मृग बहारातील संत्र्याचे व्यवस्थापन

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


संत्र्याचा मृग बहार धरण्यासाठी त्याची क्रिया ही फेब्रुवारी - मार्चपासून चालू होते. मार्च - एप्रिल - मे व जून या महिन्यांत कडक उन्हाळा व प्रखर सुर्यप्रकाश असतो. साधारण फेब्रुवारी महिन्यात नवती फुटते व मार्च महिन्यात ती पक्की होते. पण मार्च महिन्यापासूनच दिवसाचे उष्णतामान वाढायला. सुरुवात होऊन ते ३५ अंश सेल्सिअसच्या वर जाते. त्यामुळे पोटोसिंथेट तयार होण्याची क्रियाही मंदावते.

साधारणपणे मृग बहाराची क्रिया सुरू होते तेव्हा म्हणजे मार्चमध्ये नवती पक्की होते. ही नवती झाडातील साखर व प्रोटीन घेऊन वाढते. त्यामुळे फांद्यातील शक्ती कमी होते. ही नवती फुटू न दिल्यास मृग बहार फोडण्यास थोडी निश्चितता येऊ शकते. फेब्रुवारी महिन्यातील नवती पक्की होऊन नवतीची पाने अन्नद्रव्ये तयार करण्यास सुरुवात करेपर्यंत ३ - ४ आठवड्याचा काळ जातो. ही नवती कार्यक्षम होईपर्यंत मोठ्या प्रमाणावर फांद्यातील शक्ती घेते. जुनी पाने मात्र या महिन्यात पानांमध्ये साखर तयार करण्याचे कार्य सुरू ठेवतात. जुनी पाने नसतील तर काहीच अन्न तयार होत नाही. एप्रिल व मे महिन्यातील प्रखर उष्णतेमुळे दिवसा १० वाजल्यापासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत साखर तयार होण्याची क्रिया थांबलेली असते. मात्र या काळात उष्णतेमुळे व प्रखर प्रकाशामुळे फांद्यांमधील साखरेचे विघटन होण्याची क्रिया वेगाने सुरू असते. मात्र रोगामुळे पानांतील ही क्रिया मंदावते, तेव्हा वेळीच रोगाचा बंदोबस्त करावा.

मे महिन्यात संत्र्याच्या बागेला ताण देतात. पाण्याच्या ताणामुळे पानांमध्ये अॅबसिसीक अॅसीड या हार्मोन्सचे प्रमाण वाढते. त्यामुळे फुले येण्याची क्रिया होते. फेब्रुवारी महिन्यातील नवतीवर मृगाच्या कळ्या धरत नाहीत, मागच्या सप्टेंबर महिन्यातील नवतीवर मृगाच्या कळ्या धरतात. फेब्रुवारीतील नवतीमध्ये अनेक ऑक्झीन्स तयार होतात व ती फुले येण्याच्या क्रियेत बाधा आणतात. काही हार्मोन्सद्वारे नवती (डेरी) येणे तात्पुरती बंद करता येते.

* मृगबहार अनिश्चित येण्याची कारणे :

१) मृग बहार फुटण्यापुर्वी साखर तयार होण्यास मिळणारा काळ (फेब्रुवारी व मार्चचा पहिला पंधरावडा) हा कमी पडतो.

२) फेब्रुवारी महिन्यातील नवती व मुळांची वाढ झाडांची शक्ती घेते व त्यामुळे पुढील फुटीकरीता ऊर्जेचा साठा अपुरा पडतो. याचवेळी अति उष्णतेमुळे साखरेचे सतत विघटन होत राहते.

३) फेब्रुवारी महिन्यात आंबीया बहार फुटला तर झाडांतील शक्ती व फुलांचे हार्मोन्स कमी होतात. त्यामुळे मृग बहार फुटण्यात समस्या येते.

४) मागील वर्षाच्या मृगाची संत्री (फळे) झाडावर मोठ्या संख्येत असली किंवा बराच काळ झाडावर ठेवली तरी नवीन भार फुटण्यास बाधा निर्माण होते.

