खारपड जमिनीत सोयाबीनचा उतारा १५ क्विंटल

श्री. संजय सदाशिव ठाकूर,
मु. पो. कारवी, ता. कराड, जि. सातारा.
मोबा. ९८९०९२४९२९


माझ्याकडे मौजे कारवी येथे ५ एकर चोपणयुक्त क्षारपड जमीन आहे. त्यामध्ये पारंपारिक पद्धतीने मी शेती करत होतो. माझे नातेवाईकाकडून डॉ.बावसकर तंत्रज्ञानाबद्दल माहिती मिळाली. त्यावरून मी मे २०१२ मध्ये पुणे हेड ऑफिसला जाऊन सविस्तर सर्व पिकांबद्दल माहिती घेतली. 'कृषी विज्ञान' मासिकाची वार्षिक वर्गणी भरून मासिक चालू केले आणि सोयाबीन एक एकर आणि भात २० गुंठ्यासाठी १ लि. सप्तामृत सेट पुणे ऑफिसवरून घेऊन गेलो. सांगितल्याप्रमाणे सोयाबीन ३० किलो बियाण्यासाठी १ लिटर पाणी आणि ६०० मिली जर्मिनेटरचे द्रावण करून बियाणाला पेस्ट केली. नंतर बियाणे सावलीमध्ये पसरून खडखडीत सुकल्यानंतर २। फूट रुंदीच्या सरीवर दोन्ही बाजूने अर्धा फुटावर टोकण केले. कल्पतरू ५० किलो एक बॅग खुरपणीच्यावेळी टाकली. ऑफिसमधून सांगितल्याप्रमाणे ४ फवारण्या सप्तामृताच्या केल्या असता एकरी १५ क्विंटल उतारा निघाला. तसेच घरातील इंद्रायणी भात २५ किलो बियाण्याची लागवड केलेली होती. त्यासाठी ऑफिसमधून लिहून दिल्याप्रमाणे ४ फवारण्या सप्तामृताच्या वेळोवेळी केल्या, त्यामुळे भात उत्पादन १२ क्विंटल उतारा मिळाला आहे. त्यामुळे पुणे ऑफिसला येउन ५ लि. सप्तामृत सेट घेऊन गेलो. जोड गहू २० गुंठे लागवडीनंतर १।। महिन्याने दोन फवारण्य केल्या. त्यामुळे गहू उत्पादन ५॥ क्विंटल मिळाले होते. त्यामुळे आज ऑफिसला सरांशी चर्चा करण्यासाठी आलो आहोत. २५ नोव्हेंबर २०१२ ला २६५ ऊस लावला. उगवण उत्तम होऊन पाने चांगली निरोगी आहेत.