कोकणातील डोंगराळ शेतीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने फळपिके यशस्वी करण्याचा एक प्रयत्न !

श्री. संदीप वासुदेव काजरेकर,
(श्रृती मंगल कार्यालय रोड, पुणे)
मु. पो. मुणगे, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग.
मोबा. ९४२२०१७२४२


डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची आमच्या संपर्क ५ - ६ वर्षापासूनचा आहे. आमचे पुण्यामध्ये श्रृती कार्यालय आहे. मला शेतीची फार आवड आहे. मात्र आमच्याकडे शेती नव्हती. सरांच्या आशिर्वादाने आम्ही ५ वर्षापूर्वी मुणगे येथे मामाच्या गावी मामाची ५॥ एकर डोंगराळ जमीन १ लाख २५ हजार रू/ एकरप्रमाणे घेतली. त्यामध्ये कोणतीच फळझाडे नव्हती. ५॥ एकरपैकी १॥ एकरमध्ये २॥ वर्षापुर्वी हापूस आंबा ७५ झाडे, केशर आंबा ५ झाडे २५' x २५ ' वर तसेच काजू वेंगुर्ला - ४ ची २० झाडे आणि जांभूळ कोकण बहाडोलीची कलमी झाडे आहेत.

आमच्या जमिनीच्या डोंगर उताराला ओढा बारमाही वाहतो. तेथून ५०० फूट उंचीवर पाण्याची टाकी बांधली आहे. त्यामध्ये सबमर्शिबल मोटरने पाणी भरतो. त्याच पाईप लाईनला रिटर्न वॉल २ ठिकाणी बसविले आहेत. टाकी भरल्यानंतर उताराला त्याच पाईपलाईनने विनामोटर पाणी फळझाडांना वॉल फिरवून दिले जाते.

या सर्व फळबागेला पुर्ण डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरायचे आहे. आम्ही 'कृषी विज्ञान' मासिकाचे वर्गणीदार आहोत. 'कृषीविज्ञान' मासिक पुण्यातील पत्त्यावर नियमित येते. त्यातील शेतकऱ्यांचे अनुभव आम्हाला अधिक प्रेरणा देऊन जातात. आमच्या भागात पारंपारिक पद्धतीने रासायनिक खतांचा, कल्टरचा वापर केला जातो. त्याने तात्पुरते उत्पादन मिळते, मात्र जमिनी कायमच्या खराब होतात. याची लोकांना कल्पना नाही. तेथील शेतकरी जागृत नाहीत. नवीन तंत्रज्ञान वापरण्यास फारसा उत्साह त्यांच्यात दिसत नाही.

आमच्या हे पुर्ण लक्षात आले आहे. म्हणून आम्ही रासायनिक खते अजिबात वापरणार नाही. पूर्णत सेंद्रिय उत्पादन घेणार आहे.

सध्या आंबा २॥ वर्षाचा होऊनदेखील गुडघ्याएवढाच आहे. त्याची वाढ होत नाहीये. तेव्हा सरांच्या मार्गदर्शनानुसार डॉ.बावसकर तंत्रज्ञान सर्व फळबागांना वापरणार आहे. आमच्या जमिनीपासून १५० मिटरवर समुद्र आहे. त्या भात पाऊस खूप असतो.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवग्याची वडीलांनी १०० बियांची (१ पाकिट) लागवड ५ वर्षापुर्वी केली होती. जादा पावसाने त्यातील फक्त १२ झाडे राहिली आहेत. त्यातीलही काही झाडे वादळी वाऱ्याने मोडली नाहीत. त्यामुळे त्याची छाटणी दरवर्षी १ ते २ फुट खोड ठेवून करतो. त्याला डेंग्य आधारासाठी लावतो. यापैकी एक झाडतर पुर्णत: मोडून बांधावर वाकले (झुकले) आहे. त्याला डेंग्या लावल्या आहेत. त्या एका झाडाला एवढ्या शेंगा लागतात की, पाल्यापेक्षा शेंगाच अधिक दिसतात. वर्षाला एका झाडापासून ७ - ८ हजार रू. च्या शेंगा निघतात.

