रोपवाटिका व्यवस्थापन
प्रा. डॉ. वि.सु. बावसकर
रोपवाटिका : भारतात रोपवाटिकांचा व्यवसाय फार जुना
आहे. रोपवाटिकेतून जातीवंत रोपाची, कलमाची आणि बियाणाची उत्पत्ती, रोपाचे शास्त्रोक्ट
पद्धतीने संगोपन व संवर्धन निरनिराळ्या अभिवृद्धीतून एकत्रीत समुहाने केलेले असते.
तिला रोपवाटिका असे म्हणतात.
अलिकडे फुलझाडांचा, फळझाडांचा व्यवसाय किफायतशीर होत असल्यामुळे फळझाडांची मागणी वाढत आहे. त्या प्रमाणात जातिवंत रोपांची शास्त्रीयादृष्ट्या निपज मोठ्या प्रमाणात होत नाही. परिणामी कमी दर्जाची कलमे / रोपे पुरविली जाण्याची शक्यता असते. याकरिता रोपवाटिकांची संख्या व गुणात्मक वाढ झाली पाहिजे.
रोपवतिकेचे प्रकार :
१) कोरडवाहू रोपवाटिका : पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली रोपवाटिका, रोपाचे उत्पादन व संगोपन करण्यात येते.
२)ओलीता खालची रोपवाटिका: या ठिकाणी बारमाही पाणी उपलब्ध असते, त्यावर रोपाचे व कलमाचे उत्पादन व संगोपन केले जाते.
कालावधीनुसार रोपवाटिका
१) तात्पुरती रोपवाटिका : कमी जागेत व कमी कालावधीमध्ये रोपे तयार केली जातात आणि विक्री करतात.
२) कायम रोपवाटिका : या रोपवाटिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर कलमे व रोपे तयार करतात. अशा रोपवाटिका रेल्वे व रोडपासून अगदी जवळ हव्यात. त्यामुळे रोपांची व कलमांची विक्री सोयीची होते.
रोपवाटिकेचे महत्त्व :
१) सावकाश वाढ होणाऱ्या झाडाचे रोपवाटिकेत चांगल्याप्रकारे संगोपन करून ती लागवडीसाठी वापरता येतात.
२) कमी जागेत मोठ्या प्रमाणावर रोपे तयार करता येतात.
३) रोपांचे संगोपन चांगल्या प्रकारे होते.
४) रोपावरील किडी व रोगाचे नियंत्रण करणे सोईचे होते.
५) रोपावर शास्त्रीय अभिवृद्धी करता येते. उदा. डोळे भरणे, भेट कलम, गुटी कलम करणे इत्यादी.
६) रोपांना पाणी, खते वेळेवर देऊन चांगली वाढविता येतात.
७) उत्पादनक्षम व जातीवंत फळझाडांची कलमे व रोपे तयार करता येतात.
रोपवाटिकेची सुरुवात : रोपवाटिकेची सुरुवात करण्यासाठी प्रथम आपणास शासनाकडून परवानगी घ्यावी लागेल. परवानगी घेतल्यानंतर आपण रोपवाटिकेचा व्यवसाय सुरू करू शकतो. ज्या विभागात फळझाडांच्या लागवडीस वाव आहे . त्या भागात अशाच फळपिकाच्या रोपवाटिका शासनाने स्थापन केलेल्या आहेत. जेणे करून कलमीकरणाचा कार्यक्रम राबविणे शक्य होईल. राज्यात संत्री, मोसंबी, चिकू, आंबा, वगळता इतर फळपिकाच्या खुंटाचे अद्याप्रमाणे करणे झालेले नाही. भविष्यात यामध्ये संशोधन झाल्यास रोगमुक्त बागा स्थापन करणे, लागवडीचे अंतर कमी करणे, बागेचे उत्पादन लवकर सुरू करणे इ. बाबी साध्या होऊन उत्पादन वाढीस मोठ्या प्रमाणावर चालना मिळू शकते.