५) पाण्याच्या जास्त ताणामुळे झाडाच्या निरनिराळ्या जैविक क्रियांवर विपरीत परिणाम होतो व मोठ्या प्रमाणात कोवळ्या फांद्या सुकतात. मुळं रोगीट असली तर पाणी देऊनही फांद्या पाण्याअभावी सुकतात.

६) पानांवर रोगांचा किंवा कोळशीचा प्रादुर्भाव झाल्यास साखर तयार होण्याची क्रिया मंदावते. तर विघटन होण्याची क्रिया वाढते.

७) उष्णतेमुळे व पाण्याच्या ताणामुळे पानांच्या श्वासोच्छवासात वाढ होते. त्यामुळे साखर तयार होण्याच्या गतीपेक्षा त्याचे विघटन होण्याची क्रिया जास्त वेगाने होते. परिणामी साखरेचा साठा कमी - कमी होत जातो.

८) प्रखर सुर्यप्रकाशामुळे व उष्ण वाऱ्यामुळे झाडाच्या श्वासोच्छवासाची क्रिया झपाट्याने वाढते व त्या प्रमाणात झाडातील साखरेचे विघटन होण्याची क्रिया वाढते.

९) अति उष्णतेमुळे पानांमधील रंध्र (स्टोमाटा) बंद होतात. त्यामुळे साखर तयार होण्याची क्रिया अतिशय कमी होते.

या सर्वावरून असे लक्षात येते की मृग बहार अनिश्चिततेची प्रमुख ३ कारणे आहेत.

१) आंबिया बहाराच्या नवतीमुळे व मुळांच्या फ्लशमुळे फेब्रुवारी महिन्यातच झाडातील शक्ती कमी होते.

२) जुनी पाने जी अन्न तयार करण्यासाठी महत्त्वाची असतात तीच रोगमुळे नष्ट होतात.

३) उष्णतेमुळे साखरेची निर्मिती ऐवजी विघटनच जास्त होते.

* मृग बहार फोडण्यासाठीची उपाययोजना :

फेब्रुवारी मार्च व एप्रिल महिन्यात साखर तयार करण्याकरिता झाडावर भरपूर जुनी व हिरवीगार पाने असणे आवश्यक असते. अशी पाने राखून ठेवण्याची तयारी मागील जून महिन्यापासून सुरू करावी. यासाठी मागील बहारातील संत्री, पोषणासाठी राईपनर, न्युट्राटोनचा वापर करत असतानाच पानांची कॅनॉपी टिकण्यासाठी थ्राईवर, क्रॉपशाईनर व न्युट्राटोन ची फवारणी २ - ३ वेळा घ्यावी. याचा फायदा चालू फळे पोसण्याबरोबरच पुढील वर्षीचा बहार फुटण्यासाठीची पाने तयार होतात. अशी पाने एरवी ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात पानांवर पानगळीचा रोग होऊन गळतात, त्यासाठी या कालावधील थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी १ लि. आणि न्युट्राटोन ५०० मिली २०० लि. पाण्यातून १५ - १५ दिवसांनी २ वेळा फवारावे.

मार्च - एप्रिल महिन्यात बागेतील उष्णता कमी करण्यासाठी थोडा वेळ स्प्रिंक्लर्स चालवावेत. म्हणजे बागेमध्ये गारवा निर्माण होईल. कमी उष्णतेमुळे आणि जास्त आर्द्रतेमुळे साखर तयार होण्याची क्रिया वाढेल. विघटनाचे प्रमाण कमी होईल व साखरेचा साठा वाढेल.

डिसेंबर महिन्यात व जानेवारी महिन्यात आंबिया बहार व नवती येऊ नये म्हणून संजीवकाची फवारणी करावी व मुळाची वाढ रोखून धरण्यासाठी हलकी नांगरट करावी.

