ट्रायकोग्रामा : शेतकऱ्यांची मित्रकीड
श्री. एस. टी. शिंदे, डॉ. बी. बी. भोसले व श्री. बी. व्ही. भेदे
कीटकशास्त्र विभाग, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
परोपजीवी किडीपैकी 'ट्रायकोग्रामा' हा एक अत्यंत महत्त्वाचा मित्रकिटक आहे. हानिकारक
किडींच्या बंदोबस्तासाठी ट्रायकोग्रामा हा परोपजीवी कीटक जगातील बहुतेक देशात सरस ठरला
आहे. हा कीटक गांधीलमाशीच्या जातीचा असून, आकाराने अतिशय लहान आहे. त्याची लांबी ०.४
ते ०.७ मि.मी. व जाडी ०.१५ ते ०.२५ मि.मी. असते. ट्रायकोग्रामाच्या जगात साधारणत:
१५० प्रजाती आहेत. ह्या ट्रायकोग्रामाच्या प्रजाती जगभरात विखुरलेल्या ८ वर्गातील व
७० कुळातील साधारत: ४०० विविध किडींच्या अंड्यावर आपली उपजिवीका करतात. भारतात ट्रायकोग्रामाच्या
२६ प्रजाती आढळून येतात. त्यापैकी ट्रायकोग्राम चिलोनीच, ट्रायकोग्रामा जॅपोनिकम, ट्रायकोग्राम
अकाई व ट्रायकोग्रामा नागरकट्टी ह्या महत्त्वाच्या जाती आहेत व त्याचा उपयोग विविध पिकांवरील
पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी होतो.
ट्रायकोग्रामा या मित्रकिडीमुळे नियंत्रण कसे होते ?
ट्रायकोग्रामा हे परोपजीवी कीटक शेतामध्ये सोडले असता ते पतंगवर्गीय हानिकारक किडींची अंडी शोधून त्यात आपली अंडी घालतात. ही अंडी १६ ते २४ तासात उबतात. अंड्यातून निघालेली ही ट्रायकोग्रामाची अळी यजमान किडीच्या अंड्यातील गर्भाचा भाग खाऊन ३ ते ४ दिवसात कोषावस्थेत जाते. कोषावस्था २ ते ३ दिवसात पूर्ण होते. अशा प्रकारे अंडी, अळी व कोश या तिन्ही अवस्था यजमान किडीच्या अंड्यातच पूर्ण होतात. त्यानंतर अंड्याला छिद्र पडून ट्रायकोग्रामाचे प्रौढ बाहेर पडतात. परत हे प्रौढ ट्रायकोग्रामा हानिकारक पतंगवर्गीय किडीच्या अंड्याचा शोध घेवून त्यावर परोपजिविका करतात. प्रौढ ट्रायकोग्रामा २ ते ३ दिवस जगतात. एक ट्रायकोग्रामा या अवधीमध्ये, १०० अंडी घालू शकतो.
ट्रायकोग्रामाचे जीवनाचक्र ८ ते १० दिवसात पूर्ण होते. हिवाळ्यात ९ ते १२ दिवसही लागतात, ट्रायकोग्रामा, किडीच्या अंड्यामध्ये आपली अंडी घालत असल्यामुळे नुकसान करणारी अळी तयारच होत नाही. त्यामुळे पतंगवर्गीय किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा फार उपयोगी आहे.
ट्रायकोग्रामाच्या निरनिराळ्या यजमान किडी कोणत्या ?
१) कपाशीवरील बोंडअळ्या
२) ऊसावरील खोडकिडा
३) मक्यावरील खोडकिडा
४) सुर्यफुलावरील अळी
५) टोमॅटोवरील फळ पोखरणारी अळी
६) भातावरील खोडकिडा
७) ज्वारीवरील खोडकिडा
८) कोबीवरील ठिपक्याचा पतंग
ट्रायकोग्रामाची निर्मिती कशी करतात ?
ट्रायकोग्रामा निसर्गात जरी असला तरी त्यांची संख्या प्रयोगाशाळेत गुणन करून वाढविता येते व त्यांना वापर करता येतो. अमेरिका, रशिया आणि इतर युरोपियन देशामध्ये ट्रायकोग्रामा 'सिटोट्रोगा सेरेलेल्ला' तर चीनमध्ये रेशीम किड्यांची अंडी वापरून प्रयोगशाळेत वाढविला जातो.
भारतात ट्रायकोग्रामा वाढविण्यासाठी तांदळावरील पतंगाची अंडी वापरली जातात. त्याकरीता तांदळावरील पतंगाची अंडी शास्त्रीयदृष्ट्या प्रयोगशाळेत उत्पादित केली जातात.
ट्रायकोकार्डची साठवण करता येते का ?
