दुष्काळ व कोरडवाहू जगासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने घडविलेला एक क्रांतीकारी आशावादी सिद्धांत !
श्री. घनश्याम गौड (बी. ई.),
मु. थाम्बडिया, पो. पांचालासिद्धा, ता. खिवंसर,
जि. नागोर- ३४१०२५ (राजस्थान)
मोबा. ०८२९०३४७३३५/९८२३९६६६८८
माझे पुर्ण शिक्षण पुण्यामध्ये झाले आहे. माझे चुलते धनंजय महाराज यांचा पुण्यामध्ये
केटरींगचा व्यवसाय आहे. गावी राजस्थानमध्ये आमची ४५ एकर जमीन असून काही जमीन वालुकामय
तर काही काळ्या मातीची अशी ३ ठिकाणी विभागून आहे.
पावसाळ्यात आम्ही काळ्या जमिनीत भुईमूग, बाजरी, तीळ , कपास आणि वालुकामय जमिनीत मूग, मटकी, गावर ही पिके घेतो. तर रब्बी हंगामात काळ्या जमिनीत जीरा, गहू, इसबगोल, कांदा, लसूण ही पिके घेतो. ३ ठिकाणी ३ वेगवेगळे बोअर आहेत. पावसाच्या पाण्यावर आणि बोअरच्या पाण्यावर (स्प्रिंकलर - तुषारसिंचनवर) ही पिके घेतो.
आमच्या भागात पाण्याचे अत्यंत कमी प्रमाण आहे. पाण्याची पातळी ५०० ते ७०० फूट खोल गेली आहे. अशा परिस्थितीत आम्ही बोअर घेतले.त्याला २॥ इंच पाणी ५०० फुटावर एवढे लागले की, स्प्रिंकलरवर घरची ४५ एकर जमीन भिजून पाणी शिल्लक राहत होत, म्हणून शेजारची ५० एकर जमीन भाड्याने घेऊन आपल्या बोअच्या पाण्यावर पिके घेऊ लागलो. २॥ इंची बोअरवेल असून ४५ एच. पी. ची. मोटर (टेक्स्मो वरुण, गुजरात) कंपनीची बसविली आहे.
भुईमूगाचे ४ - ५ महिन्यात एकरी १७ क्विंटल उत्पादन मिळते. मोहरी ४ महिन्यात ८ क्विंटल, गवारगम बी ४ महिन्यात ३ - ३ ॥ क्विंटल, कापूस ४ -५ महिन्यात १० क्विंटल, जिरा ४ महिन्यात ४ क्विंटल,गहू ४ - ५ महिन्यात २० क्विंटल, इसबगोल ४ महिन्यात ४ क्विंटल असे सरासरी उत्पादन मिळते.
आमच्या वडीलांनी सरांशी चर्चा करताना आमच्या भागात डाळींब लावायचे आहे. ते यशस्वी होण्यासाठी आपले मार्गदर्शन हवे आहे. असे सांगितले होते. त्यावरून सरांनी सांगितल्याप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी कृषी विज्ञान केंद्र, सटाणा येथून डाळींब पिकासंदर्भात संपूर्ण माहिती व तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन घेतले. तेथील डाळींब बागांना आम्ही भेटी दिल्या.
राजस्थानात डाळींबाची फळबाग प्रथमच यशस्वी
डाळींब पिकाबाबतचे बारकावे समजून घेतले. कंपनी प्रतिनिधी श्री. ढगे यांच्या मार्गदर्शनानुसार तेथून भगवा डाळींबाची १२०० रोपे ऑगस्ट २०१२ मध्ये घेऊन त्याची काळ्या जमिनीत १२ x ९ फुटावर २५ ऑगस्ट २०१२ ला लागवड केली.
लागवडीच्यावेळी खड्ड्यात कल्पतरू सेंद्रिय खत १२०० झाडांसाठी ३०० किलो वापरले. रोपे जर्मिनेटरच्या द्रावणात बुडवून लावली. त्यामुळे सर्व रोपे फुटून आली. आठ महिन्याच्या काळात आतापर्यंत २० - २५ दिवसांच्या अंतराने आवश्यकतेनुसार डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृताच्या ७ - ८ फवारण्य केल्या आहेत. झाडांची वाढ अतिशय चांगली ४ फुटांपर्यंत झाली आहे. त्याची २ - ३ वेळा छाटणी केली आहे. ५ - ६ महिन्यातच फुलकळी आणि फळे लागली होती. मात्र झाडे लहान असल्याने छाटणीच्यावेळी फुले, फळे काढून टाकली.
