३८ गुंठे टोमॅटोपासून १ लाख ३० हजार रू
श्री. ज्ञानेश्वर उत्तरेश्वर लोहार,
मु. चोबे पिंपरी, पो. ढवळस, ता. माढा, जि.
सोलापूर.
मो. ९८८१०४२०९७
३ एकर खरबुजापासून ३ महिन्यात ३ लाख
५०१ नामधारी टोमॅटोची लागवड १ जून २०१३ रोजी ३८ गुंठ्यामध्ये केली. जमीन मुरमाड हकली उताराची आहे. लागवड ६ फूट रुंदीच्या बोधावर मधोमध उभी इनलाईन ड्रीप अंतरून त्यावर ड्रीपच्या दोन्ही बाजुला ड्रिपरजवळ १ -१ फुटावर म्हणजे टोमॅटोच्या २ ओळीमध्ये २ फूट अंतर व उभ्या लाईनमध्ये ड्रिपर १। फुटावर असल्याने १। फुटावर एक रोप (२ x १।) अशी लागवड केली. याच बोधावर अगोदर खरबुजाचे पीक घेतले होते. त्याला बोध करतेवेळी गावखत टाकले होते. तसेच आता टोमॅटो लागवडीपुर्वी कल्पतरू सेंद्रिय खत ३८ गुंठ्यासाठी ६ पोती दिले आहे. खरबुजापासून ३८ गुंठ्यात १ लाख रू. निव्वळ नफा मिळाला होता. त्याची मुलाखत 'कृषी विज्ञान' जून २०१३ पान नं. १४ वर आली आहे. त्यावेळी एकूण ३ एकर खरबुज लावले होते. त्याचे ३ महिन्यात ३ लाख रू. झाले होते.
टोमॅटोला ३८ गुंठ्यासाठी १ लि. जर्मिनेटर २०० लि. पाण्यातून सोडले. त्याने झाडे जोमाने वाढली. त्यानंतर थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर आणि हार्मोनीची पहिली फवारणी केली. नंतर १५ दिवसाच्या अंतराने माल चालू होईपर्यंत ३ फवारण्या घेतल्या. विशेष म्हणजे याला रासायनिक खत एक चिमूटभर देखील वापरले नाही.
फळांचे पोषण व कलर येण्यासाठी स्पेशल राईपनरची २ वेळा २०० लि. पाण्यास ७५० मिली राईपनर याप्रमाणे फवारणी केली. एवढ्यावर मालाची फुगवण अधिक होऊन शाईनिंग जबरदस्त आली. दिवसाड तोडे करत होतो. तोड्याला २० - २५ ते ३० क्रेट माल निघत होता. ऑगस्टमध्ये चालू झालेला माल ऑक्टोबर अखेर पर्यंत चालू होता. दिल्लीचे व्यापारी कुर्डुवाडी मार्केटला येतात. आपला माल कुर्डुवाडी मार्केटमध्ये एक नंबर असल्याने ४२५ रू./क्रेट (२४ किलो) ठोक भावाने ते व्यापारी माल घेत असत. अशाप्रकारे ३८ गुंठ्यातून या टोमॅटोपासून १ लाख ३० हजार रू. उत्पन्न मिळाले.
३० गुंठे मिरचीपासून ७० हजार
३० गुंठे सानिया कंपनीची मिरची मे च्या शेवटच्या आठवड्यात लावली होती. तिचा बोध व लागवड टोमॅटोप्रमाणेच होती. तिलाही जर्मिनेटर चे ड्रेंचिंग व थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट, हार्मोनीच्या ३ फवारण्या केल्या. याला लागवडीपुर्वी मल्चिंगवर ४ बॅगा कल्पतरू खत टोकून दिले होते. रासायनिक खते अजिबात वापरली नाही. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने पुर्ण सेंद्रिय शेती करीत आहे. तर मिरची ऑगस्टमध्ये चालू झाली.
मिरची गावरान मिरचीसारखी अखूड, तिखट होती. त्यामुळे तोडणीस उरकत नसे. मात्र याला टोक भाव ५५ ते ६७ रू./किलो मिळत होता. या मिरचीपासून ऑकटोबर अखेरपर्यंत ५० ते ५५ हजार रू. झाले. नंतर भाव कमी १५ ते २० रू./किलो झाल्यावर ती पिकविली. नंतर ती वाळवून १२५ रू./किलो भावाने विकली. त्यापासून २० हजार रू. झाले असे एकून ३० गुंठे मिरचीपासून ७० हजार रू. मिळाले.
टोमॅटो, मिरची काढून नंतर १५ नोव्हेंबरला जी - ९ कोळीची रोपे २ एकरमध्ये लावली आहेत. आता तिला डॉ.बावसकर सरांचे मार्गदर्शन घेण्यास आज (२४ डिसेंबर २०१३) आलो आहे. सरांच्या मार्गदर्शनानुसार केळीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे घेऊन जात आहे.