कॉफीची यशस्वी लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


अॅबिसिनीया हे कॉफीचे उगमस्थान समजले जाते. डच देशातून दक्षिण अमेरिकेकडे कॉफीचा प्रसार झाल्याचा दावा डच प्रवाशी करता आणि तेथून कॉफिची लागवड ब्राझील देशात झाली. डच प्रवाशांनी नेदरलँड, इस्टइंडिज इ. प्रदेशात कॉफीचा प्रसार केलेला आहे. तेथून स्पॅनिश प्रवाशांनी फिलीपाइन्समध्ये कॉफीचा प्रसार केला. काही मुस्लिम संत मक्का यात्रा करून कर्नाटक राज्यात, स्थायिक झाले, त्यावेळी त्यांनी कर्नाटकच्या टेकड्यांवर कॉफीची लागवड केल्याचे आढळून आले आहे. तेव्हापासून भारतात कॉफीची लागवड होण्यास सुरुवात झाली. सध्या मध्य अमेरिका, ब्राझील, कोलंबिया, वेस्ट इंडिज, जावा, सुमात्रा, फिलीपाईन्स बेटे, केनिया, पूर्व आफ्रिका दक्षिण भारत इत्यादी प्रदेशांत कॉफीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. कॉफीचे पेय करण्याची प्रथा अरब राष्ट्रात फार पुर्वीपासून प्रचलित आहे.

* वनस्पतीशास्त्रीय दृष्टिकोन : कॉफीचे झुडूप कदंब कुलात (Rubiaceae) मोडत असून या झुडपांची उंची, पानांची भिन्नभिन्न असते. झुडुपांची उंची १२० सें. मी. पासून ३६० सें.मी. पर्यंत असते. फांद्या मुख्य खोडावर एका आड एक असून त्यांची जाडी जातीनुसार ३ ते ५ सें.मी. पासून २० ते ३० सें.मी. पर्यंत असते. पानांची रचना जोडीजोडीने एका आड एक असते. ही पाने गुळगुळीत असतात. कॉफीच्या फुलांचे गुच्छ दुधी रंगाचे असून ते पानांच्या देठापासून निघतात. प्रत्येक फुलाला ५ - ५ पाकळ्या असतात. तसेच फुलामध्ये ५ परागदांडे असतात. कॉफीच्या फुलांची रचना अशी असते की त्यामुळे संकरित जाती कसल्याही तऱ्हेची इजा न होता निर्माण करता येतात. कॉफीच्या प्रत्येक फळामध्ये दोन बिया असतात.

सध्या कॉफीच्या कॉफी अॅरेबिका (Coffee arabica), कॉफी लिबेरिका (Coffee Liberica) व कॉफी रोबस्टा (Coffee Robusta) ह्या तीन जाती प्रामुख्याने लागवडीखाली आहेत.

* हवामान : अॅरेबिका कॉफीचे मळे समुद्रसपाटीपासून ८५० ते १८०० मीटर उंचीच्या प्रदेशात घेता येतात. तर रोबस्टो कॉफीचे मळे ८५० मीटर उंचीच्या प्रदेशात घेता येतात. वर्षभरात विस्तृत प्रमाणात १५२.४ ते २२८.६ मि.मी. पडणारा पाऊस कॉफीच्या मळ्यांना चांगला मानवतो. कॉफीचे मळे ३०४.८ मि.मी. पडणाऱ्या पावसाच्या प्रदेशातही घेता येतात. फक्त कॉफीच्या तोडणीच्या वेळेला तीन महिने पाऊस नसावा. अधिक पावसाने कॉफीची गळालेली पाने सडण्याच्या संभव असतो. तसेच अनियमीतपणे पडणाऱ्या पावसामुळे सुद्धा कॉफीच्या मळ्यांना पुष्कळ धोका असतो. कॉफीच्या पिकासाठी दमट हवामानाची आवश्यकता असते. कॉफीला १२.७५ डी. सें.ग्रे. तापमान चांगले मानवते. ३२.२ डी.सें.ग्रे. तापमान असणाऱ्या भागात देखील कॉफीचे मळे आढळतात. उन्हामुळे फळे चुरगळण्याचा संभव असतो. त्यसाठी मळ्यात घनदाट छाया असणारी झाडे लावावी लागतात. डिसेंबर - जानेवारी महिन्यात मात्र फळे पक्व होण्यास हवा कोरडी असावी लागते.

