डाळींबात झेंडूचे आंतरपीक
डाळींबामध्ये ५ हजार झेंडूची रोपे लावणार आहे. सीड प्लॉट सायन्स, बेंगलोरच्या कंपनी
चे हरीद्रा वाण यलो आणि ऑरेंजमध्ये लावत असतो. तेच लावणार आहे. ५ ग्रॅम बियाचे पाकिट
१४५० रू. ला मिळते. लग्न सराईत या झेंडूला बाजारभाव चांगला मिळतो.
कलिंगडही लावण्याचा विचार आहे. तेव्हा कलिंगडाच्या बाबतीत सरांना सल्ला विचारला असता सरांनी सांगितले, १।। महिना सतत थंडी राहून संक्रांतीनंतर ती कमी - कमी होत जाईल. यंदा पाऊस जादा झाला आहे आणि उन्हाळाही कडक राहील, तेव्हा मार्चनंतर कलिंगडाचे चांगले पैसे होतील.
चालू हंगामात २६ जून २०१० ला ५ एकरमध्ये खरबुज २।। महिन्यानंतर रमजान असल्याने घेतले होते. मात्र यंदा जादा पाऊस झाल्याने प्लॉट खराब झाले. जेथे ३।। - ४ लाखाचे उत्पन्न अपेक्षित होते तेथे १ गाडी माल निघाल्याने तो माल मुंबईला पाठविला, तर ६० - ६५ हजार रू. झाले. पुढीलवर्षी (२०११ मध्ये) रमजान १ महिना लवकर आल्याने खरबुजाची लागवड मे महिन्यात करणार आहे. सरांनी सांगितले पाऊस जर मध्यम स्वरूपाचा झाला तर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने खरबुजाचे पीक चांगले येईल आणि रमजानचा भाव सापडेल.