पाण्याचा ताण एप्रिलपासून सुरू करावा व तो हलका असावा. हळूहळू ताण वाढवावा. पानांमध्ये अन्नद्रवयांची कमतरता अजिबात राहू नये यासाठी मागील वर्षापासूनच झाड निरोगी व सशक्त करण्याचा प्रयत्न करावा. याकरिता डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार मागील बहारापासून घ्यावी. म्हणजे ती पुढील मृग बहारासही फायदेशीर ठरते.

पाऊस पडण्यापुर्वी झाडांच्या वयोमानानुसार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार २ ते ५ किलो कल्पतरू सेंद्रिय खत (५ ते १० वर्षाच्या झाडांना ) द्यावे.

* मृग बहार फुटण्यासाठी फवारणी व ड्रेंचिंग :

जून महिन्यात पाऊस पडल्यानंतर प्रिझम १ लि. जर्मिनेटर १ लि. आणि कॉपरऑक्झीक्लोराईड १ लि.ची २०० लि. पाण्यातून फवारणी करावी. तसेच जर्मिनेटर १ लि. + प्रिझम १ लि. + कॉपरऑक्झिक्लोराईड १ लि. चे २०० मिली पाण्यात द्रावण तयार करून/एकरी ड्रेंचिंग (आळवणी) करावी.

* नायट्रोजनचे फूल लागण्यावर होणारे परिणाम :

नायट्रोजन (नत्र) चे प्रमाण जास्त झाल्यास झाडामध्ये अनेक क्रिया घडतात. मग त्या सर्व क्रियांचा एकत्रित परिणाम बहार येण्यावर होतो.

१) नायट्रोजनमुळे पानांची/कांद्यांची वाढ होते. त्यामुळे साखर तयार होण्याचे/क्षेत्र वाढते.

२) नायट्रोजनमुळे साखरेचे विघटन होण्याचे प्रमाण वाढते व साखरेचा साठा कमी होते.

३) नायट्रोजनमुळे झाडाचा श्वासोच्छवास होण्याची क्रिया वाढते. श्वासोच्छवास होण्याची क्रिया घडवून आणण्याकरिता लागणारी शक्ती ही साखरेचे विघटन होऊन मिळते. त्यामुळे साखरेचा साठा कमी होतो. याकरिता बहार येण्यापुर्वी ३ ते ५ महिने नायट्रोजन (नत्र) देणे पुर्णपणे बंद करावे. याउलट जेव्हा फळे चालू असतात अथवा पुढील हंगामातील बहार धरण्यासाठी सद्य परिस्थितीत बहार नको असल्यास नायट्रोजनचे प्रमाण वाढविले जाते.

* पाण्याचा ताण व फुले लागण्याची क्रिया:

पाण्याचा मध्यम स्वरूपाचा ताण बसला की फुले लागण्याच्या क्रियेत मदत होते. त्याची कारणे अशी.

१) पाण्याच्या ताणामुळे फांद्यांची/पानांची व मुळांची वाढ थांबते, मुळांना विश्रांती मिळते.

२) नायट्रोजनचे (नत्राचे) प्रमाण कमी होते.

३) पानांवरील रूंध्र बंद होतात व साखर तयार होण्याचे प्रमाण कमी होते.

४) अॅबसिसीक अॅसीडचे प्रमाणे वाढते. जिबरेलीन्स कमी होतात व अनावश्यक वाढ थांबते.

५) सायटोकायनीनचे प्रमाण कमी होत.

६) पानांतील अन्नद्रव्य इतर भागात वाहून जाण्याची क्रिया मंदावते.

७) पानांचा श्वासोच्छवास कमी होतो व साखरेचा साठा वाढतो.

८) ज्या प्रमाणात पाण्याचा ताण बसेल त्या प्रमाणात फुले लागण्याचे प्रमाण वाढते.

* फुले लागण्याच्या प्रक्रियेकरिता आवश्यक असणाऱ्या बाबी:

१) पूर्ण वाढ झालेली निरोगी पाने.