डाळींबाला ठिबक केले आहे. पहिले दिवसाड १ ते १॥ तास १ ड्रिपर चालवत होतो. नंतर २ तास चालवू लागलो. सध्या झाडे मोठी ८ - ९ महियाची झाल्याने एका झाडाला २ ड्रीपर बसविले असून २ तास पाणी दिवसाड देतो. एका ड्रिपरमधून १ तासाला ८ लि. पाणी पडते. असे २ ड्रीपर २ तास चालविले की , दिवसाड ३२ लि. पाणी प्रत्येक झाडास याप्रमाणे देतो.
आंबे प्लॅस्टिकचे नसून खरोखरीचेच लागले आहेत
आमच्या भागात तापमान अतिशय उच्च ४६ डी. से. ते ४८ डी. से. असते आणि जमीन रेताड आहे. त्यामुळे आंबा, नारळ ही पिके येत नाहीत. मात्र आम्ही महाडवरून रत्नागिरी हापूस आंब्याची २ वर्षाची ५ रोपे आणली होती. ती पुण्यामध्ये १॥ - २ महिने ठेवल्यानंतर पुढे डाळींबासोबत त्यांची राजस्थानला लागवड केली. आंबा, नारळ आमच्याकडे अजिबात येत नाही. मात्र या आंब्याला डाळींबासोबत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या केल्यामुळे हापूस आंबा चांगला वाढला. त्याला ४ - ५ महिन्यात (जानेवारीमध्ये) मोहोर लागून प्रत्येक झाडावर १५ -२० आंबे लागले. या आंब्याची व डाळींबाची आमची मुलाखत प्लॉट फोटोसह 'राजस्थान पत्रिका' या दैनिक अंकात प्रसिद्ध झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे फोन आले. वृत्तपत्रातील फोटो पाहून अनेकजण आम्हाला फोन करून विचारू लागले की "झाडाला हे प्लॅस्टिकचे आंबे लावले आहेत काय ? " तेव्हा त्यांना आम्ही सांगितले, " तुम्ही प्रत्यक्ष येऊन प्लॉट पहा." कारण हे आंबे प्लॅस्टिकचे नसून ते खरोखरीचे आंबे झाडाला डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने लागले आहेत.
पाऊस नाही झाला तर जमीन अनउपजाऊ ठरते, अशा जमिनीत १२ महिन्यात कधीच धान्य किंवा गवतही नीट येत नाही तेथे डाळींब यशस्वी अशा बातम्या वर्तमान पत्रातून प्रसारीत झाल्यामुळे अनेक शेतकरी प्रभावित झाले.
आड हंगामातही गावारगमसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी यशस्वी
दुसरा प्रयोग आम्ही गवारगम या पिकावर केला. गवार लागवडीचा सर्वसाधारण पाऊस पडल्यानंतर जुलै अखेरीचा काळ असतो. मात्र आम्ही एप्रिल अखेरीस ४७ डी. से तापमान असताना गवारीचे बी एकरी ५ किलोप्रमाणे जर्मिनेटरची बीजप्रक्रिया करून ट्रॅक्टरने पेरणी केली. तर अति उष्णतेमध्येदेखील गवारीची उगवण सिझनप्रमाणे चांगली झाली. शिवाय रोप मेले नाही. हे बी आमच्या तालुक्यातील ओळखीच्या शेतकऱ्याकडून आणले होते. त्यांचे - आमचे घरचे संबंध असल्याने बियाचे पैसे घेतले नाहीत. एरवी ५०० रू. किलो बियाचा दर असतो. हा गवारीच वाण स्पेशल आहे. जमिनीपासून खोडाला ६ इंचापासून तसेच कांद्यांना भरपूर शेंगा लागल्या आहेत.
सध्या या प्लॉटला शेंगा भरपूर लागल्या आहेत. त्याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी करणार आहे. म्हणजे शेंगातील बी टणक भरून उत्पादन वाढेल. एरवी ३।। क्विंटल उत्पादन एकरी मिळते. तेथे ५ क्विंटलपर्यंत उत्पादन सहज मिळेल असे वाटते. या गवारीला ३ ते ४ पाण्याच्या पाळ्या दिल्या असून अजून २ पाणी लागतील. पाऊस झाल्यावर पाणी देण्याची गरज भासणार नाही.
जिऱ्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी म्हणजे सोन्याचे अंडे
जिऱ्याचे पीके वहिवाटी खालील नोहमीच्या जमिनीत चांगले येते. मात्र नवीन जमिनीत जिऱ्याचे उत्पादन येत नाही. जिरे सर्वसाधारण सप्टेंबरमध्ये पेरतात. आमच्याकडे म्हणतात, "जिरे आले तर सोन्याची अंडी देते अन्यथा नाही आले तर कोंबडीचेही अंडे मिळत नाही" याचा अर्थ असा की, जिऱ्याला सर्वसाधारण १५ ते १६ डी. से. तापमान आवश्यक असते.
