चुकली वाट सरांच्या तंत्रज्ञानाने गवसली !

श्री. बबन कृष्णा कामठे,
मु. पठारवाडी, पो. भिवरी, ता. पुरंदर, जि. पुणे,
मोबा. ९६५७१०९७००



आमची एकूण ८ एकर जमीन आहे. ३ वर्षाचा असतानाच वडील वारले. पुढे उपजिवीकेसाठी लहान वयातच पुण्याला आलो. त्यातून पुढे हॉटेल व्यवसाय सुरू केला. आता मुले हा हॉटेलचा व्यवसाय पाहतात. मला शेतीची आवड असल्याने गावाकडील ८ एकर जमीन करण्यासाठी गेलो. आमच्या गावात ७२ च्या दुष्काळात वसंतदादा मुख्यमंत्री असताना पाझर तलाव बांधला गेला आहे. त्याच्या खालच्या (पाणी पाझरणाऱ्या) भागात थोडी जागा घेतली. तेथून ४ किमी अंतरावर पाईपलाईनने शेतात पाणी आणले आणि प्रथम ८०० भगवा डाळींबाची रोपे जून २०१३ मध्ये लावली. जमीन मुरमाड आहे. लागवड १२' x १०' वर आहे. मला शेतीतील अनुभव फारच कमी त्यामुळे जाणकारांचा सल्ला घेऊन डाळींब पिकाची जोपासना करू लागलो. पुढे बहार धरताना बागेला उन्हाळ्यात पाणी कमी पडेल म्हणून शेताच्या वरच्या बाजूला डोंगरावर ५७ x ५४ मिटर लांबी, रुंदीचे आणि २० फूट खोल असे शेततळे बांधले. बागेला ठिबक केले आहे. शेततळे व ठिबकसाठी कोणतेही अनुदान घेतले नाही.

या बागेचा पहिला बहार धरण्यासाठी ऑक्टोबर - नोव्हेंबर २०१४ महिन्यात बागेस ताण देऊन पाणी दिले. मात्र ताण कालावधीतच पाऊस झाल्याने डिर निघाले. त्यानंतर छाटणी झाली. मात्र पावसामुळे कळी फारच कमी निघाली.

त्यावेळी मार्केटयार्डला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ऑफिसमध्ये जाऊन डाळींबाविषयी माहिती घेतली. बहार फुटीसाठी जर्मिनेटर, प्रिझम ही औषधेही नेली. त्याची फवारणी केली असता फुट चांगली निघाली.

झाडावर २५ - ३० फळे सेट झाली. मात्र त्यानंतर मुलाने डाळींब बागेचा अनुभव नसल्याने सल्लागार नेमला. त्याच्या सल्ल्यानुसार बागेस रासायनिक औषधे फवारू लागलो. पुढे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा गॅप पडला. या काळात फक्त 'कृषी विज्ञान' मासिक वाचत असे. आम्ही सल्लागाराच्या सल्ल्यानुसार सासवडवरून औषधे आणून फवारू लागलो. मात्र फळे १५० - २०० ग्रॅमची असताना बागेवर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला. आता आम्ही खर्च करून हतबल झालो होतो. तरी त्यांच्या सल्ल्यानुसार तेल्या प्रतिबंधासाठी औषधे फवारली. औषधे महाग होती. शिवाय रोग आटोक्यात येईल अशी हमी दुकानदार देत नसे. गावातील जाणकार म्हणायचे तेल्या आटोक्यात येत नाही. बाग काढून टाकण्याशिवाय पर्याय नाही. आम्हाला काय करावे सुचेना.

दुकानदाराने दिलेली औषधे ८ - ८ दिवसांनी २ वेळा फवारली. त्याने तेल्या रोग आटोक्यात येण्यापेक्षा आहे त्यातीलही बरीच फळे तडकली.

३ वर्षापासून शेतात नुसता खर्च करीत आहे. शेततळे, ठिबक, विहीर, २ बोअर असा १० - १२ लाख रू. नुसता खर्च होऊन १ रू. ही प्रॉफिट आज तागायत नाही. त्यामुळे पुर्णता हतबल झालो आहे. आता भांडवलही संपले आहे.

आज यावर काय मार्ग काढायचा यासाठी सरांचे मार्गदर्शन घेण्यास आलो आहे. सरांनी यावर सांगितले, "कोणताही बहार धरताना ताण कालावधीत पाऊस होऊ नये. पाऊस जर झाला तर बागेस कळी न निघता नुसती फुट निघते. डीर निघतात. चौकी निघत नाही. जमिनीपासून घुमारे (फोक) वेगाने निघतात. भात टाकल्यावर जशी धाड उगवते तसे वेगाने डीर निघतात. पाऊस झाल्याने उष्णता व ओल यामुळे मुके डोळे जोराने फुटले. कळी व माल कमी लागण्याची हीच करणे आहेत. तरी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने जी २५ - ३० फळे सेट झाली. त्यावर पुढे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या बंद केल्याने तसेच बागेतील झाडांचे अंतर जवळ (१२' x १०') असल्याने तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्या भागातील जमिनी मी ३० वर्षापुर्वी पहिल्या आहेत. जमीन उताराची मुरमाड आहे. तेथे उताराला आडवे बांध घालून लागवड करायला पाहिजे होती तशी झाली नाही".

