काकडीकडून मजुरांच्या प्रश्नामुळे शेवग्याकडे १।। एकरात शेवग्याचे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने १४ लाख
श्री. सदाशिव आत्माराम भगत (मिलीटरी रिटायर्ड),
मु.पो. राजुरी, ता.पुरंदर,
जि. पुणे,
मोबा. ९०९६४७८२७५
मी १९९० साली मिलीटरीमध्ये पंजाब चंदीगड येथे बुलडोझर ड्राईव्हर म्हणून कार्यरत होतो. तेव्हा
तेथे मला पंजाबी शेती पाहण्यास खूप आवडत असे. तेथील गव्हाची शेती. भात शेती, बटाट्याची
शेती खुप सुंदर पाहण्यासारखी आहे. पंजाबनंतर मी अरुणाचल येथे १९९२ ते ९५ या कालावधीत
होतो. त्याही ठिकाणी मका, भात ही शेती पाहण्यास मिळाली. मिलीटरीत मला नवीन रस्त्याची
कटींग करणे, स्लायडींग अंथरण ही कामे करावी लागत.
त्यानंतर मी १९९९ ते २००३ या कालावधीत श्रीनगर (जम्मू - काश्मिर) येथे कार्यरत झालो. तेथे बर्फ हाटवणे, स्लायडींग (वाळू, डोंगर ढासळलेले) हटविणे, नवीन रस्त्यांची इनेशियल कटींग करून देत. ही कामे करत असताना श्रीनगर येथील डोंगर - दऱ्यामधील सफरचंदाच्या बागांचे, भात शेतीचे, मक्याच्या शेतीचे प्रतिकूल परिस्थिती आधुनिक पद्धतीने व्यवस्थापन केले जात, ते थक्क करणारे होते. ते पाहून आपणही मिलीटरीतून निवृत्त झाल्यावर गावी शेती आधुनिकतेने करायची हे मनाशी पक्के केले.
२००३ साली निवृत्त झाल्यावर २००४ सालीपासून शेती करून लागलो. मला एकूण ५ एकर ७ गुंठे शेती आहे. जाणाई योजनेचे पाणी आहे. प्रथम या शेतीत २ एकर जिप्सी काकडीची लागण सप्टेंबर मध्ये केली होती. त्यामध्ये मला विक्रमी उत्पादन मिळाले होते. त्यानंतर दरवर्षी काकडीचे पीक घेत होतो. त्यानंतर मजुरांची समस्या निर्माण झल्याने काकडी लागवडीपासून शेवग्याच्या शेतीकडे वळालो.
जून २०१३ ला कोईमतूर जातीच्या शेवग्याची लागवड केली. १।। एकरमध्ये ८' x ८' वर लागवड केली. शेवगा २५ डिसेंबर २०१३ ला चालू झाला तो १५ ऑगस्ट २०१४ पर्यंत चालला. आठवड्याला तोडा करीत असे, तर १४०० ते २००० किलो माल निघत होता. तो पुणे व सासवड या ठिकाणी विकत असे. पुणे मार्केटला ४० रू. पासून ७० रू. किलो तर सासवडला ५० ते ७० रू. किलोने शेवग्याची विक्री केली.
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची साधारण १ महिन्याला एक फवारणी घेत असे. मध्ये १५ दिवसाला किटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी करीत असे. जास्त प्लॉट ओपन असल्याने किंवा मुळातच शेंग आणि देठ किंवा झाडाचा रंग काळसर असल्याने किंवा उन्हाची प्रखर सुर्यकिरणे लागून शेंगा लालसर होतात. तेव्हा त्यावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सप्तामृत फवारायचो तर लालसर शेंगदेखील हिरवीगार होते.
काळ्या पडलेल्या शेंगावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे दाट फवारून शेंगा धुतल्यासारख्या ओल्या करीत असे. त्यामुळे ३ - ४ दिवसात अशा शेंगा हिरव्यागार होऊन विक्रीस नेत असे तर १ नंबर भावाने जात.
