'सिद्धीविनायक' शेवग्यात पपई, सोयाबीन व भुईमूग आंतरआंतरपीक डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने यशस्वी

श्री. विलास मंडलिक,
आर. के,नगर , कोल्हापूर.
मोबा. ९६५७२१५११६


गेल्या २ वर्षापासून मी आपल्या टेक्नॉंलॉजीने व कोल्हापूर प्रतिनिधी श्री. केदार मोरे यांच्या सल्ल्यानुसार माझ्या आर. के. नगर कोल्हापूर येथील ५ एकर क्षेत्रावरती पपई,वांगी, कांदा, शेवगा, नारळ ही पिके यशस्वीरित्या घेत आहे.सुरुवातीला १० गुंठे पपई व १० गुंठे शेवगा लावला आहे. त्याच्या उत्पादनामुळे मी संपूर्ण ५ एकर क्षेत्र मोरेंच्या सल्ल्याने 'सिद्धीविनयक' शेवग्यामध्ये आंतरपीक म्हणून पपईची लागवड करीत आहे.

मोरिंगा शेवग्याची रोपे पिशवीमध्ये तयार करून त्याची ८ x ८ फूट अंतरावरती १ x १ x १ फुटाचा खड्डा घेऊन त्यामध्ये ८ ते ९ इंच उंचीची रोपे लावली आहेत व मधल्या ओळीत ५ फुटाच्या अंतरावर तैवान ७८६ पपईची रोपे लावत आहे. रोप लावतेवेळी प्रत्येक रोपास खड्डयामध्ये कल्पतरू सेंद्रिय खत १०० ग्रॅम आणि शेणखताचा वापर केला. रोप लावल्यानंतर ८ दिवसांनी १०० मिली जर्मिनेटर + १० लि. पाणी याप्रमाणातील द्रावणाचे आळवणी केले. त्यानंतर दर १५ ते २० दिवसाच्या अंतराने सप्तामृताच्या फवारण्या घेत आहे.

पपई व शेवगा लहान असेपर्यंत या पिकांमध्ये खरीपातील भुईमूग व सोयाबीन घेणार आहे. आम्हाला आशा आहे की, डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने या पिकांचेदेखील दर्जेदार उत्पादन घेवू. शेवगा व पपई कोल्हापूर मार्केट जवळ असल्याने या दोन्ही मालाला चांगला दर मिळेल, असा अंदाज आहे आणि यातील भुईमूग व सोयाबीन उत्पादन बोनसच ठरणार आहे.