करटोली - एक अनोखी भाजी

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


ठाणे, रायगड, नाशिक, धुळे, पुणे व विदर्भात काही जिल्ह्यातील जंगलामध्ये करटोली आढळून येते. डोंगराळ भागात आपोआप वर्षानुवर्षे येणारी ही वेलवर्गीय भाजी आहे. याची फळे ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यात पुणे - मुंबईतील बाजारपेठेत चांगल्या दराने विकली जातात. करटोली चे वेल कंपाऊंडवर चांगले वाढतात. बांधावर त्याचे कंद असतात व काटी कुपाटीवर कुरटुल्याचे वेल फळे देतात.

आहारातील महत्त्व - करटोलीची कोवळी फळे स्वादिष्ट आणि रुचकर असतात. या भाजीत पोषण द्रव्यांचे प्रमाण इतर भाज्यांपेक्षा अधिक असते.

करटोलीच्या फळात प्रथिने ३.१%, पिष्टमय पदार्थ ७.७%, स्निग्ध पदार्थ १% तंतुमय पदार्थ ३%, क्षार १.१% या शिवाय 'अ' आणि 'क' जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते, तसेच करटोलीच्या कंदात, बियात आणि फळात औषधी गुणधर्म असल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवाय करटोलीची भाजी मधुमेही रुग्णांना उपयुक्त असते. हाड मोडल्यास फळे आणि पाने दुखापत झालेल्या जागी बांधल्याने आराम पडतो.

जमीन व हवामान - करटोली या पिकला डोंगर उताराची हलकी ते मध्यम तसेच पाण्याचा निचरा होणारी जमीन आवश्यक असते. शक्यतो हे पीक खरीप हंगामात घेतले जाते. तसेच या पिकाला अति थंडी मानवत नाही.

पूर्वमशागत व लागवड - जमिनीत २ मी. अंतरावर ६० सेंमी रुंदीचे पाण्याचे पाट काढावेत. दोन्ही बाजूस १ मीटर अंतरावर लागवड करवी. लागवड करताना ३० x ३० x ३० सेंमी आकाराचे खड्डे घेऊन त्यात २ किली शेणखत, १०० ग्रॅम कल्पतरू आणि ५० ग्रॅम फॉलिडॉल किंवा २५ ग्रॅम प्रोटेक्टंट पावडर टाकून मातीमध्ये चांगले मिसळून घ्यावे. करटोलीची लागवड कंदापासून केली जाते. या पिकात मादी व नर वेळ वेगवेगळे असतात. लागवड केलेल्या क्षेत्रात फळधारणे साठी १० % नर वेलांची संख्या असावी. फुलांवरून नर व मादी वेल ओळखता येतात.

त्याचप्रमाणे लागवड बियांपासून देखील करता येते. परंतु बियांची उगवणक्षमता फार कमी असते. त्याकरिता बियांना जर्मिनेट आणि प्रोटेक्टंटची प्रक्रिया करावी. बियांपासून केलेल्या लागवडीत वेलीवर फलधारणा उशीरा होते. मादीचे आणि नराचे असे वेगवेगळे कंद आणावेत. एक कंद एकाच जागी (२ ते ३ वर्ष) राहिल्यानंतर ४ ते ५ जोड कंद तयार होतात. हे कंद लागवडीसाठी वापरावेत.

जाती - करटोली पिकामध्ये सुधारित वाण उपलब्ध नाही. सर्वसाधारणपणे फळांच्या आकारावरून त्यांचे विविध प्रकार पडतात.

१) अंडाकृती फळे - या जातीच्या फळांचा रंग हिरवा असून, फळांवर मऊ काटे असतात. या जातीच्या फळांचा आकार अंडाकृती असतो. एका फळाचे सरासरी वजन १० ते १२ ग्रॅम इतके भरते.

