हलक्या डोंगर उतारावरील मुरमाड जमिनीत एकरी ८० ते ९० टन ऊस घेण्याचा मानस

एक शेतकरी


आम्ही डोमगाव येथे नवीनच डोंगर उताराची जमीन घेतली आहे. त्यामध्ये गाळाची माती भरून फेब्रुवारी २०१२ मध्ये ८६०३२ वाणाच्या उसाची लागवड ६ फूट रुंदीच्या पट्ट्यामध्ये केली आहे.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती कृषी विज्ञान मासिकातून आणि वेबसाईटवरून मिळाली. त्यानंतर सरांची भेट घेऊन त्यांच्या मार्गदर्शनानुसार लागवडीच्यावेळी ६ बॅगा कल्पतरू सेंद्रिय खताच्या दिल्या. उसाच्या कांड्या जर्मिनेटर आणि प्रिझमच्या द्रावणात बुडवून लावल्या, तर उगवण अतिशय चांगली म्हणजे १०० % झाली. नंतर १ - १ महिन्याच्या अंतराने जर्मिनेट, थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रोटेक्टंटच्या आतापर्यंत २ फवारण्या केल्या आहेत आणि २ महिन्याचा ऊस असताना जर्मिनेटरचे ड्रेंचिंग (ड्रिपवाटे) एकरी १ लि./ २०० लि. पाणी याप्रमाणे दिले.

एवढ्यावर ३ महिन्याचा ऊस ४ फूट उंचीचा (छातीला लागत) आहे. जमीन डोंगर उताराची असल्याने पाण्याने सुपीक माती वाहून गेली आहे. तेथे फवत मुरूम आहे, अशा उंचावरील ठिकाणी उसाची उंची थोडी कमी असली तरी इतरांच्या सुपीक चांगल्या जमिनीतील उसापेक्षा आपला ऊस जोमदार अधिक फुटवे निघालेला, हिरवागार असल्याने गावातील लोक प्लॉट पाहण्यासाठी येतात.

सरांनी सांगितले, उंच ठिकाणी सुपीकमाती वाहून गेलेल्या मुरमाड जमिनीतील ऊस डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने आपण चांगला आणून एकरी ८० - ९० टन उत्पादन घेऊ. उतारावरील उंच भागातील ऊस तेथील माती वाहून गेल्याने मुरमाड जमिनीमुळे थोंडा बसला (कमी उंचीचा) आहे. त्यासाठी आज सरांनी सांगितल्याप्रमाणे जर्मिनेटर १ लि. आणि प्रिझम ५०० मिलीचे २०० लि. पाण्यातून एकरी ड्रेंचिंग करणार आहे. तसेच पुढील १॥ महिन्यात उसाची बांधणी करणार आहे, तेव्हा कल्पतरू खत मोठ्या प्रमाणात वापरणार आहे. पडीक जमीन वाहिवाटीखाली आणून एकरी ८० -९० टन उत्पादन घेण्याचा आमचा मानस आहे.