प्रयोगशाळेत कार्डवर तांदळावरील पतंगाच्या अंड्याचे परोपजीवीकारण झाल्यानंतर ऋतुमानानुसार साधारणत: ७ ठ ९ दिवसात ट्रायकोग्रामाचे पूर्ण वाढ झालेले प्रौढ बाहेर पडतात. पूर्णपणे काळे पडलेले ट्रायकोकार्ड हे बाहेर पडण्यापूर्वी किडींच्या नियंत्रणासाठी वापरणे आवश्यक असते. जर हे कार्ड वेळीच वापरायचे नसतील तर १० ते १५ दिवस १० डिग्री से. तपमानास फ्रिजमध्ये साठविता येतात व ज्यावेळी वापरायचे असतील त्यावेळी फ्रीजमधून काढून थोडावेळ सामान्य तापमानाला ठेवून नंतर शेतामध्ये वापरता येतात.
ट्रायकोकार्ड किती प्रमाणात वापरावेत ?
ट्रायकोग्रामा हा परोपजीवी किटक हरभऱ्यावर त्याच्यावरील खारामुळे व तुरीवर त्याच्या फुलांच्या विशिष्ट वासामुळे आकर्षित होत नाही. त्यामुळे ट्रायकोग्रामा या पिकांमध्ये घाटेअळीच्या नियंत्रणाकरीता प्रभावी आढळत नाही.
ट्रायकोकार्ड कसे वापरावे ?
प्रत्येक ट्रायकोकार्डवर परोपजीवीकरण दिनांक, हे ट्रायकोग्रामा बाहेर पडण्याचा अपेक्षित दिनांक, शितकरण दिनांक व कार्ड वापरण्याचा अंतिम दिनांक इ. माहिती दिलेली असते. तसेच कार्डच्या मागील बाजूने वापरण्या संबधीच्या महत्त्वाच्या सुचना दिलेल्या असतात. त्यावाचून कात्रीने कार्डचे समान भाग करावेत. त्यानंतर पानाच्या खालच्या बाजूस पट्टीचा रिकामा भाग स्टेपलरने अथवा टाचणीने टोचून प्रत्येक ८ ते १० मीटर या समान अंतरावर लावावेत.
* ट्रायकोग्रामा वापरताना काय काळजी घ्यावी?
१) ट्रायकोकार्ड हे शासन, कृषी विद्यापीठ, शासनमान्य संस्था यांचेकडूनच विकत घ्यावे.
२) ट्रायकोकार्ड विकत घेताना परोपजीवी कीटक बाहेर पडण्याची अपेक्षित तारीख बघूनच मुदतीपुर्वीचे घ्यावेत.
३) ट्रायकोकार्ड वापरण्या अगोदर त्याच्या मागील बाजूने दिलेल्या वापरासंबंधीच्या सूचना, काळजीपुर्वक वाचाव्यात.
४) ट्रायकोकार्ड प्रखर सुर्यप्रकाश, अग्नी, किटकनाशके, मुंग्या व पालीपासून दूर ठेवावेत.
५) ट्रायकोकार्ड फ्रिजमध्ये अथवा थंड जागी सुरक्षित ठेवावे.
६) ट्रायकोकार्ड सकाळी अथवा सायंकाळीच शेतात लावावे.
७) ट्रायकोकार्डवर आखलेल्या पट्ट्या कात्रीने हळूवार कापून झाडावरील पानाच्या खालील बाजूस स्टेपलरने अथवा टाचणीने टोचा.
८ ) शेतामध्ये ट्रायकोग्राम सोडण्यापुर्वी व सोडल्यानंतर हानिकारक किटकनाशकांची कमीत - कमी १० ते १५ दिवसापर्यंत फवारणी करू नये.
९) पिकास पाण्याची पाळी दिल्यानंतर परोपजीवी कीटकांचे प्रसारण करावे.
ट्रायकोग्रम वापराचे फायदे काय ?
१) ट्रायकोग्रामा वापरने त्याचा वातावरणावर व इतर मित्र किटकांवर विपरीत परिणाम होत नाही.
२) ट्रायकोग्रामाचा प्रौढ स्वत: हानिकारक किटकांची अंडी शोधून नष्ट करतो व त्याचबरोबर स्वत: ची पुढची पिढी त्या जागेवर वाढवितो. त्यामुळे ही पद्धत स्वयंप्रसारीत व स्वयंउत्पादीत आहे.
३) ट्रायकोग्रामाच्या वापराने किटकनाशकाच्या तुलनेत पीक संरक्षणावर कमी खर्च होतो व हानिकारक किडीचे प्रभावी नियंत्रण होते.

अ.क्र. | पीक | कीड | ट्रायकोकार्डस / हेक्टर |
दोन वापरातील दिवसाचे अंतर |
एकूण वापर संख्या |
१. | ऊस | खोडकिडा | ३ ते ४ | १० | ४ ते ६ |
२. | कपाशी | बोंडअळ्या | ७ ते ८ | ७ | ४ ते ६ |
३. | मका | खोडकिडा | ६ ते ७ | १० | ३ ते ४ |
४. | भात | खोडकिडा | २ ते ३ | १० | ३ ते ४ |
५. | सुर्यफूल | घाटेअळी | ४ ते ५ | ७ | ४ ते ६ |