पुढे सरांनी सांगितले, "आता तुम्ही प्रथम मातीचे पृथ्थ:करण करून घ्या. तसेच जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा जून अखेरीस एकदा आणि ऑक्टोबर (भाद्रपद) मध्ये एकदा ताग किंवा धैंच्या डाळींबाच्या मधल्या पट्ट्यात करून (एकरी ४० कीलो पेरून) तो १।। महिन्याचा झाल्यावर फुलावर येण्यापुर्वीच जमिनीत गाडा. म्हणजे त्याने जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढेल. जमिनीची भौतिक सुपिकता वाढेल, जमिनीत हवेची पोकळी वाढेल. जैवीक नत्राचे स्थिरीकरण होईल. तसेच आता प्रथम झाडावरील २५ - ३० फळे पोसण्यासाठी, तेल्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी थ्राईवर १ लि. क्रॉपशाईनर १।। लि. राईपनर अर्धा लि., न्युट्राटोन १ लि, प्रोटेक्टंट १ किलोची २०० लि. पाण्यातून फवारणी करा आणि जर्मिनेटर १ लि., प्रिझम १ लि. कॉपरऑक्झिक्लोराईड १ लि. ची २०० लि. पाण्यातून ड्रेंचिंग करा आणि कल्पतरू सेंद्रिय प्रत्येक झाडास १ किलो द्या. "

बागेत मार रोगाने काही झाडे गेली आहेत. तसेच खर्च करण्यास भांडवलही नाही तेव्हा सरांना विचारले या गेलेल्या जागी व संपुर्ण बागेत आंतरपीक 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवगा लावू का ? या शेवग्याविषयी 'कृषी विज्ञान' मधून खूप यशस्वी मुलाखती वाचल्या आहेत. त्यामुळे ७ व्या महिन्यापासून उत्पन्न चालू होऊन भांडवल उभे होईल. यावर सरांनी सांगितले, "अगोदरच डाळींबाची लागवड जवळ (१२' x १०') आहे. त्यामुळे आंतरपीक म्हणून नाही घेता येणार, मात्र जी झाडे मेली आहेत. तेथे हमखास 'सिद्धीविनायक' शेवगा लावू शकता. त्यापासून खात्रीशीर उत्पन्न मिळेल." यावेळी सरांनी सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील माळी यांनी दुष्काळात द्राक्षाच्या मेलेल्या वेलीच्या जागेवर 'सिद्धीविनायक' शेवगा लावला तर त्यापासून त्यांना द्राक्षापेक्षा जास्त उत्पन्न मिळाल्याचे सांगितले. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील सटाण्यातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. केदा सोनवणे यांनी मर रोगाने गेलेल्या भगवा डाळींबाच्या बागेत 'सिद्धीविनायक' शेवगा लावला तर त्यांना भगवा डाळींबापेक्षा जास्त पैसे या शेवग्यापासून झाले. त्यानंतर त्यांनी डाळींबाची खूपच मर झालेल्या २।। एकर प्लॉटमधील बाकी सर्व डाळींब झाडे काढून संपूर्ण 'सिद्धीविनायक' शेवगा लावला. त्यांच्या शेवग्याच्या शेंगा कुवेत व लंडनला निर्यात होऊन ५ - ६ लाख रू. झाल्याची मुलाखत 'सिद्धीविनायक' शेवगा लागवडीच्या पुस्तकात पान नं. ३९ वर प्रकाशित झाली आहे. तेव्हा अशा पद्धतीने तुम्ही 'सिद्धीविनायक' शेवगा लावून उत्पन्न वाढवू शकाल." तेव्हा मेलेल्या डाळींबाच्या जागी तसेच एक डाळींबाचा वेगळा प्लॉट आहे. तो काढून त्याजागी 'सिद्धीविनायक' शेवगा लावणार आहे.

बाकीच्या बागेतील सुत्रकृमी नियंत्रणाबद्दल सरांना विचारले असता सरांनी सांगिलते, यसाठी बागेस प्रत्येक झाडास १ - १ किलो निंबोळी पेंड व करंजपेंड देऊन मोकळे पाणी द्या. म्हणजे या पेंडीचा कडू अर्क सुत्रकृमीच्या भागात जिरेल व सुत्रकृमी मरतील. तसेच या बागेत झेंडू आता लावला तर सुत्रकृमी आटोक्यात राहून हा झेंडू गणपती, नवरात्र, दसरा या सणांत मार्केटला येऊन चांगले भाव सापडतील व पैसेही होतील. असाच प्रयोग सुरेश शेलार, वडगाव रासाई ता. शिरूर, जि. पुणे. मोबा. ८२७५०६७०१०/८६९८९०९७७९ यांनी केला. तर झेंडूचे पैसे चांगले झाले होते.

७ - ८ महिन्याची नवीन १००० भगवा डाळींबाची वेगळी बाग आहे. तिची ३ - ४ वेळा छाटणी केली आहे. खोड हाताच्या अंगठ्यासारखे आहे. यावर सरांनी सांगितले "प्रत्येक झाडाला ३ ते ४ खोडे ठेवा. तसेच या बागेवर तेल्याचा प्रादुर्भाव होऊ नये. पानांची कॅनॉपी होण्यासाठी थ्राईवर ५०० मिली, क्रॉपशाईनर १ लि., न्युट्राटोन ५०० मिली आणि प्रोटेक्टंट १ किलोची २०० लि. पाण्यातून फवारणी करा. तसेच कल्पतरू प्रत्येक झाडास २५० ग्रॅम देऊन जर्मिनेटर १ लि. + प्रिझम १ लि. आणि कॉपरऑक्झिक्लोराईड १ लि. ची २०० लि. पाण्यातून ड्रेंचिंग करा." आता मी यापुढे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने बाग जोपासणार असून मला खात्री आहे की हेच तंत्रज्ञान मला शेती समृद्ध करून देईल.

'सिद्धीविनायक' शेवग्याची ३०० रोपे जुनचा पाऊस झाल्यावर लावणार आहे. त्या अनुभवातून मग पुढे शेवगा १ ते १।। एकर करणार आहे.