कलकत्ता झेंडू व कापसास डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा यशस्वी वापर

श्री. रोशनभाऊ नगराळे, मु.पो. गायमुख, ता. सेलू, जि. वर्धा


मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा काही दिवसापासून वापर करत आहे. आमच्या भागात औषधे मिळत नव्हती तेव्हा ती नागपूरवरून आणून वापरत होतो. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची रिझल्ट चांगले मिळत होते. पुढे आमच्या भागातील पार्थ अॅग्रो यांच्याकडे डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे मिळू लागली. मग अधिक माहितीसाठी एक दिवस पार्थ अॅग्रो यांची भेट घेतली. तेव्हा मला राजेश आदमाने यांनी आपल्या भागातील डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधी श्री. कुकडे यांचा मो. नं. ७५०७५०३११७ दिला. मग मी त्यांना फोन करून शेतावर बोलावले. २ दिवसांनी ते शेतावर आले व डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी कलकत्ता झेंडू आणि शेवंती या पिकांची पाहणी करून मार्गदर्शन केले, तसेच 'कृषी विज्ञान' मासिकाबद्दल सुद्धा माहिती दिली. या दोन्ही पिकांना त्यांनी थ्राईवर ४० मिली + क्रॉपशाईनर ४० मिली + राईपनर ४० मिली + प्रोटेक्टंट ३० ग्रॅम हे प्रती पंपास घेऊन फवारण्यास सांगितले. त्याप्रमाणे फवारणी केली असता चांगला फायदा झाला. माझी फ़ूले ऐन गणपतीमध्ये चालू झाली. माल भरपूर निघाला मात्र पाहिजे तसा भाव यावर्षी मिळाला नाही. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे मी कपाशी पिकावर सुद्धा फवारली. तर मला त्याचा सुद्धा चांगला फायदा झाला. माझा कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला नाही. तसेच पात्यांची संख्या जास्त असून गळ न होता बोंडे चांगली पोसली. आतापर्यंत माझ्या शेतातील कापूस १ बॅग बियापासून ५ क्विंटल निघाला आहे आणि अजून कमीत कमी ५ क्विंटल निघेल. मी या औषधांची फवारणी तुरीवर सुद्धा केली आहे आणि तुरीचे पीक चांगले बहारात आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा उतारा निश्चितच अधिक मिळेल असे वाटते.