४ - ५ किलो निघणारा मोगरा १० ते १२ किलो झाला व भाव १०० ते १५० रू.

श्री. बाळू बाजीराव महाडीक,
मु. पो. शिंदवणे, ता. हवेली, जि. पुणे.
मो. ९६७३८४९९७९


मोगरा १० वर्षापुर्वी खडकाळ माळरानावर ६ गुंठ्यामध्ये लावलेला आहे. १०० झाडे ७' x ७' वर आहेत. मोगरा जुनची लागवड आणि दिवाळीनंतर ६ महिन्यात चालू झाला होता. मात्र त्यानंतर सलग ३ वर्षे सतत दुष्काळ पडल्याने हापशावरून पाणी काढून कावडीने झाडांना घालून झाडे जगविली. त्यानंतर पाऊसकाळ बरा झाल्याने उत्पादन चालू झाले. मात्र दिवसाला ४ - ५ किलोच्या वर माल कधीच मिळाला नाही. हा मोगरा विक्रीसाठी 'आनंदतारा' श्री. आप्पा गायकवाड, मार्केटयार्ड, पुणे यांच्याकडे आणतो. त्यांच्याकडे नानगाव, दौंडचे शेतकरी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करून उत्पादीत केलेला मोगरा आणतात. त्यांचा माल जादा आणि कळी लांब असते, त्यामुळे भाव चांगला मिळतो. म्हणून ते मला आपल्या ऑफीसमध्ये घेऊन आले. त्यावरून एप्रिलमध्ये जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर औषधे नेऊन फवारणी केली. त्याने ४ - ५ किलोवरून १० - १२ किलो माल निघू लागला. कळी मोठी झाली. गिऱ्हाईक माल पासून देत नसे. १०० ते १५० रू. किलो भाव मिळत असे. त्यावरून पुन्हा २ - ३ वेळा सप्तामृत औषधे मी स्वत: येऊन नेली. मे अखेरपर्यंत १।। महिना दररोज १० - १२ किलो माल या झाडांपासून निघत होता. जून नंतर माल कमी पडला व बाजारही कमी झाले. त्यामुळे औषधे पुन्हा वापरली नाहीत. त्या दीड महिनाभरात १५ हजार रू. झाले. एकूण २५ हजार रू. मोगऱ्याचे झाले.

नंतर गेल्यावर्षी एप्रिलमध्ये माल कमी निघत होता. कळी भरपूर होती, मात्र ती लांब व मोठी होत नव्हती. त्यामुळे उत्पादन कमी मिळत होते. त्याकरीता सप्तामृताची फवारणी घेतली तर त्याने लगेच फरक पडला. म्हणून पुन्हा सप्तामृत घेऊन गेलो. त्याच्या दोन फवारण्या घेतल्या असता कळी चांगली टपोरी मोठी निघु लागली. त्यामुळे १० ते १२ किलो माल निघु लागला.

बऱ्याच ठिकाणी ही समस्या जाणवत असते. त्यामुळे बाजारभाव नेहमीपेक्षा जास्त म्हणजे २०० ते २५० रू. किलो एवढे वाढतात. या वाढलेल्या बाजारभावाचा आम्हांला या तंत्रज्ञाना मुळे फायदा झाला.

९ गुंठ्यात ४ टन कांदा

कांदा गेल्यावर्षी डिसेंबर २००७ ला ९ गुंठे लावला होता. त्याला पहिली खुरपणी झाल्यावर युरीया, सुफला देऊन नंतर सप्तामृताची फवारणी घेतली तर कांदा ३ महिन्यातच काढणीला आला. ८० पिशवी (४ टन ) माल निघाला. बाजारभाव २८० रू. क्विंटल एवढे कमी होते. तरी ४।। पांडात ६ हाजर रू झाले होते. कांदा वाशी मार्केटला विकला. त्यावेळी २२० ते २५० रू. क्विंटल भाव असताना हा भाव मिळाला. या तंत्रज्ञानाने कांद्याची बाहेरील पातळ पत्ती घट्ट टिकून राहते. बाकीच्या कांद्यासारखी निघत नसे. त्यामुळे भाव जादा मिळत असे. कांदा काढल्यावर गुलछडी पीक घेतले. मात्र ते व्यवस्थित साधले नाही.

कडवळची २ महिन्यात ६' वाढ

गुलछडी नंतर फेब्रुवारी २००९ मध्ये कडवळ याच ९ गुंठे रानात केली. त्या रानात कडवळची कमी - अधिक वाढ झाली होती. अर्ध्या भागातील कमी वाढलेल्या कडवळवर कांद्याला नेलेले जर्मिनेटर शिल्लक होते ते फवारले तर १५ दिवसात तेही बरोबरीला आहे. अगोदर दोन्हीमधील वाढीत १ ते १।। फुटाचा फरक होता, तो भरून निघाला. २ महिन्यात ६ फुट वाढ झाली आहे.