टोमॅटोचा करपा, फुलगळ थांबली, ८ ते १० रू. दर पण आम्हला मात्र १२ ते १४ रू.
श्री. यशवंत सखाराम तांबट,
मु.पो. साळवडे, ता. भोर, जि. पुणे,
मोबा. ९८२३१८८७६३
माझ्याकडे साळवडे येथे चार एकर काळी तांबूसयुक्त भारी जमीन आहे. त्यामध्ये मी पारंपारिक
पद्धतीने पिके घेत असतो. जून २०११ मध्ये वैभव टोमॅटोची ३० गुंठ्यामध्ये लागवड केली
होती. मात्र ऑगस्ट २०११ मध्ये पावसाचे प्रमाणे जास्त असल्याने करपा रोगाचा प्रादुर्भाव
झाला होता. आमचा प्लॉट तसेच शेजाऱ्यांचेही प्लॉट करप्यामुळे पुर्णत: निस्तेज झाले होते.
त्यासाठी बिएसएक कंपनीचे कॅब्रीओटॉंप घेण्यासाठी पुणे मार्केटमध्ये आलो असता. डॉ.बावसकर
टेक्नॉंलॉजीच्या ऑफिसमध्ये चौकशी करताना तेथे मला सांगण्यात आले की, टोमॅटोवरील करप्यासाठी
आमचे सप्तामृत औषध एक वेळ वापरून पहा. एकदम खात्रीशीर रिझल्ट मिळेल. मात्र घरी या औषधाला
मुलांकडून सहमती मिळणार नाही, म्हणून मी ती घेत नव्हतो. अशा परिस्थितीतदेखील प्रतिनिघींनी
अतिशय अनुभवसिद्ध सविस्तर माहिती दिल्यामुळे ट्रायल म्हणून थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी
२५० मिली आणि बॅक्टोकिल २५ ग्रॅम घेऊन गेलो. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची प्रतिनिधींच्या
सल्ल्यानुसार ७५ लिटर पाण्यामधून त्याची फवारणी केली.
एकाच फवारणीत माल चालू
फवारणीनंतर १० ते १२ दिवसांमध्ये टोमॅटोवरील करपा रोग पुर्णत: नाहिसा होऊन प्लॉटला काळोखी आली. फळगळ थांबली. एकाच फवारणीमध्ये माल चालू झाला. पहिल्या तोड्याला ३० किलो चे ११ क्रेट मला निघाला. दुसऱ्या तोड्याचा २९ क्रेट म्हणजे ७१३ किलो माल १७ ऑक्टोबर २०११ रोजी मे. शंकर त्र्यंबकराव रायकर (पाटील) गाळा नं. १८६ यांच्याकडे विक्रीस आणला होता. मालाचा दर्जा उत्तम असल्यामुळे बाजारभाव ८ ते १० रू. किलो असतान आम्हाला १२ ते १४ रू. किलो प्रमाणे पट्टी नं. ४३५५ मिळाली. यामध्ये आडत. हमाली जाऊन ७,७८४ रू. या मालापासून मिळाले. त्यावरून आज या चालू टोमॅटो प्लॉटसाठी व आणखी दुसऱ्या प्लॉटला डॉ.बावसकर तंत्रज्ञान घेऊन जात आहे. तसेच आमच्या येथील श्री. राजेंद्र सणस व श्री. सुनिल शिंदे यांनी आपला प्लॉट पाहून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे आणण्यास सांगितली. त्यांच्यासाठी थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ५०० मिली आणि बॅक्टोकिल २५० ग्रॅम घेऊन जात आहे.