२) पानांत साखर तयार करण्याची व साठविण्याची क्रिया ३) फ्लोरीजेन तयार होण्यास योग्य परिस्थिती (थंडी/पाण्याचा ताण)

४) फ्लोरीजेन कोवळ्या फांद्यांच्या टोकाकडे वाहून जाण्याची क्रिया.

५) हार्मोन्समध्ये बदल - ओक्झीन, जिबरेलिन्स व सायटोकायनीनमध्ये घट तर अॅबसिसीक अॅसिडमध्ये वाढ.

६) पानांचे फुलांमध्ये रूपांतर व कळ्या बनण्याची प्रक्रिया सुरू होते.

७) त्यानंतर कळ्या दिसू लागतात.

कळ्या लागल्यानंतर त्या गळू नयेत तसेच चांगली फळधारणा होऊन पुढे फळे पोसण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पुढीलप्रमाणे फवारण्या कराव्यात.

* फवारणी :

१) संत्र्याची गुंडी हरबऱ्याएवढी झाल्यावर : थ्राईवर ५०० ते ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० ते ७५० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली.+ न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी २५० मिली. + स्प्लेंडर २५० मिली. + १५० लि.पाणी.

२) फळे सुपारीच्या आकाराची झाल्यावर : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम + न्युट्राटोन ७५० मिली. + हार्मोनी ४०० मिली. + स्प्लेंडर ३०० मिली. + २०० लि.पाणी.

३) फळे लिंबाएवढी झाल्यावर : थ्राईवर १ ते १। लि. + क्रॉंपशाईनर १। लि. + राईपनर ५०० मिली. + न्युट्राटोन १ लि. + प्रोटेक्टंट १ किलो + हार्मोनी ५०० मिली. + स्प्लेंडर ४०० मिली. + २५० लि.पाणी.

४) फळे बारीक कैरीएवढी झाल्यावर : थ्राईवर १। लि. + क्रॉंपशाईनर १।। लि. + राईपनर ७५० मिली. + न्युट्राटोन १। लि. + हार्मोनी ५०० मिली. + २५० लि.पाणी.

५) फळे मोठ्या कैरीएवढी झाल्यावर: थ्राईवर १।। लि. + क्रॉंपशाईनर १।। लि. + राईपनर १ लि. + न्युट्राटोन १।। लि. + २५० लि.पाणी.

फळांचे तोडे चालू असताना मागील फळांचे पोषण होण्यासाठी वरील फवारणी क्रमांक ५ प्रमाणे पुढे आवश्यकतेनुसार २ - ३ वेळा फवारण्या कराव्यात.

वरील फवारण्यांमुळे झाडांची रोगप्रतिकारक शक्ती वाढून फांद्यांमध्ये आवश्यक अन्नसाठा तयार होतो. त्यामुळे फळधारणा चांगल्याप्रमाणे होऊन फळांचे पोषण होते. फळांना आकर्षक चमक येते. फळांचा टिकाऊपणा वाढतो. फळांचे वजन वाढते. फळांचा दर्जा सुधारल्यामुळे बाजारभाव निश्चितच इतरांपेक्षा जास्त मिळतो. मृग बहाराची फळे डिसेंबर महिन्यात साधारण युरोपियन लोकांच्या नाताळाच्या सणामध्ये तयार होत असल्याने या काळात फळांना चांगली मागणी असते. त्यामुळे मृग बहार घेणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायेदेशीर ठरतो.

अधिक माहितीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने 'संत्री, मोसंबी, लिंबाची यशस्वी लागवड व प्रक्रिया ' हे पुस्तक वाचावे तसेच विदर्भातील आमचे प्रतिनिधी श्री. अंकुश वराडे, मो. ९८२२२६३२५९/७८७५२१३३३७

यांच्याशी संपर्क साधून पीक परिस्थितीनुसार त्यांच्या मार्गदर्शनानुसार तंत्रज्ञानाचा वापर करावा.