वाया गेलेल्या डाळींबाच्या प्लॉटमधून पहिला बहार यशस्वी, दर ८० रू. किलो
श्री. विष्णु मारुती आव्हाड लेवढे,
मु. पो. दापूर, ता. सिन्नर, जि. नाशिक.
मो.
९७६३९८५९२०
मी दोन वर्षापूर्वी १ एकर भगवा डाळींब लागवड १२' x १०' अंतरावर केली. एकरात ३८० झाडे
आहेत, तसेच या वर्षी नवीन १ एकर भगवा लागवड केली आहे.
दोन वर्षापूर्वीच्या भगवा डाळींबाचा मृग बहार धरला. सप्टेंबरमध्ये अति पावसामुळे डाळींबा वर पाकोळीचा मोठ्या प्रमाणात अटॅक (प्रादुर्भाव) वाढला. त्याच्या नियंत्रणासाठी किटकनाशकाची फवारणी केली. नजरचुकीने औषधांच्या मात्रेत (प्रमाणात) वाढ झाल्यामुळे झाडांवरील हिरवीगार असलेली पाने जवळपास ८० % गळून गेली. त्याचप्रमाणे १५० ते २०० ग्रॅम वजनाची पेरू आकाराच्या डाळींब फळांची शाईनिंग गेली. डाळींब फळे पुर्णपणे निस्तेज झाली. अशा परिस्थितीत काय करावे हे सुचेनासे झाले. आमच्याच गावातील श्री. वासुदेव आव्हाड माझे मामाच आहेत. त्यांना ही परिस्थिती सांगितली. त्यांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे श्री. सय्यद यांना परिस्थिती सांगितली. श्री. वासुदेव आव्हाड या तंत्रज्ञानाचा त्यांच्या डाळींब बागेसाठी मागील चार वर्षापासून वापर करीत आहेत. त्यांनी मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या दोन फवारण्या करण्यास सांगितल्या व जर्मिनेटरच्या आळवणीमधून १ लि. वापर करण्यास सांगितले. त्याप्रमाणे थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + न्युट्राटोन १ लि. ची २०० लि. पाण्यातून फवारणी केली. ड्रिपमधून जर्मिनेटर १ लि. चा वापर केला. डाळींबाची पाने पत्ती तयार होण्यास सुरुवात झाली. वरील फवारणीनंतर ८० व्या दिवशी वरीलप्रमाणेचे फवारणी केली.
दोन फवारण्यामध्येच व जर्मिनेटरच्या आळवणीमुळे नवीन पत्ती रुंद होऊन फळांची शाईनिंग पुर्ववत होऊन फळांचा आकार वाढला. चकाकी आली. डाळींब फळांमध्ये दाणे एकसारखे भरले गेले. अल्टरनेरिया, सरकोस्पोरा, कोलोटोट्रिकम, अॅन्थ्रॅकनोझ (करपा) यापासून संरक्षण झाले.
या दीड वर्षाच्या झाडावर बहार धरला होता. झाडावर साधारणपणे ३० ते ३५ फळे होती. प्लॉट वाया जातो की काय अशा परिस्थितीतून या तंत्रज्ञानामुळे माझा प्लॉट सुधारला जावून डाळींब ८० रू. किलोने विकला. १२५ क्रेट माल निघाला. झाडे सुधारून गेली व पहिलाच बहार यशस्वी झाला. नवीन झाडांना डॉ. बावसकर तंत्रज्ञानाचा वापर चालू आहे.