हळदीचे सुरक्षित दर्जेदार व अधिक उत्पादनासाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी

श्री. अविनाश देवराव कर्णेवाड, मु.पो. ब्राम्हणगाव, ता. उमरखेड, जि. यवतमाळ.
मो. ९०११६१५९५७


माझ्याकडे एकूण २५ एकर जमीन आहे. मी गेल्या दोन वर्षपासून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर करीत आहे. गेल्यावर्षी मी हळद पिकासाठी जर्मिनेटर + प्रिझम + थ्राईवर + हार्मोनी + क्रॉपशाईनर + राईपनर + न्युट्राटोन + स्प्लेंडर ही औषधे व कल्पतरू सेंद्रिय खत वापरले. त्याचा प्रतिकूल वातावरणातही चांगला फायदा झाला. त्यामुळे यावर्षी १००% डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने हळदीचे उत्पादन घेण्याचे ठरवले व डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी प्रतिनिधी यांची भेट घेतली असता त्यांनी मला माझ्या शेतावर येऊन हळदीची पूर्ण माहिती सांगितली. हळद बेणे प्रक्रियेसाठी १०० लि. पाण्यामध्ये जर्मिनेटर ५०० मिली + हार्मोनी १५० मिली + क्लोरोपायरीफॉस ५०० मिली या द्रावणात बेणेप्रक्रिया करून १५ जून २०१६ रोजी ५ एकरमध्ये लागवड केली जर्मिनेटरच्या बेणेप्रक्रियेमुळे हळदीच्या कंदाची उगवणशक्ती वाढून रोगमुक्त जोमाने वाढ झाली. तसेच पांढऱ्या मुळ्या लवकर निघाल्यामुळे झाडाची एकसारखी वाढ झाली. हळदीसाठी बेड तयार करतेवेळेस डी.ए.पी. १ बॅग + कल्पतरू २ बॅग एकरी बेडवर टाकले व नंतर लागवड केली. हळदीची उगवण झाल्यानंतर ठिबकद्वारे १ लि. जर्मिनेटर/एकरी सोडले. यासोबत १९:१९:१९ ३ किलो याप्रमाणे आळवणी केली. नंतर पहिली फवारणी जर्मिनेटर २५० मिली + थाईवर २५० मिली + क्रॉपशाईनर २५० मिली + हार्मोनी २०० मिली + न्युवॉन १५० मिली + १०० लि. पाणी याप्रमाणे फवारणी केली असता झाडे हिरवीगार, निरोगी, सशक्त झाली. तसेच कुठलाही रोग १ महिनाभर आला नाही. नंतर दुसरी फवारणी ३० दिवसांनी थ्राईवर ३०० मिली + क्रॉपशाईनर ३०० मिली + हार्मोनी २०० मिली + क्लोरो २५० मिली + १०० लि. पाणी याप्रमाणे केली. तर या हळदीवर किडीचा प्रादुर्भाव झाला नाही.

मोनोक्रोटोफॉसची फवारणी केली असता किडीचे नियंत्रण झाले. कंदकूज रोग नियंत्रणासाठी रिडोमील गोल्ड ३० ग्रॅम/पंप फवारणी केली. शिवाय कंदकूज प्रतिबंधात्मक म्हणून जर्मिनेटर १ लि. + हार्मोनी ५०० मिली + ब्लु कॉपर १ किलोची/एकरी आळवणी केली. त्यामुळे कंदकुज, लिफ ब्लाच (पानावरील ठिबके), टिक्का या रोगाचे नियंत्रण झाले. आपल्या शेड्युल प्रमाणे माझ्या नोव्हेंबर पर्यंत ५ फवारण्या व २ ड्रेंचिंग झाल्या आहेत. आतापर्यंत पानांवर कुठलाही ठिपका किंवा डाग नाही. तसेच झाड हिरवेगार आहे. यापुढे मी राईपनरचे ड्रेंचिंग एकरी १ लि. प्रमाणे करणार आहे. मी दरवर्षी हळद पीक घेत होतो, पण यावर्षी सारखी हळद एकाही वर्षी झाली नाही.

मला दरवर्षी २० ते २३ क्विंटल वाळलेली हळद होत होती, पण यावर्षी मला कमीत कमी ३० क्विंटल वाळलेली हळद होईल. कारण नोव्हेंबरच्या शेवटच्या हप्त्यात एका गड्ड्याचे वजन सरासरी ७०० ग्रॅम आले आहे. आणखी ३ महिने शिल्लक आहेत. आता थंडीमध्ये हळदीच्या गड्ड्याची चांगली जोमदार वाढ होत आहे. मला आपल्या डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे हळदीला ६ - ८ फुटवे निघाले आहेत. मी आतापर्यंत एकरी ४ बॅग कल्पतरू खत वापरले आहे. कल्पतरू खत हे उत्कृष्ट सेंद्रिय खत आहे. त्यामुळे जमीन भुसभुशीत राहते. शिवाय जमिनीत हवा, पाणी यांचे संतुलन राहते. त्यामुळे मुळाचा जारवा वाढण्यास मदत होते. रासायनिक खतात बचत होते तसेच जमिनीत येणाऱ्या (पोसणाऱ्या) पिकासाठी कल्पतरू खत वरदान ठरत आहे.