* जमीन : खोल रेताळ (लॅटराईट) तसेच पोयट्याच्या, चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत कॉफिची वाढ चांगल्याप्रकारे होते. अशा प्रकारच्या जमिनी कर्नाटक राज्यात तसेच त्रावणकोर, कोचीन भागात आढळतात. भारी मातीच्या परंतु त्यामध्ये वाळूचे थोडे फार प्रमाण असणाऱ्या जमिनी कॉफीच्या मळ्यांना योग्य ठरतात. कॉफीच्या मळ्यातील जमिनी सहसा आल्ययुक्त असतात. त्यांचा आम्लविम्ल निर्देशांक ४.५ ते ५.५ इतका असतो. काही वेळा तो ६ ते ६.५ पर्यंत देखील असू शकतो. कॉफीच्या चांगल्या वाढीसाठी जमिनीचा आम्लविम्ल निर्देशांक ६ ते ६.५ असणे आवश्यक आहे. कॉफीच्या मळ्यामध्ये कॉफीची गळालेली पाने गाडली जाऊन त्याचे खत बनते व त्यामुळे जमिनीचा कस टिकून राहतो. कॉफीचे मळे सहसा डोंगराच्या उतारावर असतात.

* पूर्व मशागत : सपाटीवरील जमिनीत कॉफीची लागवड करावयाची असल्यास जमिनीत पहिल्या वर्षी २० ते २५ टन शेणखत घालतात. २ - ३ वर्षातून एकदा याचा प्रमाणात खताचा पुरवठा करावा लागतो. त्यानंतर नत्र, स्फुरद आणि पालाश प्रती हेक्टरी अनुक्रमे ४० ते ५० किलो, ५० ते ५६ किलो आणि ६० ते ८० किलो या प्रमाणात निरनिराळ्या खतांद्वारे मार्च आणि सप्टेंबर अशा दोन हप्त्यांत द्यावे. जमिनीत चुन्याचे प्रमाण कमी आढळल्यास योग्य प्रमाणात जमिनीस चुन्यास पुरवठा करावा. कॉफीच्या रोपांना योग्य आणि जास्तीत जास्त कल्पतरू खत घालून भरघोस उत्पन्न मिळाल्याचे सिद्ध झालेले आहे. कॉफीला द्यावयाची खते रोपाभोवती पसरून अगर खणून देतात.

लागवडीपूर्वी एक वर्ष अगोदर सावलीसाठी सिल्वर ओक, फणस यासारखी झाडे ३ ते ४ मी. अंतरावर खड्डे घेऊन लावतात. नंतरच्या काळात सावलीची झाडे कमी कमी करून १२ ते १३ मीटर अंतरावर ठेवतात. भरपूर सूर्यप्रकाश आणि हवा मिळण्यासाठी झाडांची उंची ६ ते १२ मी. ठेवून शेंडे तोडून टाकावेत. सावलीसाठी लावलेल्या झाडांची पाने आणि फांद्या वाळल्यावर कॉफीच्या झुडूपावर पडतात आणि त्यामुळे कॉफीच्या झुडूपांना थोड्याफार प्रमाणात इजा पोहचण्याचा संभव असतो. म्हणून दरवर्षी वाळलेली पाने आणि कांद्या काढून कॉफीचे मळे स्वच्छ ठेवावे लागतात. सावलीसाठी लावलेली झाडे रोग किडीस बळी पडणारी नसावीत. कारण अशा झाडांवर रोग किडीचा प्रादुर्भाव झाला तर त्यापासून कॉफीच्या झाडांनाही इजा होण्याचा संभव असतो. म्हणून अशा प्रकारच्या झाडांचा सावलीसाठी उपयोग टाळावा.

ब्राझील आणि केनिया या देशांत कॉफीचे मळे सपाट जमिनीवर घेतले जातात अशा मळ्यातील कॉफीचे उत्पादनही भरपूर येते. असे बऱ्याचशा प्रयोगांती सिद्ध झाले आहे. परंतु भारतात मात्र ऊन, वारा आणि पाऊस यापासून संरक्षण होण्यासाठी सावलीच्या झाडांची लागवड करणे आवश्यक ठरते. सिल्व्हर ओकची झाडे लावून त्यामध्ये डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने सिन्नर (नाशिक), नारायणगाव भागातील शेतकऱ्यांनी कॉफीची लागवड यशस्वी केली आहे.