आठवड्याला ४० ते ७० हजार रू. ची विक्री होत असे. पहिल्याच बहारापासून १० लाख रू. झाले असे वाटले. परंतु पुणे मार्केटच्या पट्ट्यांचा सविस्तर हिशोब केल्यावर ५।। लाखाच्या पट्ट्याच झाल्याचे आढळले तसेच सासवडला विकलेल्या शेंगाचे आठवड्याला ४० हजार ते ७० हजार होत. असे सरासरी ४० हजार रू . धरले तरी त्याचे ८ ते ९ लाख रू. झाले असे एकूण १४ लाख रुपया हून अधिक उत्पन्न मिळाले.
जागेवर इंदोरला काकडीचा भाव २२ रुपये
अवधूत महाजन चोपडा, जळगाव, मोबा. ९५६१८३६९०५ याची प्रदर्शनात भेट झाली तेव्हा चर्चा करताना आम्ही दोघेही काकडीचे पीक घेत होतो. तर त्यांनी मला विचारले किती काकडी निघते. मी सांगितले एकरी १ टन माल दररोज निघतो. असे २० - २२ तोडे झाले होते. तेव्हा त्यांचे उत्पादन कमी निघत म्हणून ते आमचे प्लॉट पाहण्यास आले. ते मोठे ५० - ६० एकरचे बागायतदार आहेत. मी देखल त्यांचे प्लॉट पाहण्यास गेलो होतो. ही २००६ - २००७ मधील गोष्ट आहे.
गेल्यावर्षी आम्ही शेतीसंबंधी माहिती घेताना त्यांना मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती देऊ लागलो. त्यांना मी सांगितले आता रासायनिक खते, औषधे बंद करून डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरा. हे कमी खर्चातील १००% खात्रीशीर तंत्रज्ञान आहे. त्यावर ते मला म्हणाले मी हे गेली २ वर्षापासून वापरत आहे. यावर्षी मी १२ एकर काकडी लावली आहे. जागेवरून २२ रू ने इंदोरला रिलायन्सला जाते. माल अतिशय देखणा, टवटवीत, टिकाऊ क्षमता अधिक असलेला, चवदार, पौष्टिक आहे.
इतर शेतकऱ्यांची डाळींबाची पाने चिंचेच्या पानासारखी, आमची आठवड्यात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने २ बोटाएवढी रुंद पाने
भगवा डाळींबाची २० रू. प्रमाणे गणेशखिंड येथून ५ वर्षापुर्वी ३२५ रोपे नेली होती. ती मध्यम मुरमाड प्रतिच्या जमिनीत १४' x १२' वर सव्वा एकरात लावलेली आहेत.
पहिला बहार १८ महिन्यात धरला होता. तेव्हा १० ते १२ किलो माल प्रत्येक झाडावरून निघाला होता. त्यानंतर दुसऱ्या बहारापासून २० - २२ किलो माल निघाला होता.
आता तिसऱ्या बहारासाठी सप्टेंबर - ऑक्टोबर बागेस ताण दिला. मात्र पुर्ण पानगळ होण्यापुर्वीच ३० नोव्हेंबर २०१४ ला अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील अनेकांनी त्या पावसावरच बहार धरला. कारण ताण मध्येच खंडीत होऊन नवीन फुटवे निघू लागले. त्यामुळे काही बागांना ताण पुर्ण बसला तर काहींच्या बागांना अर्धवटच ताण बसला, आपल्याही बागेतील पुर्ण पानगळ झाली नव्हती. मात्र अशा परिस्थिती जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रिझम, प्रोटेक्टंटची फवारणी केली. तर आठवड्यात पाने हाताच्या दोन बोटावर बसत नाहीत. एवढी रुंद व हिरवीगार, तेजस्वी झाली आहेत. गावातील इतरांच्या बागेवर गेलो असता तेथे त्यांच्या डाळींबाची पाने चिंचेच्या पानांसारखी बारीक आहेत. त्यांना मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरत असल्याचे तेथे लगेच सांगितले नाही, नंतर ते जेव्हा माझा प्लॉट पाहण्यास आले तेव्हा झाडांची हिरवीगार, तेजस्वी, रुंद पाने पाहून आश्चर्यचकीत झाले. तेव्हा त्यांनी मला विचारले तू काय वापरले, मग मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांच्या बाटल्या दाखविल्या. आता त्यांची खात्री पटली की, डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी खरेच एक उच्च तंत्रज्ञान आहे.