पावसाळ्यात पाऊस जादा असल्याने फुलच टिकत नाही. त्यामुळे शेंगा लागत नाहीत. फक्त उन्हाळ्यातील बहार मिळतो. शेंगा गावरान शेंगेपेक्षा जास्त गरयुक्त व चवदार असल्याने लोक गावराण शेंगेपेक्षा याच शेंगा विकत घेतात. पावसाळ्यात शेंगा मिळत नसल्याने माझ्या आईने उन्हाळ्यात मिळालेल्या शेंगामधील काही शेंगा शिजवून त्याचा गर बियांसह काढून त्याचे सांडगे करतात तसे वाळवून तो गर पावसाळ्यात भाजीमध्ये वापरला असता भाजीला विशिष्ट चव येते. त्यामुळे सराव भाज्यामध्ये या शेवग्याच्या गराचा वापर करतो.

माकडांच्या त्रासापासून दिवाळीतील छोट्या कंदीलाच्या बेगडी झुरमळ्यामुळे सुटका

आमच्या भागात माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होतो. अनेक प्रकारचे प्रयोग केले आहेत. मात्र त्याचा फारसा काही उपयोग होत नाही. यावर सरांनी आता सांगितले की, दिवाळीतील आकाश कंदीलला ज्या झुरमुळ्या असता तसे झुरमुळ्याचे कंदील शेतात झाडांना बांधा. त्या झुरमुळ्याचा वाऱ्याने विशिष्ट आवाज होतो. त्या आवाजाने माकड शेतात येत नाहीत असा अनुभव आहे. तो प्रयोग करणार आहे.

आमच्या मामांची ४०० हापूस आंब्याची बाग आहे. ते स्वत: बी. एस्सी. अॅग्री असून भूविकास बँकेत नोकरी करतात. त्या भागात मजूर मिळत नाहीत. त्यामुळे जे आंब्याचे व्यापारी आहेत त्यांनाच करार पद्धतीने झाडे विशिष्ट रक्कमेला विशिष्ट कालावधीसाठी ठरवून दिली जातात. यामध्ये ते व्यापारी कमी कालावधीत उत्पादन कसे जादा मिळेल एवढेच पाहतात. त्यांना बाग किती दिवस जगेल, पुढे उत्पादन देऊ शकेल की नाही याच्याशी काही घेणे - देणे नसते. त्यामुळे ते झाडांना इतका रासायनिक खतांचा, कल्टारचा मारा करतात की , ती झाडे २ - ३ वर्षे त्यांनी केलेल्या कराराच्या कालावधीत भरघोस उत्पादन देतात. मात्र नंतर ती निकामी होतात.

यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. त्यासाठी आम्ही पुर्णत : सेंद्रिय खते, औषधांचे वापर आमच्या शेतावर करणार आहे. मामांना देखील सेंद्रिय शेतीकडे वळविले आहे. त्यांना त्याचे फायदे समजले आहेत. मात्र अगोदर बागांना कल्टारची सवय लागल्यामुळे गेली २ वर्षात हापूस आंब्याचे कसलेही उत्पादन त्यांना मिळाले नाही. याकरिता आता डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरणार आहेत.

आमच्या गावात डॉ.नायसे (मोबा. ९४२३३०५५१९) हे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरतात. ते मुळचे अकोला (विदर्भ) जिल्ह्यातील आहेत. मात्र त्यांनी आमच्या गावात शेती घेऊन ते तेथेच स्थायिक झाले आहेत. आम्ही आता सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना जागृत करून ग्रुप करून डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा तेथे कार्यक्रम घेणार आहोत. सरांच्या मार्गदर्शनाने आमच्या भागातील बागांना निश्चितच पुनर्जिवन मिळेल, अशी आशा आहे.