जानेवारी ते एप्रिल या काळात उतारदर्शकाप्रमाणे (Contour) ४५ सें.मी. x ४५ सें.मी. x ४५ सें.मी.किंवा ४५ सें.मी. x ६० सें.मी. x ४५ सें.मी. आकाराचे खड्डे खोदतात. खड्ड्यांमध्ये १.५ ते ३.५ मीटर इतके आडवे उभे अंतर ठेवतात. लावणीचे वेळी शेणखत, झाडांचा पालापाचोळा टाकून खड्डे भरून काढतात.

* रोपे तयार करणे : पाण्याच्या साठ्याजवळ सुपीक आणि खोल जमीन कॉफीची रोपे तयार करण्यासाठी वापरली जाते. एक हेक्टर लागवडीसाठी साधारणत: २ ते ३ गुंठे इतका भाग रोपे तयार करण्यासाठी निवडून तो ठराविक अंतरावर रस्ते ठेवून विभागाला जातो. नंतर जमीन खोलवर नांगरून आणि खणून भुसभुशीत केली जाते. झाडांचा वाळलेला पालापाचोळा आणून तो जमिनीत खोलवर थरांच्या स्वरूपात गाडला जातो. अशा तऱ्हेने तयार केलेल्या जमिनीत ७५ सें. मी. रुंदीच्या आणि ३० सें.मी. उंचीच्या अरुंद सऱ्या पाडल्या जातात. ह्या सऱ्या ५ ते ६ मीटर लांब असतात. अशा सऱ्यांवर चांगले कुजलेले शेणखत भरपूर प्रमाणात पसरून मिसळले जाते. सबंध रोपवाटिकेवर १।। मीटर उंचीचे बांबू रोवून पालापाचोळ्याची सावली तयार करावी लागते. अशा प्रकारची तयारी मे पर्यंत पूर्ण झाली पाहिजे. इतर रोपांप्रमाणे गादी - वाफ्यावर वाढविलेली कोवळी रोपे २० ते २५ सें.मी. अंतरावर तयार केलेल्या सऱ्यांवर लावावीत. जुलै महिन्यापर्यंत ती चांगल्या स्थितीत वाढण्यासाठी त्यांना पाणी पुरवठा करीत राहवा, रोपे २ ते ३ कांड्यावर आल्यावर त्यांची मळ्यात योग्य अंतरावर पुनर्लागण करावी.

रोपे तयार करण्यासाठी वापरावयाचे कॉफीचे बी पक्व झालेल्या कॉफीच्या फळांपासून काढलेले असावे. प्रथम ६ x १ मीटर आकाराच्या रोपवाटिकेत गादी वाफ्यावर बी टाकून रोप वाढविले जाते. अशावेळी पहिले काही दिवस दिवसातून दोन वेळा आणि नंतर दररोज झारीने पाणी द्यावे. रोपवाटिकेत बी उगवण्यास ४० ते ६० दिवस लागतात.

कॉफीची रोपे वाढत असतानाच सावलीसाठी लावलेल्या झाडांचे नांगे भरण्यासाठी देखील सावलीच्या झाडांची रोपे वाढवावीत. प्रथमत: रोपवाटिकेत वाढविलेली रोपे नंतर बांबूच्या टोपलीत वाढविली तरी चालतात.

कॉफीची लागवड ही अभिवृद्धी किंवा छाटकलमे करून देखील केली जाते. कॉफीचे उत्पादन, त्यावर पडणारी कीड आणि रोग पाहता कलमे करून कॉफीची लागवड करणे अधिक श्रेयस्कर ठरते. कारण अभिवृद्धी करण्यासाठी भरपूर उत्पन्न देणाऱ्या चांगल्या जातीची निवड करणे सहजासहजी शक्य होते.