माझी २५ किलो मेथीपासून २५ दिवसात २५ हजार ही 'कृषी विज्ञान' सप्टेंबर २०१४ मधील पान नं. २९ वरील मुलाखत वाचल्यानंतर लातूर, उदगीर, पंढरपूर, उस्मानाबाद, पुणे, अहमदनगर, सातारा भागातून २५० ते ३०० शेतकऱ्यांचे फोन आले. त्यांना मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीबद्दल माहिती दिली. मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीबद्दल एवढी खात्री आली आहे की, हे तंत्रज्ञान वापरले असता कोणत्याही परिस्थितीत १०० % शेती ही यशस्वी होतेच, ती फेल होऊच शकत नाही. त्यावरून आता डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा दूर बनून ही औषधे. खत गावपातळीवर प्रसारित करून येथील शेती सुजलाम सुफलाम करून शेतकऱ्यांचे आशिर्वाद घ्यायचे आहेत.
सरांनी सांगितले, आता या डाळींबाला जर्मिनेटर, प्रिझमचे ड्रेंचिंग करून थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रोटेक्टंट, प्रिझम, कॉपरऑक्सिलोराईडची फवारणी करा. म्हणजे कळी भरपूर लागून ती न गळता सेटिंग चांगले होईल. साधारण प्रत्येक झाडावर १०० - १०० फळे धरण्यास सरांनी सांगितले. पुढेही हेच तंत्रज्ञान चालू ठेवा म्हणजे एप्रिलपासून मे - जूनमध्ये फळे काढणीस येतील व यातील ७०% फळे ही किंग साईजची मिळतील. ती लंडन, हॉलंडला निर्यात होतील. ३०० ते ४०० ग्रॅमचा माल हा पाकिस्तान, बांग्लादेश, मालदीव, अफगणिस्तान, भूतान व श्रीलंका अशा सार्फ राष्ट्रात निर्यात होईल.
जागतिक मंदी असल्यास निर्यातीच्या मागे न लागता देशांतर्गत मार्केट अहमदाबाद, सुरत, लुधियाना, इंदोर, मुंबई येथील मार्केटचा अभ्यास करून, सतर्क व साशंक राहून माल पाठवावा. पुणे - मार्केटचा अनुभव असा आहे की, रविवार, मंगळवार व शुक्रवार या दिवशी माल फ्रेश येतो व व्यापाऱ्यांकडून मालास उठाव राहतो. या दिवशी जर सणवार असेल तर मात्र उठाव कमी असतो. मुंबई मार्केटची परिस्थिती वेगळी आहे. त्याचा तेथे जाऊन प्रत्यक्ष अभ्यास करून माल पाठवावा.
भारतातील १२० कोटी जनतेपैकी ६० कोटी जनता तरुण असून ४० कोटी लोकांची क्रयशक्ती चांगली असल्याने आपला माल आपल्याच देशबांधवांना विकला तर त्यांचे आरोग्य सुधारून त्याचे आपणास पुण्य लागेल. असे सरांनी सांगितले.
मेथी भुईमुगाच्या पाल्यासारखी रुंद
४।। पांडात (९ गुंठ्यात) १५ किलो मेथी जर्मिनेटरची प्रक्रिया करून टाकली होती. तर ४ - ६ दिवसात उगवली. नंतर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या २ फवारण्या आठवड्याला केल्या तर २४ दिवसात त्यातील १ हजार गड्डी काळ काढली. अजून २ हजार गड्डी निघेल. जेथे पाडाक (पातळ) होती. तेथील मेथीला ३ - ३ फुटवे निघाले. पाने भुईमूगाच्या पाल्यासारखी मोठी - रुंद होती. काडी बुडापर्यंत कोवळी होती. मार्केटमध्ये पहाटेची (अंधारात) २ ते २।। रू. ने मार्केटमधील भावाप्रमाणे या मेथीस मागणी होत होती. त्यांना मी सांगितले, तुम्हाला ह्या मेथीच्या क्वालिटीचा अंदाज नाही. तुम्ही उजाडल्यावर या म्हणजे तुम्हाला समजेल. आम्ही मात्र त्या भावाने न विकता सकाळी ७ नंतर (उजाडल्यावर) विकली तर ४।। ते ५ रू. ने मेथीची विक्री झाली.
आज (१२ डिसेंबर २०१४) डाळींबासाठी कल्पतरू सेंद्रिय खताच्या १० बॅगा व सप्तामृत १ - १ लि. घेऊन जात आहे.