व्हायरसमुक्त पपई डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे न्युट्राटोनचा चमत्कार

श्री. संजय नाथाजीराव पाटील ,
मु. पो. शेणे, ता. वाळवा, जि. सांगली,
मोबा. ९५२७९५४३२६


गेल्या ५- ६ वर्षापासून मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांचा वापर करून यशस्वी उत्पादन काढत आहे. खास करून माझ्या पपई क्षेत्रासाठी तर मी कायमच या टेक्नॉंलॉजीची औषधे वापरत आहे. या औषधांची कमाल म्हणजे पपईचा व्हायरस जो मार्केटमधल्या कुटल्याच औषधाने बरा होत नाही तो न्युट्राटोन ने हमखास बरा होतो हे आम्ही अनुभवले. या बद्दल मि सरांचे खरोखरच आभार मानतो. कारण त्यांनी अशी औषधे निर्माण केली, की जी शेतकऱ्यांसाठी खूपच लाभदायक आहेत. मला कापसे यांच्याकडून या टेक्नॉंलॉजीची प्रथम माहिती मिळाली. त्यानुसार पपईला वापर करून दर्जेदार एक्सपोर्ट प्रतीचा माल काढू शकलो व मार्केटमध्ये सर्वात जास्त दर घेऊ शकलो. याबाबतचा माझा पपईचा लेख देखील आपल्या मासिकात आला आहे. मी ऊस लागवडीच्यावेळी जर्मिनेटर औषधात उसाच्या कांड्या बुडवून लावल्या होत्या. त्यामुळे उगवण चागली होऊन फुटवे अधिक निघाले. त्यानंतर जर्मिनेटर वेळोवेळी एकरी १ लि. २०० लि. पाण्यातून सोडत असतो. त्यामुळे उसाची वाढ जोमाने होऊन सरासरी गुंठ्याला १।। ते २ टन उतारा मिळाला.

उशीरा लावलेला गहू ३५ गुंठ्यात १६ क्विंटल

मी रान तयार नसल्याने उशीरा गहू केला. त्यासाठी कापसे यांच्या सल्ल्यानुसार उशीरा येणारी जात केदार - ११ या वाणाचा वापर केला. ३५ गुंठे रानात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हा गहू टोकाला. साधारण २० दिवसांनी जर्मिनेटर ३० मिली + थ्राईवर २५ मिली + क्रॉंपशाईनर २५ मिली + प्रोटेक्टंट २० ग्रॅम/पंपास घेऊन फवारा केला. त्यावरच गव्हाचा फुटवा भरपूर निघून वाढ व काळोखी अधिक आली. पाणी दर २० दिवसांनी चालू ठेवले. दुसरी फवारणी थ्राईवर ४० मिली + क्रॉंपशाईनर ५० मिली + प्रिझम ३० मिली + रोगर २० मिली अशी केली. तेवढ्यावर ओंबी निघू लागली. साधारण ८५ दिवस झाल्यावर या उशीरा लागवडीच्या गव्हावर तांबेरा दिसायला लागला होता. तेव्हा कापसे यांच्या सल्ल्याप्रमाणे टिल्ट १५ मिली + राईपनर ५० मिली + न्युट्राटोन ५० मिली / पंपास घेऊन फवारणी केली. तेवढ्यावरच तांबेरा पुर्णता जाऊन काळोखी चांगली आली व ओंबी चांगली भरली. ६ एप्रिलला गहू काढला तर इतरांना जे १ एकरात उत्पादन मिळाले, ते आम्हाला ३५ गुंठ्यातच १६ क्विंटल मिळाले. माझ्या अपेक्षेपेक्षा हा उतारा चांगला पडला.