अभिवृद्धी कॉफीच्या गड्ड्यातून निघालेल्या कोंबाच्या झाड्या वापरल्या जातात. या काड्या कॉफीच्या झाडाची छाटणी करताना निवडणे शक्य होते. कॉफीच्या अभिवृद्धीसाठी निवडलेले तुकडे कमीत - कमी एक एक कांडे (Luter Node) असावेत. निवडलेल्या काड्यांचा खालचा भाग पाचरीच्या आकाराचा करून ६ x १ मी. आकाराच्या गादीवाफ्यावर तुकड्यांची लागवड करावी. गादीवाफ्यांना पहिला महिना दररोज दोन वेळेस पाणी द्यावे. आणि नंतर दिवसातून एकदा पाणी द्यावे. ४ -५ महिन्यांत लावलेल्या तुकड्यांना जमिनीत मुळ्या फुटल्याचे आढळून येते. कमी कालावधीत तसेच अधिक प्रमाणात मुळ्या फुटण्यासाठी आणि जास्तीत - जास्त कलमे यशस्वी होण्यासाठी अभिवृद्धीसाठी निवडलेले तुकडे २५ मिली जर्मिनेटर + १ लि. पाणी या द्रावणात १० मिनिटे भिजवून वापरावेत.

* लागवड : कॉफीच्या रोपांची लागवड झिमझिम पडणाऱ्या पावसात करावी लागते. अधिक जोराचा पाऊस कॉफीच्या रोपांना हानिकारक ठरतो. त्यामुळे जुलै ते सप्टेंबर हा काळ कॉफीच्या लागवडीसाठी योग्य समजला जातो. सर्वसाधारणपणे ऑगस्ट महिन्यात कॉफीची लागवड केली जाते. रोपवाटिकेतून काढलेली रोपे त्यांच्या मुळांच्या मातीसह कायमच्या जागेत तयार केलेल्या खड्ड्यात कल्पतरू सेंद्रिय खत २५० ग्रॅम टाकून लावावी.

लागवडीनंतर १० लि. पाण्यामध्ये १०० मिली जर्मिनेटर + ५० ग्रॅम प्रोटेक्टंट घेऊन या द्रावणाचे रोपांवरून ड्रेंचिंग करावे, त्याने पांढऱ्या मुळ्यांचा जारवा वाढून रोपे कायम जागी लवकर स्थिरावतात. दोन रोपांतील आडवे उभे अंतर अॅरेबिका जातीत १.५० ते २.२५ मीटर तर रोबस्टा जातीत २.७० ते ३.० मीटर इतके ठेवतात. हलक्या प्रतीच्या जमिनीपेक्षा भारी जमिनीत हे अंतर जास्त ठेवावे लागते. वेगवेगळ्या विभागात हे अंतर कमी जास्त प्रमाणात ठेवले जाते. खड्ड्यात रोप लावल्यानंतर त्याला बांबूच्या काठीचा आधार द्यावा. कोवळ्या रोपांना उन्हापासून त्रास होऊ नये म्हणून सागाची अगर फणसासारख्या झाडांची जाड पाने रोपांवर अंथरावी. कॉफीच्या २ ओळींतील जमिनीत झटकन उंच वाढणारी हिरवळीची पिके घ्यावी. त्यामुळे पिकाला तात्पुरती सावली मिळते व जमिनीचा पोतही सुधारतो. जुन्या कॉफीच्या मळ्यात चवळीसारखी खुरटी हिरवळीची पिके घेतली जातात. त्यामुळे तणांची वाढ रोखली जाते आणि जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत होते.

* आंतरमशागत : कॉफीच्या झांडाची सुरूवातीची वाढ अगदी हळूहळू होत असते. सावलीसाठी लावलेली झाडे असून सुद्धा तणांची वाढ अगदी झपाट्याने होत असते. तणांच्या बंदोबस्तासाठी वर्षांतून दोन वेळेस खणणी खुरपणी करणे आवश्यक असते. पहिली खणणी व खुरपणी सप्टेंबर - नोव्हेंबर या काळात आणि दुसरी खणणी व खुरपणी फेब्रुवारी ते मार्च या काळात करावी. खोडाच्या आसपास पडलेली पाने खोडाजवळील हवा खेळती राहण्यास मदत करतात, त्यामुळे खोडाजवळील पालापाचोळा न हलविता खोडाजवळील जागा खुरप्याने अगदी हलवून घ्यावी. कॉफीच्या कोवळ्या झाडांची मुळे अगदी वर असतात. त्यामुळे खोडाजवळील जमीन हलविण्याचे काम फार काळजीपूर्वक करावे लागते.

खोडे पोखरणाऱ्या अळ्यांनी किंवा किड्यांनी काही झाडे मेली असता त्या जागी नवीन झाडे लावणे आवश्यक असते. त्यास नांगे भरणे असे म्हणतात. नांगे भरण्यासाठी रोपवाटिकेत काही रोपटी सतत वाढू द्यावी लागतात. कॉफीच्या कोवळ्या झाडांची मुळे अगदी वर असतात. त्यामुळे खोडाजवळील जमीन हलविण्याचे काम फार काळजीपूर्वक करावे लागते.

खोडे पोखरणाऱ्या आळ्यांनी किंवा किड्यांनी काही झाडे मेली असता त्या जागी नवीन झाडे लावणे आवश्यक असते. त्यास नांगे भरणे असे म्हणतात. नांगे भरण्यासाठी रोपवाटिकेत काही रोपटी सतत वाढू द्यावी लागतात. कॉफीच्या मळ्यात नांगे भरण्याचे काम सहसा ऑगस्टमध्ये केले जाते. एखादे चांगले वाढलेले झाड मोडले तर ते जमिनीपासून कापून काढतात. त्यामुळे खोडापासून निघणारे काही धुमारे नवीन झाड म्हणून वाढीला लागतात. अशावेळी नांगे भरणे शक्यतो टाळावे.

* शेंडे खुडणी आणि छाटणी : बी लावल्यानंतर २ वर्षांच्या कालावधीत झाडांची उंची साधारणत: ७५ ते ९० सेंमी होते. त्यामुळे झाडाची मुख्य फांदी ७५ ते ९० सेंमी उंचीवर खुडतात. झाडाचा शेंडा खुडल्यामुळे खोड जाड ठेवून बुंध्यापासून सरळ धुमारे फुटण्यास सुरुवात होते.

कॉफीच्या झाडांच्या बुंध्यापासून फुटलेल्या फांद्यावर आडव्या फांद्या फुटण्यास सुरुवात होते. तसेच झाडांची उंची वाढत जाते. जुन्या फांद्यांवर फुटलेल्या फांद्यांना कॉफीची फळे लागण्यास वर्षभरात सुरुवात होते. तरीपण झाडाची वाढ कायम आहे. त्यामुळे कॉफीच्या झाडाला फळे कमी लागतात व उत्पन्नावर अनिष्ट परिणाम होतो. अशावेळी मुख्य खोडावरून निघालेल्या फांद्या ठराविक वाढ होताच छाटाव्यात.

ब्राझीलसारख्या मोठ्या प्रमाणावर कॉफीचे मळे असणाऱ्या देशात प्रत्येक ठिकाणी २ ते ३ झाडे लावली. जातात व त्यांची शेंडेखुडणी किंवा छाटणी केली जात नाही. त्यामुळे कॉफीची झाडे खूप उंच वाढतात व फळे काढण्यासाठी शिड्यांचा वापर करावा लागतो.

* कीड व रोग : कॉफीच्या पिकाला खालील किडीचा उपद्रव होतो.

१) खोडकिडा : हा किडा कॉफीचे मुख्य खोड पोखरून आतील अन्नद्रव्ये शोषून घेतो. त्यामुळे कॉफीचे झाड दगावते.

उपाय : स्प्लेंडर २० मिली, प्रोटेक्टंट २५ ग्रॅम आणि नुवान २५ मिली १० लि. पाण्यातून खोडावरून ओतावे. त्यामुळे खोडकिडा मरतो.

२) हिरव्या ढेकण्या : हे किडे पानांतील रस शोषून घेतात. त्यामुळे पाने सुकून झाडांची वाढ खुंटते.

* रोग : कॉफीच्या झाडांवर मुळे कुजणे, टिक्का, झाड उबळणे इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.

वरील कीड व रोगांने प्रतिबंधक उपाय म्हणून तसेच झाडाची जोमदार वाढ होण्यासाठी आणि उत्पादन वाढीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पुढीलप्रमाणे फवारण्या घ्याव्यात.

* फवारणी : १) पहिली फवारणी :(जूनमध्ये ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रिझम २५० मिली.+ प्रोटेक्टंट २०० ते २५० ग्रॅम + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (जुलैमध्ये) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ प्रोटेक्टंट ४०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली.+ न्युट्राटोन ४०० मिली. + १५० लि.पाणी.

३ वर्षानंतर उत्पादन चालू होऊन अधिक मिळण्यासाठी वरील फवारण्या फेब्रुवारी - मार्च, जून, ऑगस्ट या महिन्यात घ्याव्यात. त्यामध्ये दुसऱ्या व तिसऱ्या फवारणीत राईपनर आणि न्युट्राटोन अनुक्रमे ४००, ५०० मिलीप्रमाणे वापरावे. तसेच सप्टेंबर - ऑक्टोबर दरम्यान चौथी फवारणी थ्राईवर, राईपनर ५०० मिली. न्युट्राटोन ५०० मिली, १०० लि. पाणी या प्रमाणात करावी.

* काढणी : कॉफीच्या झाडांच्या लागवडीनंतर ३ ते ४ वर्षात फळे येण्यास सुरुवात होते. ३ वर्षाच्या अगोदर झाडांना आलेला बहर झाडांची पुर्ण वाढ होण्यासाठी खुडून टाकावा लागतो. मार्च - एप्रिल महिन्यांत कॉफीच्या झाडांना पांढरी फुले येऊन फळधारणा होते. ८ ते १० महिन्यांत फळे पक्व होऊन नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये काढणीस योग्य होतात. अशावेळी थोडास पाऊस आला तर त्यामुळे फळे पिकण्यास मदत होते. पक्व फळे रंगाने नारंगी असतात. जमिनीवर पडलेली फळेसुद्धा गोळा केली जातात. अरेबिका कॉफीची फळे ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये तर रोबस्टा जातीची फळे जानेवारी - मार्चमध्ये काढणीस तयार होतात. कॉफी तयार करण्याच्या प्रकाराप्रमाणे ४ ते ५ पासून १२ पर्यंत फळांच्या तोडण्या होतात. कॉफीच्या मळ्यातून ५० वर्षापर्यंत फळे मिळत राहतात.

* पार्चमेन्ट कॉफी (Parchment Coffee) : बऱ्याचशा यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने पूर्णत: पक्व झालेल्या रसरशीत अशा रंगदार फळापासून पार्चमेंट कॉफी तयार करतात. ह्या कॉफीसाठी साधारणत: ४ ते ५ पासून १२ पर्यंत तोडण्या होतात. तोडलेली फळे रात्रभर ढीग करून ठेवतात आणि सकाळी माणसाच्या पायाखाली तुडवितात. त्यामुळे फळांची साल व आतील गर ढिला होतो. हा गर काढून त्यापासून पार्चमेंट कॉफी तयार करतात. कॉफीचा गर वाळविण्यासाठी साधारणत: सात दिवस लागतात. एका झाडावर निघालेल्या फळांपासून १२ ते १३ किलो पार्चमेंट कॉफी तयार होते.

* चेरी कॉफी : (Cherry Coffee) किंवा स्थानिक कॉफी : अल्पप्रमाणात चहाचे मळे असणाऱ्या प्रदेशात चेरी किंवा स्थानिक कॉफी तयार करतात. चेरी कॉफी तयार करण्यासाठी थोडीशी अपरिपक्व. फळेसुद्धा उपयोगात आणतात. तोडलेली फळे सुमारे १४ दिवस सूर्याच्या उन्हात वाळविली जातात. कॉफीच्या फळावरील चकचकीत साल काढून ती यंत्राच्या सहाय्याने दळून चाळून त्यातील तुकडे वेगळे केले जातात. आशारितीने चेरी किंवा स्थानिक कॉफी तयार होते. ब्राझीलसारखे कॉफीचे मोठे उत्पादन देशसुद्धा पार्चमेंट कॉफी तयार करण्यापेक्षा चेरी कॉफी तयार करण्यावर जास्त भर देतात. चेरी कॉफी तयार करण्यासाठी उष्णता निर्माण करणारी यंत्रसामुग्री वापरली जाते.

* उत्पादन : अरेबिका कॉफीपासून हेक्टरी ६५० ते ७०० किलोपर्यंत स्वच्छ कॉफी मिळू शकते. रोबस्टा कॉफीपासून हेक्टरी ९०० ते १००० किलोपर्यंत स्वच्छ कॉफी मिळू शकते. पाच किलो कॉफीच्या फळापासून साधारणत: एक किलो प्रक्रिया केलेली कॉफी मिळू शकते. कॉफीच्या फळामध्ये ३ % कॉफीनचे प्रमाण असते.