गोल्डन रॉड - पिवळी डेजी उत्पादन तंत्रज्ञान
प्रा. डॉ. वि.सु. बावसकर
गोल्डन रॉड म्हणजेच 'सॅलिडॅगो डेझी' ही गोल्डन शॉवर किंवा मराठीत सोनतुरा या नावाने
देखील ओळखली जाते. लग्न, वाढदिवस आणि इतर समारंभामध्ये पुष्पहार, पुष्पगुच्छ देण्याची
पद्धत प्रचलित होऊ लागली आहे. फुलांचा आकर्षक रंग, झुपकेदारपणा, लांब आणि सरळ दांडा
आणि जास्त दिवस टिकून राहण्याची क्षमता या सर्व गोष्टींमुळे पुष्परचनेतही या फुलांना मानाचे
स्थान पटकावले आहे. या फुलांबाबत महत्त्वाची गोष्ट म्हणजे लांब दांड्यावर असणारी गोल्डन
रॉडची फुले एकाच वेळी उमलत नसल्यामुळे आणि फुलांचे उमलणे अनेक दिवस सुरू राहत असल्यामुळे कित्येक
दिवस फुलांचा हा ताटवा शोभा देत राहतो. त्यामुळे मोठ्या शहारातील फुलांच्या दुकानात
गोल्डन रॉडचा ताटवा नेहमीच उपलब्ध असतो.
सोपी लागवड पद्धती, फुलांचा वर्षभर बहर आणि आकर्षक पिवळा रंग यामुळे विविध उपयोगांसाठी या फुलांना बाजारात वर्षभर मागणी असते. मुंबई, पुणे व इतर मोठ्या शहरात गोल्डन रॉडला वर्षभर मागणी असल्यामुळे याची लागवड शहरांच्या जवळपास मोठ्या प्रमाणावर करणे फायदेशीर असते. सर्व प्रकारच्या हवामानात वर्षानुवर्ष फुटवे देणारा व कमी उंचीचा डेझी हा पुष्पसमूह असून शास्त्रीयदृष्ट्या डेझी कंपाझिट कुटुंबात मोडतात. गोल्डन रॉडच्या झाडांची उंची ९० ते १०० सें.मी. असून फुलांचा दांडा लांब आणि सरळ (६० ते ८० सें.मी.) असतो. विविध आकार आणि रंगानुसार डेझी समुहातील इतर प्रकार उदा. मायचलमस डेझी, आफ्रिकन डेझी, इंग्लिश डेझी, स्पॅन सिलव्हर डेझी, शास्त्रा डेझी इत्यादी पांढरी, लालसर, निळसर, नारिंगी गुलाबी, पिवळी, आकाशी अशी आकर्षक फुले देतात.
* जमीन, हवामान आणि हंगाम : गोल्डन रॉड डेझी कोणत्याही प्रकारच्या जमिनीत म्हणजेच हलक्या, मध्यम तसेच पानथळ जमिनीत चांगल्याप्रकारे फुलविता येते. उत्तम फुलांच्या प्रगतीसाठी आणि लांब दांड्यासाठी मध्यम, सुपीक आणि पाण्याचा योग्य निचरा असणारी जमीन अतिशय चांगली असते.
सर्वसाधारणपणे सर्व ऋतूतील हवामान झाडाच्या वाढीसाठी तसेच फुले येण्यासाठी मानवते. त्यामुळे वर्षभरांत कधीही गोल्डन रॉडची लागवड करता येते. सूर्यप्रकाश आणि विरळ सावलीतसुद्धा झाडांची वाढ चांगली होते.
* पूर्वमशागत आणि अभिवृद्धी : गोल्डन रॉडच्या व्यापारी तत्त्वावर लागवडीसाठी जमिनीची नांगरट व कुळवणी करून माती मोकळी करावी. काडी - कचरा वेचून जमीन लागवडीसाठी तयार करावी. जमीन तयार करताना त्यात हेक्टरी १५ ते २० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि २०० ते २५० किलो कल्पतरू सेंद्रिय खत मिसळावे. शेणखताची कमतरता असल्यास लागवड करण्याच्या जमिनीत तागासारखी हिरवळीची खते पेरून फुले येणाऱ्या अगोदर जमिनीमध्ये पावसाळ्यात गाडून टाकावे. ताग कुजलेनंतर लागवडीसाठी जमीन तयार झालेनंतर ३ x २ मीटर आकाराचे सपाट वाफे करून त्यामध्ये ५० x ५० सें.मी. किंवा ४० x ३० सें.मी. अंतरावर लागवड करावी. गोल्डन रॉडची अभिवृद्धी जुन्या झाडांना फुटलेल्या फुटव्याद्वारे करतात.
* आंतरमशागत : गोल्डन रॉडचे झाड काटक, चिवट तसेच रोग आणि किडींना कमी प्रमाणात बळी पडणारे आहे. लागवडीनंतर आवश्यकतेनुसार खुरपणी करून पीक तणविरहीत ठेवावे. हिवाळ्यात ८ ते १० दिवसांच्या अंतराने तर उन्हाळ्यात ५ ते ६ दिवसांनी जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकास पाणी द्यावे.
