विद्यार्थी दशेत ३ एकर शेवग्याचे खात्री नसताना १० महिन्यात ३।। लाख तर आंतरपीक कांद्याचे १।। लाख
श्री. सचिन काळे,
सतीश काळे, मु. पो. तेलंगशी, ता. जामखेड, जि. अहमदनगर .
मोबा.
९७६४९८३२५७/९१५८८७३२४७
स्कॉलरशिप कर्जातून विशेष प्राविण्यासह (Distinction) इंजिनीअरचे शिक्षण व उत्तम नोकरी
आम्ही सख्खे व चुलत अशी ७ जण भावंडे. त्यातील आम्ही दोधे पुण्यात असतो व ५ जण घरी असतात. शेती भरपूर पण योग्य नियोजनाचा अभाव. पारंपारिक शेतीतून फारसा नफा होत नसे. बहुतेकदा तोटाच सहन करावा लागे. मी सचिन काळे १२ वि पर्यंतचे शिक्षण २००९ मध्ये बीड येथून पूर्ण केल्यावर व्ही. आय. टी. कॉलेजमध्ये बी. टेक केमिकलला अॅडमिशन घेतले. त्यावेळी पहिल्या वर्षाला ७३ हजार रू. फी होती. घरची परिस्थिती नाजून असल्याने एवढा खर्च करणे शक्य नव्हते. त्यातच शैक्षणिक कर्ज काढायचे म्हटले मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थी इंजिनिअरींगला टिकेल की नाही याची शाश्वती नसल्याने कॉलेजने रिझल्टची वाट पाहिली. मग पहिल्या वर्षाचा खर्च पाहुण्यांनी केला. पहिल्यावर्षीचा रिझल्ट मी (सचिन) विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण झाल्यावर दुसऱ्या वर्षासाठीचे कॉलेजचे शैक्षणिक कर्ज १ लाख १६ हजर रू. मंजुर झाले. असे पुढील ३ वर्षासाठी फी एवढे कर्ज मिळत गेले. त्यानंतर मे २०१३ मध्ये विशेष प्राविण्यासह पदवी पूर्ण झाल्यावर एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये हिंजवडी (पुणे) येथे चांगल्या पगाराची नोकरी लागली.
कमवा व शिका योजना
माझ्या बरोबरीचा भाऊ सतीश काळे (९१५८८७३२४७) याने पुण्यामध्ये पिंपरीतील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले कॉलेजमध्ये बी. ए. इकॉनॉमिक्सला अॅडमिशन घेतले. घरची परिस्थिती नाजूक असल्याने त्याने 'कमवा व शिका' च्या माध्यमातून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २०१३ - २०१४ ला पोस्ट ग्रॅज्युएशनचे शिक्षण चालू केले, ते २०१५ मध्ये पूर्ण होईल.
आम्ही दोघा भावांनी शिक्षण घेत असतानाच शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान वापरून शेतीचा विकास करण्यासाठी माहिती घेऊ लागलो. ते करत असताना घरूनच विरोध होऊ लागला. घरचे म्हणायचे, "मुलांने तुम्ही शेतीकडे लक्ष देऊ नका, शिक्षणावर भर द्या."
