यशस्वी उसासाठी (टनेज व रिकव्हरी) सप्तामृत व कल्पतरू

श्री. रविंद्र कांतीलाल शहा,
मु. पो. बोरगाव, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव. (कर्नाटक)
मोबा. ९४२२०४७१०९


मला शेतीची आवड असल्याने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सहाय्याने शेतात नवनवीन प्रयोग करत असतो. प्रथम मी १ एकर क्षेत्रावर 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवग्याची लागवड केली होती. याचे उत्पादन अतिशय चांगले मिळाले. त्याची मुलाखतदेखील कृषी विज्ञानच्या अंकामध्ये प्रसिद्ध झाली आहे.

आता मी ऊस पिकासाठी सप्तामृत फवारले आणि कल्पतरू सेंद्रिय खताचा देखील वापर केला. त्यामुळे उसाच्या वाढीत व फुटव्यात नेहमीपेक्षा खूप फरक दिसत आहे. सुरुवातीला लागणीच्यावेळी जर्मिनेटर १ लि. + ३०० ग्रॅम बाविस्टीन + १०० लि. पाणी या द्रावणात कांदा बुडवून लागण केली. लागणीपुर्वी एकरी ३ बॅगा कल्पतरू सेंद्रिय खत मातीत मिसळून दिले. जर्मिनेटर च्या प्रक्रियेमुळे उगवण १० - १२ दिवसातच एकसारखी झालेली दिसत होती. नंतर जर्मिनेटर ७५ मिली + २० ग्रॅम बाविस्टीन १५ लि. च्या पंपात घेऊन आळवणी केली. नंतर जर्मिनेटर ५० मिली + थ्राईवर ५० मिली + राईपनर ५० मिली + प्रिझम ५० मिली + १५ लि. पाणी याप्रमाणे २० दिवसाच्या अंतराने २ फवारण्या केल्या. त्यानंतर उस बांधणीच्यावेळी कल्पतरू सेंद्रिय खत ५ पोती व गांडूळ खत दिले. त्यानंतर थ्राईवर ५० मिली, राईपनर ५० मिली, प्रिझम ५० मिली १५ लि. पाणी याप्रमाणे फवारणी केली.

पिकाच्या गरजेनुसार सुरूवातीला ड्रिपने व नंतर पाटाने मोकळे पाणी दिले. जर्मिनेटरच्या वेळोवेळी ड्रेंचिंगमुळे भरपूर फुटवे व पांढरीमुळीदेखील भरपूर प्रमाणात फुटली. यामुळे जमिनीतील अन्नद्रव्ये पांढरी मुळीच्या सहाय्याने उसाला मिळाली. वेळोवेळी फवारण्यांमुळे पानांना काळोखी पाने रुंद सध्या उसाच्या पेऱ्यांची संख्या व लांबी आणि आकार वाढला. सध्य ऊस ११ महीन्याचा असून १५ ते १८ कांड्यावर आहे. यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी कोल्हापूरचे प्रतिनिधी श्री. केदार मोरे (मोबा. ९७६६२७१६३५) यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळावे.