फळगळ थांबून रोगट व्हायरसयुक्त पपईची रोगमुक्त फळबाग

श्री. महादेव जगताप,
मु.पो. दहिवली, ता. माढा, जि. सोलापूर, मोबा. ९१७५४४४९७७


मी २ एकर तैवान ७८६ पपईची लागवड ६' x ६' वर केली आहे. जमीन भारी असून रोपे आणून लागवड केल्यानंतर पपई जोमाने वाढू लागली. पण ३ ते ३।। महिन्याची झाल्यानंतर पाने पूर्ण अकसून जाऊ लागली, तसेच फुलगळ व्हायला लागली होती. भरपूर फवारण्या केल्या, पण पपईची बाग काही सुधारेना. त्यानंतर मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करण्याचा विचार केला व कंपनीचे प्रतिनिधी श्री. शहाजी गायकवाड (९८५०५१५९९१) यांना फोन करून सल्ला विचारला. त्यांनी प्लॉटवरती येऊन पाहणी करून एकरी १ लि. जर्मिनेटरची आळवणी करण्यास सांगितली व फवारणी जर्मिनेटर ५०० मिली + थ्राईवर १ लि. + न्युट्राटोन १ लि. + हार्मोनी २५० मिली + २०० लि. पाणी याप्रमाणे केली. त्याने फुलगळ थांबली. बाग चांगली फुलू लागली. परत महिन्या ते दीड महिन्याने बागेवर अचानक व्हायरसचा मोठ्या प्रमाणात अॅटॅक आला होता. करमाळा तालुक्यामध्ये भरपूर प्रमाणात पपई केली जाते. फेब्रुवारी २०१४ मध्ये भरपूर बागा व्हायरसने वाया गेल्या. व्हायरस कंट्रोल झाला नाही. आमच्या शेजारील ४ बागा काढून टाकल्या. आमच्या बागेवर सुद्धा अॅटॅक होताच. परंतु लगेच गायकवाड यांनी थ्राईवर १ लि. + न्युट्राटोन १ लि. + हार्मोनी २५० मिली + स्प्लेंडे २५० मिली + २०० लि. पाणी ही फवारणी करायला सांगितली. मग पुणे ऑफिसला जाऊन दोन फवारणीची औषधे घेवून गावाकडे पाठविली व लगेच फवारणी केली असता बाग चांगली सुधारली. आजूबाजूचे लोक बाग सुधारली म्हणू लागले. ८ दिवसांनी पुन्हा वरीलप्रमाणे फवारणी केली असता पाने पूर्ण पसरून टवटवीत झाली. फळांची फुगवण चांगली होऊ लागली. आता १०:२६:२६ व पोटॅश + मायक्रोन्युट्रेंसचा डोस दिला आणि मोकळे पाणी देवून भिजवले आहे. सध्या (२५ एप्रिल २०१४) फळे साधारण १ ते २ किलो वजनाची आहेत.