नवीनं भगव्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी संजीवनीच !
श्री. पंडितराव गणपतराव वाकचौरे,
मु.पो. वाकी, ता. चांदवड, जि. नाशिक
फेब्रुवार २०१२ मध्ये आम्ही भगवा डाळींबाची १ एकरमध्ये १० x १०' वर लागवड केली. जमीन
हलक्या प्रतीची असून झाडास ठिबक केली आहे. या जमिनीत अगोदर मक्याचे पीक घेतले होते.
आम्ही लागवड केली त्यावेळी आमच्या शेजारील शेतकऱ्यांचा २ महिन्यांचा डाळींब प्लॉट होता.
मला आपल्या डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी श्री. ईश्वर शिंदे यांनी प्रत्यक्ष प्लॉट
ची पाहणी करून मार्गदर्शन केले. त्यानुसार त्यांनी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर
१५ लिटर पाण्यास प्रत्येकी ६० मिली घेण्यास सांगून १२ ते १५ दिवसाच्या अंतराने स्प्रे
करण्यास सांगितले. त्यानंतर लासलगाव येथील सदगुरू कृषी सेवा केंद्र यांच्याकडून ही
औषधे घेऊन त्याचे आतापर्यंत ५ स्प्रे घेतले आहेत. परिणामी माझ्या प्लॉटमधील रोपांची
वाढ वेगाने झाली. मर झाली नाही. करपा व इतर रोग दिसलाच नाही. पट्टी चांगली होऊन शाईनिंग
भरपूर आली. प्लॉट रोगमुक्त आहे. शेजारील प्लॉट माझ्या प्लॉटच्या २ महिने अगोदरच असूनही
त्याच्यापेक्षाही वाढ चांगली झाली आहे. येणारे जाणारे लोक प्लॉट बघत राहतात. ही किमया
फक्त आम्ही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळेच सध्या केली व यापुढेही वेळोवेळी
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करणार आहे. सध्या झाडे २ फूट उंचीची निरोगी
आहेत.