रोपवाटिकेचा व्यवसाय हा शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय आहे. रोपवाटिकेचा व्यवसाय सुरू करतानाच इतर उद्योगाप्रमाणे व्यापारी दृष्टीकोन ठेवूनच अभ्यास पूर्वक रोपवाटिका निर्माण करणे गरजेचे आहे. रोपवाटिका व्यवसायात कलमे, रोपे उत्पादन हा एक भाग आणि या कलमे, रोपे उत्पादनाकरिता विविध फळझाडांच्या मातृवृक्षांची लागवड हा दुसरा भाग असे महत्त्वाचे प्रमुख दोन घटक आहेत. नेमकी किती क्षेत्रावरती रोपवाटिकेची सुरुवात करावयाची हे ठरविण्याकरिता प्रथमत: आपणास ज्या फळझाडांची, फुलझाडांची रोपवाटिका तयार करावयाची आहे. त्या फळझाडांस व फुलझाडांस आजूबाजूच्या परिसरात लागवडीकरिता किती वाव आहे याची माहिती करून घ्यावी. तसेच किती रोपे व कलमे लागतील या बद्दलचा अंदाज घ्यावा.
जागेची निवड : रोपवाटिका ह्या वाहतुकीकरिता रोडपासून अगदी जवळ हव्यात. म्हणजे रोपे, फळझाडे सहजगत्या बागायतदारांना आपल्याकडे नेणे सोपे पडते. रोपवाटिकांची जमीन पानथळ रेताड तर अगदी हलक्या प्रतीची नको, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन रोपवाटिके करिता निवडावी.
बारमाही विहीर बागायत व पाटाच्या पाण्याची सोय हवी. खरवटीची जमीन नको, पाटाच्या पाण्यापेक्षा विहीर बागायतीस प्राधान्य द्यावे.
रोपवाटिकेच्या झाडांच्या संरक्षणाकरिता वारा संरक्षणे असावीत. त्याकरिता कोणती झाडे निवडाविता ते स्थानिक हवामानावर अवलंबुन राहील, पण शेवटी जलद व उंच वाढणाऱ्या झाडांची बारा संरक्षके म्हणून बहुधा निवड करतात. वाऱ्याच्या आडव्या दिशेने वारा संरक्षके लावतात. वारा संरक्षकांनी वारा अडवावा, परंतु जास्त सावली देऊन रोपवाटिकेला सुर्यप्रकाशापासून वंचित करू नये. तसेच वारा संरक्षकांच्या मुळांनी रोपवाटिकांच्या झाडांना अडथळा आणू नये. अशा प्रकारची वारासंरक्षके असावीत. रोप वाटिका, उभारणीपूर्वी माती परीक्षण, पाणी परिक्षण करावे.
बियाणे पेरण्याचे वाफे.
गादी वाफे: निरनिराळ्या प्रकारची रोपे तयार करण्याकरिता लागणाऱ्या वाफ्यांना फार थोडी जागा लागते. ही जागा पाण्याच्या जवळ असावी. तसेच नीट व वारंवार लक्ष ठेवण्याकरिता ही जागा कार्यालयालगत असावी. बियाणे पेरण्याचे बाफे हे गादी वाफे असावेत. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास मदत होते. हे वाफे सावलीखाली नसावेत. त्यांना भरपूर सुर्यप्रकाश मिळायला हवा. परंतु उन्हाळ्यात सावली आवश्यक. या वाफ्यांनी जमीन भुसभूशीत असावी. बहुवर्षायु तणे नसावीत वाफे तयार करण्यापूर्वी जमीन चांगली नांगरावी. तिच्यात कुजलेले शेणखत टाकावे. पाण्याचा अधिक निचरा होण्यासाठी त्यात थोडी वाळू मिसळावी. याचा आकार ३ मी. लांब १ मी. रुंद व १५ -२० से. मी. उंच असावा किंवा ६ मी. लांब, १ मी. रुंद व १५ -२० सें. मी. उंचीचा असावा.
सपाट वाफे : सुरूवातीला काही पिकांचे बियाणे गादी वाफ्यावर उगवून आल्यानंतर काही दिवसांनी त्याचे सपाट वाफ्यावर स्थलांतर करतात किंवा छाट रुजविण्याकरिता देखील ते सपाट वाफ्यात रुजवतात. हे वाफे आकारमानाने गाडी वाफ्यापेक्षा मोठे असावेत. हे वाफेसुद्धा पाण्याच्या जवळ असावेत. गादी वाफ्यावरून स्थलांतर करून सपाट वाफ्यात लावलेली रोपे जातीनुसार वेगवेगळ्या अंतरावर लावावीत. वाफ्याचा आकार आवश्यकतेप्रमाणे व जमिनीच्या उताराप्रमाणे घ्यावा.
