डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने ३ एकर खरबुजाचे ३ महिन्यात ३ लाख

श्री. ज्ञानेश्वर उत्तरेश्वर लोहार,
मु. चोबे पिंपरी, पो. ढवळस, ता. माढा, जि. सोलापूर.
मोबा.९८८१०४२०९७



मी ४ वर्षापुर्वी स्थानिक जातीच्या लिंबाची लागवड केली होती. जमीन एकदम हलकी मुरमाड आहे. आम्ही लहान असताना त्या जमिनीत हुलगा, मटकीदेखील येत नसे. त्यातच आमचा भाग दुष्काळी. पाणी फारच कमी. अशात डोक्यावरून पाणी आणून ३ वर्षे झाडे जगविली. मात्र फारच प्रतिकूल परिस्थिती असल्याने तुटाळ होऊन २५ झाडे राहीतील.

पाण्यासाठी २ - ३ बोअरवेल घेतले, मात्र सुरुवातीच्या दोन्ही बोअरला पाणी फारच कमी लागले की, त्याचा शेतीसाठी उपयोग होईना. आम्ही वस्तीवर राहतो. या बोअरमुळे पिण्याच्या पाण्याची सोय झाली. पुर्वी आम्हाला प्यायला पाणी १॥ किमी अंतरावरून गावातून सामाईक विहीरीवरून आणावे लागत. त्यावेळी वस्तीवरील कोणी आम्हाला पाणी देत नसे.

सध्या मात्र तिसरे जे बोअर घेतले आहे, त्याला २॥ इंच पाणी लागले आहे. २८२ फुट खोल कसे बसे नेले. त्याखाली बोअरमशीन चालेना. पाणी भरपूर लागले. सध्या आमच्या भागात पाण्याची भीषण परिस्थिती असताना देवाच्या कृपेने एवढे पाणी लागल्यामुळे आम्ही असाधानी आहोत. आम्ही शेजारी पाजारी पिण्यासाठी व जनावरांसाठी पाणी देतो. पाणी विकण्याची अजिबात इच्छा नाही.

या बोअरच्या पाण्यावर लिंबाचा हस्त बहार धरला होता. याला कल्पतरू १०० किलो (२ बॅगा) नेले होते. ते सर्व वापरले. खत जादा झाले मात्र मला माहित होते सेंद्रिय खताचा वाईट परिणाम होत नाही म्हणून सर्व वापरले. या लिंबाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या एकूण ३ फवारण्या केल्या. एवढ्यावर ऐन उन्हाळ्यात लिंबू मार्केटला आले. त्याचे २॥ ते ३ हजार रू. झाले.

मी कुर्डुवाडीला रेल्वे वर्कशॉपमध्ये नोकरी करीत होतो. व्ही. आर. एस. घेऊन डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने शेती करीत आहे. मला खात्री आहे की, या तंत्रज्ञानाने आमचे दारिद्र्य निमुर्लन होईल.

एकूण ९ एकर जमीन आहे. अतिशय दुष्काळी भाग मात्र बोअरच्चा पाण्यावर यंदा ३ एकर कंदन खरबूज लावले. पहिले नोकरी करीत होतो. त्यामुळे शेती तंत्रज्ञानाची फारशी माहिती नसल्याने शेजाऱ्याच्या मदतीने हे पीक घेतले. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीबद्दल वाचले असल्याने या तंत्रज्ञानाबद्दल माहिती होती. मात्र एवढ्या मोठ्या क्षेत्रावर मनाप्रमाणे वापर करून उत्पादन नाही मिळाले तर खर्च अंगावर येईल, म्हणून शेजाऱ्याच्या मदतीने वापर केला. तो नेहमी खरबूज लावतो. त्यानेही खरबुज लावले असल्याने त्याचा रासायनिक खतावर भर होता. त्याच्या सल्ल्यानुसार मी ही वापर केला.

मी त्याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीबद्दल सांगत होतो. मात्र तो फारसे लक्ष देत नसे. मी मात्र डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची देखील एक फवारणी केली. मला चांगला फरक जाणवला. मल्चिंग वर ७ फूट अंतरावर बेड केले असून सव्वा फुटावर लागवड आहे. ठिबक केले आहे. शांतीलेक्स मल्चिंग पेपरचा ३ एकराला ३२ हजार खर्च आला. त्यावर ३ पिके निघतात. ड्रिपसाठी ७५ हजार रू. खर्च आला. १६ एप्रिल २०१३ मला चालू झाला. दिवसाड १ पीकअप म्हणजे १२५ क्रेट तर कधी १५० - १७५ क्रेट माल निघत होता. ७ मे ला शेवटचा तोडा झाला. एकूण १४०० क्रेट माल निघाला. एक क्रेट १८ ते २० किली भरत होते. क्रेटमध्ये १३ ते १५ फळे बसत होती. लहान आकाराची २० - २२ फळे बसायची. या फळांना वाशी मार्केटला २३ रू. किलो तर निम्मा माल पुणे मार्केटला लवांदे यांच्याकडे १८ रू. एक नंबर तर २ नंबर १५ रू., ३ नंबर अगदी थोडा शेवटचा माल निघाला, त्याला १० -१२ रू. किलो भाव मिळाला.

शेजारचे प्लॉट पाण्याअभावी गेले असताना आम्हाला या खरबुजापासून कमी पाण्यावर ३ लाख रू. उत्पन्न ३ महिन्यात मिळाले. यामध्ये स्थानिक विक्रीचे उत्पन्न धरले नाही. या पिकाला फवारणी व खताचा एकून ६० हजार रू. खर्च आला. आज (८ मे २०१३) सरांचा सल्ला एवढ्यासाठी घेण्यास आलो की, मला डॉ.बावसकर तंत्रज्ञानाबद्दल पुर्णता खात्री आली असून याच मल्चिंग पेपरवर खरबुजावर पुन्हा १० मे ला खरबुज प्लॉट रमजानला माल येण्याच्या दृष्टीने करायचा आहे. तर सरांनी संगीतल्याप्रमाणे अगोदर लावलेल्या २ वेलांच्या अर्ध्या-अर्ध्या क्षेत्रावर मधोमध बॉबी व कुंदन दोन्ही वाणांची अर्ध्या - अर्ध्या क्षेत्रावर लागवड करणार आहे.

बॉबी खरबुज हिरवे असते, त्याला कायम भाव कुंदनपेक्षा जादा मिळतो म्हणून बॉबीचा प्रयोग करायचा आहे. या दोन्ही वाणांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरणार आहे.