दुष्काळी भागात 'सिद्धीविनायक' शेवग्यामध्ये हरभऱ्याचे पिकही जोमदार

श्री. अशोक गोपाराव डाके (निवृत्त शिक्षक),
मु.पो. वडगाव, ता. सोनपेठ, जि. परभणी


माझी वडगाव (स्टे) येथे ३० एकर बागायती जमीन आहे. किशोर म्हेत्रे नावाच्या माझ्या मित्राने १ एकरमध्ये 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवगा लागवड केली होती.

त्या शेवग्यापासून त्याला खूप नफा झला. त्याने तो प्लॉट मला दाखवला. तो प्लॉट मी खुष झालो आणि मिही अडीच एकरमध्ये १६ नोव्हेंबर २०१५ ला मोरिंगा जातीचा शेवगा लावला. त्या मित्राकडून मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे शेवग्याचे पुस्तक प्राप्त झाले. पुस्तक वाचून त्यांनी सांगितल्याप्रमाणे शेवग्याचे नियोजन केले आहे. त्यांनी सांगितलेली डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी औषधे देखील वापरत आहे आणि सध्या या २.५ एकर शेवग्यामध्ये आंतरपीक हरभरा घेतला आहे. त्याला देखील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी शेवग्याबरोबर वापरत असल्याने हरभऱ्याची फुट चांगली झाली असून फुल व घाटे भरपूर लागले आहेत. हरबरा दरवर्षी करतो मात्र असा रिझल्ट यापुर्वी आम्हाला कधी मिळाला नव्हता. पुढे घाटे पोसण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे स्प्रे चालू आहेत.