या वाफ्यामध्ये सुद्धा जमीन भुसभुशीत व पाण्याचा निचरा होणारी असावी. या वाफ्यावर गादी वाफ्यापेक्षा जास्त काळ रोपे राहतात. फेरपालटीमध्ये या जागेवर अधून - मधून हिरवळीचे पीक घ्यावे. तसेच तणांचा बंदोबस्त करावा. पिकानुसार वाफ्यांचा वेगळा विभाग असावा. खुंट तयार करण्याकरिता वेगळा विभाग असावा. या जागा फेरपालट करण्याकरिता राहाव्यात. या वाफ्या कडे सहज जाता यावे म्हणून मधून पायवाटा ठेवाव्यात.
मातृवृक्ष : रोपवाटिकेचा हा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. ज्या जातीची झाडे तयार करावयाची आहेत. त्यांची दाब कलमे, छाट कलमे व डोळे घेण्याकरिता जातीवंत, निरोगी, दर्जेदार व ज्यांच्या गुणांचा इतिहास पाहिला आहे अशीच झाडे मातृवृक्ष म्हणून रोपवाटिकेत लावलेली असावीत. त्यांच्यापासून फळे घ्यावयाची नसल्यामुळे ती नेहमीच्या अंतरावर न लावता २.५ ते ४ किंवा ५ x ५ मी. अंतरावर पिकाप्रमाणे लावलेली असावीत. मातृवृक्ष निवड करून लावणे हा रोपवाटिकेचा अत्यंत महत्त्वाचा भाग होय. वेगवेगळ्या जातीच्या व प्रकारच्या मातृवृक्षाचा वेगवेगळा विभाग असावा व त्यांच्या जातीची नावे. त्यावर व्यवस्थित लिहावीत. त्या झाडांपासून तयार केलेली कलमे, दाब कलमे याची नोंदणी वेगवेगळ्या नोंदणी पत्रकार नीट नोंदवलेली असावीत. मातृवृक्ष कोठून आणली व त्याची वंशावळी व उत्पन्न देण्याची क्षमता इत्यादीची नोंद असावी.
कुंड्या ठेवण्याची जागा : कुंड्या ठेवण्याकरिता सावली असलेली शेड बांधावी. कुंड्यांना पाणी देण्याकरिता पाणी जवळ असावे. पॉटीग मिश्रण, पाला पाचोळा याची साठवण्याची जागा जवळपास असावी. रिकाम्या कुंड्या ठेवण्याची जागा स्वतंत्र असावी.
कलमे / रोपे यांचे पॅकींग करण्याकरिता निवारा: वाफ्यातील वा रोपवाटिकेतील झाडे विक्रीकरिता वा बहारेगावी पाठविण्याकरिता व्यवस्थित पॅकींग करावी लागतात. त्याकरिता वेगळा स्वतंत्र निवारा असावा. ही जागा ऐसपैस व हवेशीर असावी.
भांडारगृह व कार्यालय : रोपवाटिकेकरिता आवश्यक असणाऱ्या साहित्याकरिता बंदिस्त भांडारगृह असावे. तिथेच लागून कार्यालय असावे. स्टोअरमध्ये पाट्या, लेबल्स प्लास्टिक च्या पिशव्या, झाऱ्या व आणखी लागणाऱ्या आवश्यक साहित्याचा साठा असावा. ऑफिसमध्ये रोपवाटिकेतल्या झाडांची नोंद असलेली नोंदबुके असावीत.
हरितगृह : फळझाडांची कलमे, फुलांची रोपे, शोभीवंत झाडे याची अभिवृद्धी करण्यासाठी हरितगृहाचा वापर केला जातो. हंगामात सर्व साधारणपणे १०० चौ. मी. च्या हरितगृहामध्ये एका हंगामात ४००० - ५००० रोपांची अभिवृद्धी करता येते. रोपांच्या जगण्याचे प्रमाण ८० % धरले तर वर्षभरात १०,००० ते १२,००० कलमे तयार करणे शक्य होते.
कलमे व रोपांची निगा : रोपवाटिकेतील कलमे व रोपे यांची निगा राखणे फार महत्त्वाचे आहे. जेणे करून त्यांची वाढ चांगली होईल व परिणामी उत्पादन चांगले मिळते.
रोपांची निगा :
१) बी पेरण्यापुर्वी जर्मिनेटर ची बीजप्रक्रिया करावी. कठीण कवचाचे बियाणे कोमट पाण्यात १२ ते २४ तास भिजवावे. तर मृदु कवचाचे २ - ३ तास भिजवावे. जर्मिनेटर चे प्रमाण १ लि. पाण्यामध्ये २५ मिली घ्यावे. याप्रमाणे जेवढे बियाणे भिजण्यास द्रावण लागेल तेवढे तयार कराव.
