांचे जास्त नुकसान होत नाही. तथापि, सागाच्या पानाच्या वरील पृष्ठभागावर पांढरी बुरशी पसरल्याने प्रकाश संश्लेषण क्रियेत अडथळा येतो. त्याचा परिणाम झाडांच्या वाढीवर होतो. पानातील कर्बोदके व ओलावा कमी होतो. त्यामुळे रोगट पाने वाळतात .

उपाय : भुरी रोगाचे नियंत्रणासाठी सागाचे २ वर्षे वयाचे रोपावर गंधकाचे भुकटीची धुरळणी करावी किंवा कॅलीक्सीनची फवारणी करावी.

४) पानावरील तांबेरा : भारतात व बांगलादेशात सर्वत्र सागाचे झाडावर, विशेषत : नर्सरीतील सागाचे रोपावर आणि तरूण झाडवर हा रोग आढळतो. या रोगाचे कारण ही बुरशी आहे. सागाच्या पानांना या रोगाची बाधा ऑक्टोबरपासून फेब्रुवारी पर्यंत सतत होत असते. त्यामुळे पानावर पिवळसर तपकिरी रंगाची बुरशी पसरलेली असते. रोगट पाने अकाली गळतात. त्यांचा परिणाम झाडाच्या वाढीवर होतो. या रोगाचे प्रसाराला उष्ण व कोरडे हवामान अनुकूल असते. या रोगामुळे जास्त नुकसान नर्सरीतील दाट रोपांचे होते. तेथे या रोगाच्या नियंत्रणासाठी गंधकाच्या बुरशीनाशकाची फवारणी करावी.

काढणी व उत्पादन : सागाच्या झाडांचा मध्यप्रदेश, महाराष्ट्र, अंदमान, आंध्रप्रदेश, गुजरात, कर्नाटक, केरळ व ओरीसा राज्यांतील अभ्यास केला असता भारतात सागाचे झाडांची फेरपालट स्थानिक परिस्थितीवर अवलंबून असते. भारतातील सागाच्या पहिल्या प्रतीच्या जागेतून (साईट) ५०, ७० व ८० वर्षे वयाच्या झाडापासून अनुक्रमे ४१७ घनमीटर, ५१० व ५३९ घनमीटर लाकूड मिळते. छातीच्या उंचीपर्यंत सागाच्या खोडाचा व्यास ६० सें. मी. असल्यास २६ मीटर, ३५ मीटर व ५० मीटर उंच झाडापासून अनुक्रमे २.१० घनमीटर, २.८६१ घनमीटर व ४.११५ घनमीटर लाकूड मिळते. थायलंडमध्ये सुपीक, खोल व पुरेसा ओलावा असलेल्या जमिनीत वाढलेल्या ६० वर्षे वयाच्या सागाच्या झाडाच्या खोडाचा घेर २.१३ मीटर असतो. जावामधील सागाच्या जंगलात ८० वर्षांची फेरपालट रूढ आहे.

सागाचे लाकूड (टिम्बर) व सागाचे खांब यांची प्रतवारी केरळ राज्यात पुढीलप्रमाणे करण्यात येते.

teakwood tree लाकडाचे वर्गीकरण :

पहिला वर्ग : लाकडाचा घेर १५० सें. मी. व त्यापेक्षा अधिक आणि लांबी ३ मीटर व त्यापेक्षा अधिक.

दुसरा वर्ग : लाकडाचा घेर १०० ते १४९ सें. मी. आणि लांबी ३ मीटर किंवा त्यापेक्षा अधिक

तिसरा वर्ग : लाकडाचा घेर ७६ ते ९९ सें. मी. आणि लांबी ३ मीटर व त्यापेक्षा अधिक.

चौथा वर्ग : लाकडाचा घेर ६० ते ७५ सें. मी. आणि लांबी ३ मीटर व त्यापेक्षा अधिक.