१६ एकरात २१० क्विंटल कापूस

श्री. विलासरावा दोंडबाजी शेंडे,
मु. पो. घाटसावली, ता. हिंगणघाट, जि. वर्धा - ४४२३०७.
मोबा. ८२७५२५८५००


मी ३ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी(अॅग्रो) प्रा. लि. पुणे या कंपनीचे औषध वापरत आहे.

मी कपाशी १९ जून २०१२ ला १६ एकरमध्ये मल्लिका -२०७, अंकुर - जय, कावेरी एटीएम या वाणाची लागवड केली. लागवड करताना मी कपाशीचे बियाणे पी. एस. बी./अॅझोटोबॅक्टर/ट्रायकोड्रमा लावून बियाण्याची लागवड केली.

लागवडीनंतर ४५ दिवसांनी जर्मिनेटर + प्रिझम + क्रॉपशाईनर प्रत्येकी १ लि.+ प्रोतेक्टंट १ किलो २०० लि. पाण्यात मिसळून फवारणी केली.

त्यानंतर प्रत्येक १० दिवसांनी जर्मिनेटर ४० मिली + प्रिझम ३५ मिली + क्रॉपशाईनर ४० मिली + कॉटन थ्राईवर ३० मिली + प्रोतेक्टंट (निवळी) ३० मिली घेऊन फवारणी केली. त्यामुळे माझ्या कपाशीवर पांढरीमाशी तुडतुडे, मावा यासारखी रस शोषक किडीस प्रतिबंध झाल्यामुळे कपाशीच्या झाडाची वाढ झपाट्याने होऊन त्याला पात्या, फुले, बोंडे भरपूर प्रमाणात लागली. तसेच पात्याची ब लहान बोंडाची गळ झाली नाही. त्यामुळे मला १६ एकरमध्ये २१० क्विंटल कापूस हा पांढराशुभ्र वेचणीला अगदी सोपा गेला.

कॉटन थ्राईवरच्या सप्तामृतासह फवारण्या कपाशीवर चार वेळा केल्यामुळे कापसाची प्रतही अगदी चांगल्या प्रकारची मिळाली. त्यामुळे मी अत्यंत आनंदी आहे. मी आता तर प्रत्येक पिकावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी (अॅग्रो) प्रा. लि. पुणे यांची सप्तामृत औषधे, कल्पतरू सेंद्रिय खत वापरायचे ठरवले आहे.