२) छाट किंवा डोळे १० ते१५ मिनीटे वरीलप्रमाणातील द्रावणात बुडवावेत.
३) गादीवाफ्यावर प्रत्येक गुंठ्यास ५ किलो आणि कुजलेले शेणखत २० ते २५ किलो वापरावे.
४) बीज प्रक्रिया केलेले बियाणे गादी वाफ्यावर पेरावे व त्यास नियमित झाऱ्यानि पाणी द्यावे. वाळलेल्या गवताचे आच्छादन करून नंतर झाऱ्याने पाणी द्यावे.
५) रोपाची मर होऊ नये म्हणून जर्मिनेटर आणि कॉपर ऑक्सिक्लोराईड या बुरशीनाशकाचे ड्रेंचिंग करावे.
६) रोग व किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बुरशीनाशक व किटकनाशकाची नियमित फवारणी घ्यावी.
७) गादी वाफ्यावरती आलेल्या तणांचा वेळीच बंदोबस्त करावा व त्याकरिता शक्य तेथे तणनाशकाची फवारणी करावी.
८) ओलावा टिकून राहण्याकरिता आच्छादनाचा वापर करावा.
९) रोपांची रोगप्रतिकारक शक्ती वाढून जोमदार वाढ होण्यासाठी
१) पहिली फवारणी : (उगवणीनंतर ८ दिवसांनी) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + १०० लि.पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
२) दुसरी फवारणी : (वरील फवारणीनंतर ८ ते १५ दिवसांनी) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ते ३०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन २५० मिली. + १५० लि.पाणी.
टीप : रोपांचा कालावधी अधिक असल्यास फवारणी क्र. २ चे प्रमाण घेऊन दर १५ दिवसाच्या अंतराने रोपे लागवडीयोग्य / विक्रीयोग्य होईपर्यंत फवारणी करावी. तसेच रोपे लागवडीवेळी जर्मिनेटर १ लि. + १०० लि. पाणी याप्रमाणातील द्रावणात बुडवून लावावीत अथवा लागवडीनंतर वरील द्रावण रोपांच्या उंचीनुसार १०० ते २५० मिलीचे प्रत्यके रोपास ड्रेंचिंग (आळवणी) करावे. म्हणजे रोपांची मर न होता पांढऱ्या मुळीचा जारवा वाढून रोपांची वाढ झपाट्याने होऊन लागवड यशस्वी होते.
कलमाची निगा :
१) तयार केलेली कलमे सावलीत ठेवावीत.
२) कलमे केलेल्या खुंटावर येणारी नवीन फुट वेळोवेळी काढून टाकवी.
३) कलमांचा जोड चांगला घट्ट झाला पाहिजे.
४) कलमांना वेळोवेळी पाणी देऊन ती कशी जोमदार वाढतील याची काळजी घ्यावी.
५) कलमाची चांगली जोमदार वाढ होण्यासाठी जर्मिनेटर चे द्रावण (१लि. जर्मिनेट + २०० लि. पाणी याप्रमाणे) मुळाला सोडून जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, प्रिझम प्रत्येकी २ ते ३ मिली/ लि. पाणी याप्रमाणे दर ८ ते १२ दिवसाला फवारणी घ्यावी.
६) कलमावर येणारे रोग व किड यांचे वेळोवेळी नियंत्रण करण्यासाठी हार्मोनी व प्रोटेक्टंटचा वापर कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वेळीच करावा.
७) कुंडयातील माती बदलून घ्यावी. जेणे करून नवीन मातीतील अन्नद्रव्ये कलमांना मिळतील.
८) माती बदलतेवेळी प्रत्येक कुंडीत १ किलो मातीस २५० ग्रॅम कल्पतरू खत याप्रमाणे मातीत मिसळून वापरावे. तसेच माती बदलणे शक्य नसल्यास कुंडीतील वरील माती खुरप्याने मोकळी करून त्यामध्ये वरीलप्रमाणे कल्पतरू सेंद्रिय खत मिसळून घ्यावे. म्हणजे कलमांची वाढ खुंटणार नाही. तसेच कल्पतरू खतामध्ये मातीतील पोकळी वाढल्याने हवा, पाणी खेळते राहून पांढऱ्या मुळ्या वाढीस मदत होईल आणि कलमे जोमाने वाढतील.