२) मध्यम गोल फळे - फळांचा रंग हिरवा असून, मध्यभागी फुगीर असतो. फळावरील काटे रणक असतात. एका फळाचे सरासरी वजन १३ ते १५ ग्रॅम असते. अशा प्रकारची फळे असणाऱ्या जाती ठाणे, नाशिक, धुके, जळगाव या जिल्ह्यांत आढळतात.

३) मध्यम आकाराची फळे - करटोलीच्या या प्रकारातील जाती प्रामुख्याने उत्तर भारतात दिसून येतात. या जातीची फळे तुलनात्मकदृष्ट्या आकाराने मोठी व फिकट रंगाची असतात. बी कमी असते. उत्पादन जास्त येते.

४) छोट्या आकाराची गोल व टोकदार फळे - या प्रकारच्या जाती उत्तर भारतात घेतल्या जातात. या जातीच्या फळांना चांगली मागणी असते.

* पाणी व खत व्यवस्थापन - करटोली हे खरीप हंगामातील पीक असल्याने पावसाचा अंदाज घेऊन पाण्याची गरज भासल्यास पाणी द्यावे. सर्वसाधारणपणे पाऊस लांबला. तर १२ ते १५ दिवसांच्या अंतराने हलके पाणी द्यावे. तसेच 'कल्पतरू' सेंद्रिय खत लागवडीच्या वेळी एकरी ५० किलो आणि ३० किलो लागवड झाल्यानंतर ३० दिवसांनी खोडापासून २ - ३ इंच अंतरावर बांगडी पद्धतीने द्यावे.

किडी - करटोली या पिकावर फळमाशी, लाल भुंगे, पाने खाणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडींच्या नियंत्रणासाठी किडलेली फळे वेळच्यावेळी गोळा करून नष्ट करावीत आणि डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारणीमध्ये प्रति लिटर पाण्यामध्ये प्रोटेक्टंट ३ ग्रॅम आणि स्प्लेंडर १।। ते २ मिली या सेंद्रिय किटकनाशके घेऊन फवारणी करावी.

रोग - करटोली पिकावर भुरी, करपा हे प्रमुख रोग आढळून येतात. या रोगांच्या नियंत्रणासाठी खालील फवारण्यामध्ये प्रति लिटर पाण्यामध्ये थ्राईवर ३ मिली, क्रॉपशाईनर ३ मिली आणि हार्मोनी १.५ ते २ मिली याप्रमाणे घेऊन २ फवारण्या ८ ते १० दिवसांच्या अंतराने कराव्यात.

फवारणी -

करटोली पिकाच्या निरोगी, जोमदार वाढीसाठी आणि भरघोस, दर्जेदार उत्पादनासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पुढीलप्रमाणे फवारण्या कराव्यात.

१) पहिली फवारणी : (लागवडीनंतर १० ते १५ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + राईपनर १०० मिली. + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १५० मिली. + हार्मोनी १०० मिली. + स्प्लेंडर १०० मिली . + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी ) : थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + राईपनर २५० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी १५० मिली. + स्प्लेंडर १५० मिली. + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (लागवडीनंतर ४० ते ४५ दिवसांनी ) : थ्राईवर ७५० मिली.+ क्रॉंपशाईनर ७५० मिली. + राईपनर ५०० मिली + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी २५० मिली. + स्प्लेंडर २५० मिली. + २०० लि.पाणी.

* काढणी व उत्पादन : जूनमध्ये लागवड केलेल्या वेलीवर जुलैअखेर फळ येण्यास सुरुवात होते. कोवळ्या फळांची दर ३ ते ४ दिवसाच्या अंतराने नियमित काढणी केल्यास प्रत्येक वेली पासून सरासरी १ ते १.५ किलो फळांचे उत्पादन मिळते. हेक्टरी १० ते १५ टन उत्पादन मिळते. पहिल्या पिकानंतर वेल वाळतात. मात्र हे कंद जमिनीत सुप्तावस्थेत जिवंत राहतात आणि पुढील वर्षी मे महिन्यांत पुन्हा फुटवे फुटतात.