कृषी पदवीधर झाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा प्रसारक (दूत)!

श्री. अमोल बांगर (B.Sc.Agri),
बालाघाट अॅग्रो सर्व्हिसेस, भुम, जि. उस्मानाबाद.
मो. ९९७०२९५२३२


श्री. रामेश्वर सुखदेव दराडे यांनी त्यांच्या शेतात दोन डोळ्याची ऊस लागवड करत असतांना आपल्या जर्मिनेटर औषधाचा वापर केला. त्यांनी १ लि. पाण्यात ३० मिली जर्मिनेटर याप्रमाणे घेवून त्यात कांड्या बुडवून शेतात लागण केली. ८६०३२ या जातीचा ऊस लावला. उसाची लागण केलेल्या दिवसापासून २१ दिवसात ऊस चांगला उगवून आल्याचे दिसून आले आणि त्यांच्या बरोबरीने लगन झालेला ऊस हा जर्मिनेटरचा वापर न केल्यामुळे २६ दिवसानंतर उगवण चालू झाली. एकाच दिवसाची लागण असून देखील ५ ते ६ दिवसांचा फरक पडलेला दिसून आला. ही जर्मिनेटरची किमया पाहून शेजारच्या शेतकऱ्यांनीही जर्मिनेटरला प्राधान्य दिले. मी स्वत B.Sc.Agri असून माझ्या मार्गदर्शनाने शेतकरी फळ पिकांसाठी, पालेभाज्यांसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरत असून उत्पादनात खात्रीशीर वाढ होत असल्याने शेतकऱ्यांचे मन जिंकले आहे. बालाघाट अॅग्रो सर्व्हिसेसवरून शेतकरी ही औषधे घेवून जात आहेत. श्री. बाळासाहेब गपाट यांनीही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांचा वापर करून या औषधांचे कौतुक केले आणि सहकाऱ्यांनाही ते वापरण्याचा सल्ला देतात. ते मु.पो. दिंडोरी, ता, भूम येथील शेतकरी आहेत. त्यांच्या निरीक्षणातून त्यांनी सांगितले जर्मिनेटर वापरल्यामुळे रोपांची गळ थांबते. मर होत नाही कांड्यावरील किड्यांसाठी प्रोटेक्टंट पावडर वापरल्याने आळीचे नियंत्रण झाल्याचे त्यांना जाणवले. पिकाच्या वाढीत फरक दिसून आला व प्रतिकारशक्ती वाढली. क्लोरोफायरीफॉस, क्विनॉलफॉस यांच्या वापराने शेती मालात त्यांना विषारी अंश सापडला. त्यामुळे ह्या रासायनिक खतांचा, औषधांचा वापर शक्यतो टाळावा असे डॉ.बावसकर सरांनी सांगितले आणि या विषारी अंशाला आळा घालण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी केली तर पिकातील विषद्रव्य (Residue) निघून जाण्यास मदत होते. सरांच्या सांगण्यावरून कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर केल्याने फुटवा वाढला. भुईमूग, कांदा यांच्या उत्पन्नात भर पडली, शेतकरी लांबून वारेवरगाव, भूम, वाशी येथून येऊन आमच्या कडून सप्तामृत आणि 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवगा बी घेवून जातात. भूम तालुक्यातील शेतकऱ्यांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर मोठ्या प्रमाणात करतांनाचा अनुभव सांगितला.

फॉस ग्रुप, थायमेट आणि बी. एच. सी. पावडरमुळे खूप साऱ्या शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याचे आढळून आलेले आहे. त्यामुळे या अशा रासायनिक औषधांना आळा घातला गेला पाहिजे. देशातील बहुतांश आजार हे श्वसनातून झाल्याचे आपणास दिसून येतात. यासाठी देशातील १२० कोटी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपली डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी खूप फायदेशीर आहे. भूम तालुक्यात खरीपात कापूस ऊस, मका, सूर्यफूल, ज्वारी यांचे उत्पादन होते. आमच्याकडे उसाचे प्रमाण खूप असल्याने सरांनी सप्तामृताचा वापर उसाच्या खोडव्यासाठी करण्यास सांगितला

तुकाराम उगल मुगळे यांनी ५ लि. जर्मिनेट कॅन पाटाच्या पाण्यातून सोडले. त्यामुळे पांढरी मुळी वाढल्याचे, जमीन भुसभुशीत झाल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय उसाची वाढ जोमात होत असल्याचे पण सांगितले. त्याचप्रमाणे भेंडी, दोडका, टरबूज यांना पण या औषधाचा चांगला फायदा झाला आणि उत्पन्नात भर पडल्याचे त्यांनी सांगितले.

वांग्यालासुद्धा आपल्या औषधांचा वापर केला. सरांनी सांगितले की, या तंत्रज्ञानाने वांग्याची चव रुचकर आणि पापलेट माश्याप्रमाणे लागायला लागल्याचे सरांच्या अमेरिकेतील नातवंडांनी सांगितले. जांभळ्या वांग्याला उन्हामुळे पांढरा रंग येतो आणि वांग्यातील बियांचे प्रमाण वाढलेले दिसून येते.

शेवग्याविषयी सर सांगतात की, "त्याची लागवड ही उत्तर - दक्षिण करावी. लागवडीतील अंतर हे ८' x ८' असे असावे. रान हलके असेल तर उत्तम आणि उन्हाळ्यात जर रानात पसरणारे व खुरटे गवत असेल तर ते काढून न टाकता तसेच ठेवावे. त्याने जमिनीत किंवा पिकाला दिलेल्या पाण्याचे उन्हामुळे बाष्पीभवन न होता जमिनीत ओलावा टिकून राहतो. रानातील गारवा टिकून राहिल्याने झाडांची वाढ चांगली होते. " सर सांगतात, "शेवगा हे सलग पीक जास्त पावसाच्या किंवा काळ्या मातीच्या ठिकाणी लावू नये आणि शेवगा हे आंतरपीक म्हणून खूप उपयोगी आहे, ते आपण कपाशीतही लावू शकतो. कारण कपाशीचे पीक जरी पावासने गेले तरी आंतरपीक शेवगा हा चांगला पैसा मिळवून देतो.

कपाशी ही भारी जमिनीत चांगली येते आणि शेवगा हा मध्यम ते मुरमाड जमिनीत चांगला येतो, असा सरांचा अनुभव आहे. पण तरीही भारी जमिनीतील कापसातील आंतरपीक शेवगा हा चांगला पैसा मिळवून देवून मुख्य पिकाचा दर्जा घेतो. जामखेडच्या हुशार विद्यार्थ्याला फी भरायला पैसे नसतांना त्यांनी शेतात सरांच्या सांगण्यावरून शेवग्याची लागवड करून उत्तम प्रकारे उत्पादन घेवून हे पैसे शेवग्यातून काढले आणि शिक्षणासह सर्व प्रपंचाचा खर्च त्याने शेवग्यातून केला आणि त्याने आपल्या शेवग्याचा पोजेक्ट सादर केला. शेवग्याच्या उत्पादनातून झालेला फायदा, त्याचे शिक्षण, उदरनिर्वाह यांची सर्व माहिती त्याने सांगितली आणि लोकांना शेवग्याचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमात त्याच्या शेवगा प्रोजेक्टला पहिला क्रमांक मिळाला आणि त्या विद्यार्थ्याला सरांच्या मार्गदर्शनातून खूप फायदा झाला.