थंडीत न निघणारी कळी उत्कृष्ट निघून दर्जेदार माल डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने पहिल्याच प्रयोगात २॥ एकरात २॥ लाख
श्री. संतोष शामराव सुडके,
मु. पो. महमदाबाद (शे.), ता. मंगळवेढा, जि. सोलापूर
आमच्याकडे जवळपास ७ एकर डाळींब बाग आहे. त्यामध्ये गणेश १॥ एकर, रूबी १ एकर, भगवा २ एकर आणि नवीन भगवा
२॥ एकर असे क्षेत्र आहे.
गणेश डाळींबास जवळपास ७ वर्षे झाले आहे. भगवा व रूबी ४ ते ५ वर्षाची बाग आहे. त्यानंतर नवीन लावलेली भगवा बाग २॥ वर्षाची आहे. त्याचा ऑगस्टमध्ये (२०११) पहिला बहार धरला, परंतु कळी एकसारखी निघाली नाही. निघालेली कळीदेखील कमीच होती. त्यामुळे बहार फेल गेला.
परत १॥ महिना ताण देऊन १२ ऑक्टोबर (२०११) ला बहार धरला. त्यावेळी शेणखत व डी.ए.पी. अर्धा किलो/ झाड असा डोस दिला. थंडीत कळी निघत नाही, असे लोक म्हणत होते. परंतु मी पानगळ केल्यानंतर १० दिवसांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे जर्मिनेटर १ लि. व प्रिझम १ लि. ची फवारणी केली. श्री. गायकवाड यांनी परत पहिल्या फवारणीनंतर जर्मिनेटर १ लि. व थ्राईवर १ लि. ची २०० लि.पाण्यातून फवारणी करण्यास सांगितले. त्याप्रमाणे फवारणी केली असता पालवी चांगली निघाली. मी इतर बुरशीनाशके फवारली नाहीत. फक्त किटकनाशकाच्या २ फवारण्या केल्या होत्या. २ फवारण्यानंतर परत ८ दिवसांनी जर्मिनेटर, थ्राईवर प्रत्येकी १ लि. ची २०० लि. पाण्यातून फवारणी केली असता कळी भरपूर व मोठी निघाली. बहार धरताना मी जर्मिनेटर ची आळवणी केली नव्हती. परंतु कळी सेटिंग होताना मी जर्मिनेटर २ लि. चे २॥ एकरसाठी आळवणी केले. त्यानंतर फळ लिंबू आकाराचे असताना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे क्रॉंपशाईनर व न्युट्राटोन स्प्रे घेतला. त्यानंतर परत १५ दिवसांनी फक्त क्रॉंपशाईनर फवारले व फळ काढणीच्या १॥ महिना अगोदर क्रॉंपशाईनर व राईपनर यांच्या १५ दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या केल्या. २।। एकरात तोडणीला २८०० किलो माल निघाला.त्याला ६५ रू./किलो भाव मिळाला. परत दुसऱ्या तोडणीच्या वेळेस १६०० किलो माल निघाला. त्याला ४३ रू. /किलो दर मिळाला. मला जवळपास या २।। एकर क्षेत्रातून २।। लाख रुपये उत्पन्न मिळाले असून त्याला सर्व खर्च ७० हजार रुपये आला. खर्च वजा जाता १ लाख ८० हजार रू. पहिल्याच बहारापासून नफा मिळाला.