डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वेळापत्रकाप्रमाणे वापरल्याने २ एकरात ३६ टन दर्जेदार कांदा
श्री. दत्तात्रय बाळासाहेब क्षीरसागर,
मु. पो. सोनवडी बु.॥, ता. फलटण, जि .
सातारा.
मोबा. ९५५२८५९५२९
आमचे एकूण ४ एकर क्षेत्र आहे. जमीन भारीकाळी आहे. पाणी विहीरीचे आहे. आम्ही कांदा,
ऊस, तरकारी छोटे - छोटे प्लॉट करतो.
१० वर्षापूर्वी २ एकर गरवा कांदा लावलेला होता. लागण वाफा पद्धतीची होती. पहीली खुरपणी झाल्यानंतर कल्पतरू सेंद्रिय खताच्या एकरी २ बॅगा वापरल्या होत्या. रोपे जर्मिनेटर च्या द्रावणात बुडवून पुनर्लागवड केली. त्यामुळे पांढरीमुळी कार्यरत होऊन पातीची फुट नेहमीपेक्षा लवकर झाली. प्लॉट पुनर्लागवडीनंतर १५- २० दिवसांचा झाल्यावर जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी २५० मिली आणि राईपनर १०० मिली व प्रोटेक्टंट १०० ग्रॅमची १०० लि. पाण्यातून फवारणी केली. त्याने कांदा वाढीत आठवड्याच्या आत फरक जाणवला, प्लॉट निरोगी दिसत होता. पुढे पहिली खुरपणी केल्यानंतर प्लॉट ३५- ४० दिवसांचा असताना दुसरी फवारणी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी ५०० मिली, प्रोटेक्टंट ५०० ग्रॅमची १५० लि. पाण्यातून फवारणी केली. त्यामुळे कांद्याची वाढ निरोगी होऊन प्लॉटला काळोखी आली.
कांदा ५०- ५५ दिवसांचा असताना थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी १ लि. राईपनर ५०० मिली, प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम ची २०० लि. पाण्यातून तिसरी फवारणी केली. त्यानंतर ८० - ८५ दिवसांनी शेवटची चौथी फवारणी थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी १ लि. राईपनर ७५० मिली, प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम ची २५० लि. पाण्यातून केली.
एवढ्यावर कांद्याची फुगवण भरपूर होऊन पत्तीला चमक आली. सर्व कांदा डबल पत्तीचा निघाला. एकरी ३०० पिशवी ६० किलो वजनाची म्हणजे २ एकरात ३६ टन कांदा उत्पादन मिळाले. हा कांदा जुलैपर्यंत साठवून नंतर कोल्हापूर मार्केटला विकला. त्यावेळी ३०० ते ३५० रू. क्विंटल भाव मिळाला. भाव फारच कमी होते.
पुढे दुष्काळी परिस्थितीत पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने दुर्लक्ष झाले. त्यातच आर्थिक परिस्थितीही थंडावली. हा काळ ६ - ७ वर्षांचा राहिला. नंतर पाऊसकाळ बऱ्यापैकी होऊ लागल्याने पीक उत्पादन बऱ्यापैकी येऊन आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ लागली. त्यातूनच ३ वर्षापूर्वी शेतीपासून ७००० फूट अंतरावर २ गुंठे विहीरीसाठी जागा घेऊन विहीर खोदली, तिला पाणी भरपूर लागले आहे. तेथून पाईप लाईन करून पाण्याचा वानवा संपला. आता ८६०३२ ऊस सव्वा एकर, डाळींबा दीड एकर बाग आहे. लागवड १५' x १२' वर आहे. याचा मृग बहार डॉ.बावसकर तंत्रज्ञानानुसार धरणार आहे, त्यासाठी आज (२८ मे २०११) सरांचे मार्गदर्शन घेण्यास आलो आहे.