शिक्षण चालू, ३ एकर शेवगा लागवड आळीने धोक्यात, बियाचे पैसे निघतात की नाही अशी चिंता
आम्ही मात्र शिक्षणावर भर देत असतानाचा शेतीकडेही प्रयोग सुरू केले. यामध्ये प्रथम शेवगा पिकाची लागवड करण्याचे ठरविले. भूम तालुक्यातील पाटण सावंगी येथील प्रगतीशील शेतकरी भोईटेदादा यांच्याकडून ३ एकर शेवगा लागवडीसाठी २००० रू. चे बी आणले. घरच्यांकडून ३ एकर जमीन घेऊन त्यांना सांगितले, हे ३ एकर क्षेत्र आम्ही आमच्या पद्धतीने करतो. बाकी ४० - ४२ एकर जमिनीत तुम्ही तुमच्या पद्धतीने पिके घ्या. घरच्यांना वाटायचे शेती करण्याच्या नादात मुलांच्या शिक्षणावर परिणाम होईल म्हणून त्यांचा कायम विरोध होता. मात्र आमच्या आग्रहाखातर त्यांनी ३ एकर जमीन आमच्यावर सोपविली. त्यामध्ये ६' x ६' वर २५ जून २०१३ ला शेवग्याची लागवड केली. जमीन काळी पाण्याचा निचरा होणारी आहे. लागवडीनंतर पहिल्या २ महिन्यात शेवग्यावर अळीचा प्रादुर्भाव होऊन पानांना जाळी होत होती. त्यामुळे झाडांची वाढ खुंटली होती. ३ महिन्याचा शेवगा काही गुडघ्याएवढा तर काही कंबरेला लागत होता. अळीच्या नियंत्रणासाठी स्थानिक दुकानातून औषधे आणून फवारण्या चालू होत्या. फरक ३ दिवासांपुरता पडत, मात्र ४ थ्या दिवशी पुन्हा अळ्या दिसत. अळी पुर्णपणे काही आटोक्यात येत नव्हती. त्यामुळे दर तिसऱ्या दिवशी फवारणी करून घरचे कंटाळले होते. शेवटी म्हणू लागले की, २००० रू. बियाण्याचा खर्च जरी शेंगा विकून निघाला तरी खूप झाले. शेवग्याच्या शेताला पाळी घालून मोडून टाका म्हणू लागले.
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने कमालीचा फरक पडल्याचे जाणवले
अशातच नोव्हेंबर २०१३ मध्ये पुण्यातील अॅग्रोवन प्रदर्शनातून माहिती घेत असताना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे शेवग्याचे पुस्तक नेले. त्यावेळी शेवगा ५ महिन्याचा होता. पुस्तकातील माहिती वाचून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी पुणे ऑफिसला भेट दिली. तेथून सविस्तर माहिती घेऊन ३ एकर शेवग्यासाठी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रोटेक्टंट प्रत्येकी ३ -३ लि. घेऊन गेलो.
प्रथम जर्मिनेटर ३ एकर शेवग्याला एकरी १ लि. २०० लि. पाण्यातून सोडले. नंतर थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रोटेक्टंटची पहिली फवारणी केली. तेवढ्यावरच आठवड्यात फरक जाणवू लागला. १ महिन्याच्या आत वाढ खुंटलेली सर्व झाडे वाढली. फुलकळी देखील भरपूर लागली. म्हणून सप्तामृताच्या उरलेल्या औषधांची दुसरी फवारणी केली. त्यामुळे फुलकळी गळण्याचे प्रमाण अत्यल्प राहून फळधारणा झाली. शेंगा नोव्हेंबर अखेरीस चालू झाल्या. जामखेडच्या व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार आठवड्यातून २ - ३ वेळा २ ते ३ क्विंटल शेंगा नेत असे. पहिला बहार २ महिने चालला. झाडे लहान असल्याने मालाचे प्रमाण साधारण होते. सुदैवाने बाजारभाव अधिक होते। सुरुवातीला ६० ते ६५ रू./किलो भाव मिळाला. नंतर ५० ते कमीत कमी ४० रू. भाव मिळाला. या बहारापासून एकूण ३०० क्विंटल माल ३ एकरातून मिळाला. नंतर फेब्रुवारीअखेरीस दुसऱ्यांदा लगेच शेंगा चालू झाल्या. त्यावेळी उत्पादनात भरपूर वाढ झाली. २५ एप्रिलपर्यंत २ महिन्याच्या आत ६० क्विंटल माल विकला. मात्र या बहाराला मार्चमध्ये सुरुवातीस भाव २५ रू. नंतर १५ रू. आणि सध्या १२ रू. किलो असा कमी - कमी होत गेला.