शेंड्यावर अती थंड हवेचा सुरकीचा आघात झाल्याने जिरे भरत (वजनदार होत) नाही. ते पोचट राहते. हातावर घेतले तर मुरमुऱ्यासारखे वाऱ्याने हातावरून उडून जाते. थंडी पडून सकाळी वारे सुटले तर सुरकी पडते, त्याला थंडीत 'पाला पडणे' असे आमच्याकडे म्हणतात. अशा परिस्थितीत अर्धा किलोदेखील उत्पादन एकरी मिळत नाही.
गेल्या हंगामात तापमान अतिशय खाली ५ - ६ डी. से. वर गेल्याने अति थंडीने जिऱ्याची वाढ होईना. उगवणीनंतर १५ दिवस झाले, तरी जिऱ्याची वाढ होईना म्हणून साप्तमृताचे २ स्प्रे मारले. याला कल्पतरू दिले नाही, नुसत्या २ फवारण्यावर या ३ एकर जिऱ्याचे एकरी ४ क्विंटलप्रमाणे १२ क्विंटल उत्पादन मिळाले. यावेळी शेजारच्या बऱ्याच शेतकऱ्यांचे जिरे वाया गेले तर काहींना २॥ ते ३ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले.
वृत्तपत्रांमधून आमची माहिती प्रसारित झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी, कृषी अधिकाऱ्यांनी, नेत्यांनी याची दखल घेतली. आमच्या तालुक्यातील एका माणसाने ८००० तैवान पपईची लागवड केली होती. तर त्याने आमच्या शेतावर येऊन पिकांची पाहणी करून त्यांच्यासाठी १० -१० लि. सप्तामृत मागविण्यासाठी आम्हाला सांगितले. आतापर्यंत ८० - ९० शेतकऱ्यांनी प्लॉटची पाहणी केली असून २ - ३ शेतकरी तर ८० - ९० किमी अंतरावरून येऊन माहित घेतली.
राजस्थानसारख्या वाळवंटी भागात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने असे पथदर्शक मॉडेल निर्माण केले आहे की, ज्याचा सैबेरियाच्या वाळवंटापासून इस्राईलपर्यंत हे मॉडेल लोकांना आदर्श ठरेल. कारण हा प्लॉट एका बी. ई. मुलाने यशस्वी केला आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी २ वर्षे पाऊस कमी झाला म्हणून खचून न जाता डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरून असे आदर्शवत मॉडेल अनेक ठिकाणी कार्यरत आहेत, त्यातून त्यांनी प्रेरणा घेऊन परिस्थितीवर मात करावी.
मी बी. ई. (कॉम्प्युटर) केले असून हैद्राबादला इफको कंपनीत मुलाखतीसाठी मला बोलविले आहे. माझे चुलते म्हणतात, कोणाच्या हाताखाली नोकरी करून महिना २५ हजार कमविण्यापेक्षा डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरून आपण जर आपल्या भागात कधीही शक्य न झालेले प्रयोग शक्य करू शकलो, तर येथील शेती निश्चितच सुजलाम, सुफलाम करून शेतकरी आपणास दुवा देतील.
त्यासाठी आम्ही नागोर जिल्हा आणि जिल्ह्याच्या बाजूने असणाऱ्या अजमेर, जोधपूर, बिकानेर, चिरू, शिक्कर या सहा जिल्ह्यांसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची डिस्ट्रीब्युटरशीप घेत आहोत. आज (१५ जून २०१३) रोजी आमच्या डाळींब, गवारगमसाठी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी १० लि. आणि शेजारच्या शेतकऱ्याच्या ८ हजार तैवान पपईसाठी जर्मिनेटर १० लि. आणि थ्राईवर, क्रॉंपशाईनर, न्युट्राटोन प्रत्येकी ५ लि. घेऊन जात आहे.
त्यामुळे असा आत्मविश्वास व आशावाद आहे की , "शेती चांगल्या शिकलेल्या मुलांनी समजून - उमजून ती एक कला व उत्कृष्ट शास्त्र म्हणून केली तर चांगल्या पर्वारणाचे साऱ्या धरतीचे वाळवंट मानवाने प्रदुषणाने केले, तरी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सहाय्याने नुसते ओयासीस होणार नाही, तर तेथे काश्मिर , स्वित्झर्लंड, अॅमॅझोनसारखे 'रेन्फॉरेस्ट ' सुद्धा शक्य आहे," सर !

बोअरला सुदैवाने परमेश्वर कृपेने
२॥ इंच जाडीचे पाणी लागले.