अन्नद्रव्ये व्यवस्थापन : रोपवाटिकेतील कलमांना तसेच मातृवृक्षांना आणि रोपट्यांना मी महिन्यात खते द्यावीत. रोपवाटिकेतील तयार केलेल्या कलमांची व रोपट्यांच्या मुळांची वाढ मर्यादित असते, तेव्हा मुळाद्वारे अन्नद्रव्याचा पुरवठा करणे अधिक योग्य आणि सोयीस्कर ठरते.
रोपवाटिकेत महत्त्वाचे रोग व उपाय :
१) डॅम्पींग ऑफ (रोप कोलमडणे) : रोपवाटिकेत पाणी साचून राहिल्यास बुरशीमुळे हा रोग होतो. त्यासाठी बुरशीनाशकाची ड्रेंचिंग करावी. उदा. कॉपर ऑक्सिक्लोराईड आणि जर्मिनेटर वापरावे.
२) मुळकुजव्या : कलमाच्या किंवा रोपाच्या मुळ्या कुजतात. हा रोग बुरशीपासून होतो. जर्मिनेटर ५०० मिली + कॉपर ऑक्सिक्लोराईड ३०० ग्रॅमचे १०० लि. पाण्यात द्रावण तयार करून मुळावाटे द्यावे.
३) भुरी : हा रोग बुरशीपासून होतो. याकरिता थ्राईवर क्रोपशाईनर प्रत्येकी ३ ते ४ मिली आणि हार्मोनी २ मिली प्रति लि. पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
४) करपा : ठिपके पडून पाने वाळतात. यासाठी थ्राईवर, क्रॉंपशाईनर, प्रत्येकी ३ ते ४ मिली आणि हार्मोनी २ मिली प्रति लि. पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
५) खैऱ्या रोग : संत्रावर्गीय पिकावर हा रोग येतो. प्रिझम, थ्राईवर, क्रॉंपशाईनरची फवारणी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार घ्यावी.
६) केवडा : रोपाच्या पानावर फिकट पिवळ्या रंगाचे तेलकट, पारदर्शक, गोल डाग दिसतात. या डागाच्या खाली पांढरी बुरशी वाढते. पाने पिवळी पडतात. हार्मोनी २ मिली/ लि. प्रमाणे फवारावे.
७) तांबेरा : दमट हवामानात पानावर तांबडे ठिपके पडतात, पाने गळतात, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, हार्मोनी फवारावे.
८) पानावररील ठिपके : रोपाच्या पानवर काळ्या रंगाचे ठिपके दिसतात. याकरिता थ्राईवर, क्रॉंपशाईनर, हार्मोनी फवारावे,
रोपवाटिकेत महत्त्वाची कीड व उपाय :
१) माईटस : ही अतिसुक्षम कीड आहे. पानातील रस शोषण करते. प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + १०० लि. पाणी किंवा झोलॉन ३५% प्रवाही १५० मि.लि. अधिक गंधक ८० टक्के पाण्यात मिसळणारे २५० ग्रॅम १०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
२) हिरवी अळी : अळ्या पाने कुरतडून खातात. प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + १०० लि.किंवा पाणी पाण्यात विरघळणारे कार्बोरिल (५० टक्के) १०० ग्रॅम १०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
३) पाने खाणारी अळी : पाने पोखरून आतील भाग खाते, पानांवर नागमोडी चट्टे दिसतात. पाने वाळतात. प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + १०० लि. पाणी किंवा मेलॅथीऑन ५० टक्के प्रवाही फवारावे.
४) मावा : कोवळ्या पानातील, फळातील रस शोषतात. काळी बुरशी वाढते. प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम +१०० लि. पाणी किंवा कार्बरील ५० टक्के किंवा मोनोक्रोटोफॉस ३५ टक्के प्रवाही फवारावे.
५) पिठ्या ढेकूण : कोवळ्या फांद्या व खोडातील रस शोषतात. प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + १०० लि. पाणी किंवा कार्बरील ५० टक्के किंवा मोनोक्रोटोफॉस ३५ टक्के प्रवाही फवारावे.
६ ) वाळवी : झाडाच्या बुंध्याला व कलमांना इजा करतात, वाळवीचे वारूळ खोदुन राणीचा नाश करावा. धुरीजन्य औषधाचा वापर करावा.
७) भुंगेरे : भुंगेरे पाने खातात. त्यामुळे पानांना छिद्रे पडतात. लिंडेन ०. ६५% भुकटी हेक्टरी २५ किलो धुरळावी.