गारपिटीतही माझे डाळींब इतरांपेक्ष सरसच !
श्री. बाळासाहेब तानाजी धोक्रट,
मु.पो. सोमठाणे, ता. सिन्नर, जि. नाशिक.
मोबा.
९५५२९०७६७९
मी डाळींबाच्या भगवा जातीची २ वर्षापुर्वी १२' x १०' अंतरावर ४३ गुंठे लागवड केली.
त्यात ४११ झाडे आहेत. त्यापासून मला दर्जेदार उत्पन्न घ्यायचे आहे. आज रोजी माझे वय
७१ वर्षे आहे. माझे शिक्षण जुनी ११ वी पूर्ण आहे. मी कृषी सहाय्यकाचे १४ वर्षे काम
केले. मला दोन मुले असून ते शिक्षक आहेत. नोकरी निमित्त ते दोघेही बाहेरगावी असतात.
मला शेतीची मनापासून आवड आहे. मला नव - नवीन प्रयोग करायला आवडतात.
मी माझ्या डाळींब बागेसाठी डॉ. बावसकर सरांचे तंत्रज्ञान वापरण्याचा योग आमच्या गावातील शेतकऱ्यांकडे येत असलेले प्रतिनिधी श्री. ईश्वर शिंदे यांच्या मार्गदर्शनामुळे आला. आज माझी बाग पाणी देऊन ९० - दिवसांनी झाली असून सगळ्याच बाबींमध्ये इतरांच्या तुलनेत आघाडीवर आहे. सर्व क्रिया फास्ट होत आहेत. ते केवळ डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या तीन फवारण्या केल्यामुळे. पहिले पाणी दिल्यानंतर ४ थ्या दिवशी जर्मिनेटर १ लि. + प्रिझम १ लि. + २०० लि. पाणी या प्रमाणात फवारणी केली. परिणामी इतरांच्या तुलनेत माझ्या बागेचा फुटवा फारच चांगला निघाला व फुलकळी अधिक व जोमदार निघाली. त्याचवेळी जर्मिनेटर दिड लिटर २०० लि. पाणी ड्रिपद्वारे ३० दिवसांच्या अंतराने २ वेळेस ड्रिपद्वारे सोडले. परिणामी पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढून मुळ्या चांगल्या प्रकारे कार्यान्वीत झाल्या. दुसरी फवारणी २५ दिवसांनी थ्राईवर १ लि. + क्रॉपशाईनर १ लि. + न्युट्राटोन १ लि. + २०० लि. पाणी याप्रमाणे केली. परिणामी पाने निरोगी, रुंद होऊन फुलांनी गाठ चांगली धरली व कळीची गळ अजिबात झाली नाही. ह्या दरम्यान आमच्या भागात गारपीट झाली. त्याने बरीच फुलगळ झाली. पाने खराब झाली, पण अशा परिस्थितीतही माझी बाग सुरक्षित राहिली. गारपिटीनंतर परत वरीलप्रमाणे फवारणी केली. तर आज माझी बाग ९० दिवसांनी असून फळे पेरू आकाराची आहेत. एका झाडावर पहिल्याच वर्षी ६० ते ६५ फळे आहेत. १२० दिवसांची झाल्यावर जेवढी फळे होतात तेवढी माझी ९० दिवसातच झाली. सर्व क्रिया जलद चालू आहे. ही किमया केवळ डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरल्यामुळे झाली. त्यामुळे दर्जेदार उत्पन्न घेण्याची खात्री मला आली.