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने ५ लाखाचे उत्पन्नातून सोयाबीन तुरीचा खर्च व शैक्षणिक कर्जाची फेड
एकंदरीत २५ जून २०१३ ला लावलेल्या शेवग्यापासून २५ एप्रिल २०१४ या १० महिन्याच्या काळात ३ एकरातून ३।। लाख रू. झाले. याच शेवग्यात शेवगा लागवडीच्यावेळी शेवग्याला भोत लावून (ट्रॅक्टरने मातीची भर) करून मधल्या पट्ट्यात फेक कांद्याचे आंतरपीक घेतले होते. तर त्याच्यापासून १०० पिशव्या उत्पादन मिळून तेजीचे भाव सरसरी ३० ते ४० रू. किलो सापडल्याने १।। लाख रू. झाले. असे ३ एकरातून ५ लाख रू. एवढे उत्पन्न आम्हाला पारंपारिक पद्धतीतून यापुर्वींच्या पिकांतून कधीच मिळाले नव्हते. विशेष म्हणजे घरच्यांनी इतर ४० - ४२ एकरास केलेला सोयाबीन - तुरीवरील खर्चदेखील याच शेवग्यातून भावविता आला. तसेच शिक्षणाच्या खर्चाचे कर्जही यातूनच फेडले.
या अनुभवातून सरांच्या 'सिद्धीविनायक' शेवग्याची १।। एकर नवीन लागवड
आमच्या घरी कोणीच नोकरीला नव्हते. त्यामुळे या शेवग्यापासून आठवड्याला ७ ते १० हजार रू. मिळत असल्याने सर्वजण खूष झाले. आता तेच म्हणतात. अजून १।। एकर शेवगा लावायचा आहे. त्यासाठी 'सिद्धीविनायक' शेवग्याचे बी घेणार आहे.
कॉलेजमध्ये कमवा व शिका प्रकल्पात वरील शेवग्याचा प्रकल्प सादर करून प्रथम क्रमांकाचे बक्षीस
मी सतीश काळे प्रत्यक्ष अनुभवातून 'कमवा आणि शिका' यातून शेवग्याचा प्लॉट यशस्वी करून त्यातून कॉलेजमध्ये प्रकल्प सादर केला, तर कॉलेजमध्ये पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मला मिळाले. इतर विद्यार्थ्यांनी पवणचक्की वगैरे उपक्रम सादर केले होते.
पहिल्याच फेल गेलेल्या शेवग्याचे प्रयोगात 'कृषी विज्ञान' मुळे घवघवीत यश, साऱ्या देशाला मार्गदर्शक !
आम्ही 'कृषी विज्ञान' मासिकाचे वर्गणीदार असून त्यातील शेतकऱ्यांचे अनुभव वाचण्यासारखे असतात. त्यातूनच नवीन प्रयोग करण्यास प्रेरणा मिळते. साधारणपणे कोणतही प्रयोग करायचे म्हटले तर सुरूवातीतीला २ - ३ वेळा अपयश येते. मात्र आमचा हा पहिलाच प्रयोग असून तो डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे यशस्वी झाला. त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे.
सरांच्या मार्गदर्शनाने ग्रुप (कॉन्ट्रॅक्ट) फार्मीग
आता आमचे मित्र म्हणतात, आपण ग्रुपमध्ये शेती करू. तुम्ही सांगाल ते पीक व तंत्रज्ञान वापरू, तेव्हा आता आम्ही ८ जण प्रत्येकी १ - १ एकर ढोबळी मिरची डॉ.बावसकर सरांच्या मार्गदर्शनाखाली घेणार आहे. यामध्ये आम्ही २०१४ मध्ये १।। एकर 'सिद्धीविनायक' शेवगा व १ एकर ढोबळी मिरची लावणार आहे.