* खते : गोल्डन रॉड हे खताला उत्तम प्रतिसाद देणारे पीक आहे. गोल्डन रॉडच्या रोपांची वाढ जलद होऊन फुलांचा दर्जा उत्तम येणेसाठी प्रति हेक्टरी १५० किलो नत्र, १०० किलो स्फुरद आणि १०० किलो पालाश द्यावे. अर्धे नत्र आणि संपूर्ण स्फुरद व पालाश खते लागवडीपूर्वी जमिनीत द्यावीत. बाकी राहिलेली नत्राची अर्धी मात्रा समानभागात विभागून पहिल्या हप्त्यानंतर चार महिन्यांच्या अंतराने दोनदा द्यावी. रासायनिक खतापेक्षा कल्पतरू सेंद्रिय
खतास हे पीक उत्तम व दिर्धकाळ प्रतिसाद देते. त्यामुळे या पिकास वर सांगितल्याप्रमाणे लागवडीपुर्वी हेक्टरी २५० किलो व लागवडीनंतर १।। - १।। महिन्यांनी हेक्टरी १५० - १५० किलो २ वेळा द्यावे. त्यानंतर पुन्हा २ महिन्यांनी याचप्रमाणे कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे.
* कीड, रोग व नियंत्रण :
* कीड: या फुलझाडांवर मावा, तुडतुडे, लष्करी अळी या किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दर १० - १५ दिवसांनी सप्तामृतासोबत स्प्लेंडर हे सेंद्रिय किटकनाशके २० मिली/१० लि. पाणी याप्रमाणे फवारावे, रासायनिक औषधांमध्ये डायमेथोएट, कार्बारिल, मॅलॅथिऑन, मोनोक्रोटोफॉस, गंधक या औषधांचे फवारे योग्य ते प्रमाण घेवून आलटून - पालटून फवारावेत.
* रोग : करप्या रोगाचे तांबडे - काळे डाग पानांवर खोडांवर व फुलांवर पडतात. या रोगाचा प्रादुर्भाव दमट व पावसाळी हवामानात मोठ्या प्रमाणावर आढळतो. रोगाचा प्रसार झाडाच्या शेंड्याकडे पसरत जाते. या रोगाच्या नियंत्रणासाठी सप्तामृतासोबत हार्मोनी २० मिली/ १० लि. पाणी याप्रमाणे फवारावे. रासायनिक औषधे वापरायची झाल्यास ०.१% कार्बेन्डेझिम किंवा ०.२% डायथेन एम - ४५ या बुरशीनाशक औषधांची १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
* भुरी : पानांवर, फुलांवर पांढऱ्या रंगाचे ठिपके आढळतात. नियंत्रणासाठी हार्मोनी २० ते २५ मिली/१० लि. पाणी याप्रमाणे १५ ते २० दिवसांनी फवारणी करावी किंवा गंधक ३०० मेशची धुरळणी किंवा फवारणी करावी. १० - १ दिवसांचे अंतराने फवारणी करणे अत्यावश्यक असते.
* गोल्डन रॉडच्या निरोगी जोमदार वाढीसाठी तसेच फुलांचे उत्पादन वाढून त्याचा दर्जा सुधारण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सुरूवातीपासूनच खालीप्रमाणे फवारण्या कराव्यात.
१) पहिली फवारणी : (लागवडीनंतर १० ते १५ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + राईपनर १०० मिली + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी १०० मिली. + स्प्लेंडर १०० मिली + १०० लि.पाणी.
२) दुसरी फवारणी : (लागवडीनंतर ३० ते ४० दिवसांनी) : जर्मिनेटर ३०० ते ४०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. न्युट्राटोन २५० मिली + हार्मोनी २०० मिली. + स्प्लेंडर २५० मिली + १५० लि.पाणी.
३) तिसरी फवारणी : (लागवडीनंतर ५० ते ६० दिवसांनी) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ५०० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम न्युट्राटोन ५०० मिली + हार्मोनी ३०० मिली. + स्प्लेंडर ३०० मिली + २०० लि.पाणी.
तोडे चालू झाल्यापसून दर १५ दिवसांनी वरील फवारणी क्र. ३ प्रमाणे माल संपेपर्यंत फवारण्या कराव्यात. * फुलांची काढणी/उत्पादन : लागवडीनंतर ४० ते ४५ दिवसांनी गोल्डन रॉडला फुले येण्यास सुरुवात होते आणि वर्षभर फुले येत राहतात. दांड्यावरील खालच्या भागातील फुले उमलायला सुरुवात झाली की असे लांब दांड्यासहित तोडावेत. दांडा जमिनीपासून खोडावर ३ ते ४ डोळे ठेवून तोडावा. गोल्डन रॉडपासून प्रति हेक्टरी सुमारे २.५ ते ३ लाख दांडे दरवर्षी मिळतात.
* प्रतवारी,पॅकिंग : योग्य प्रकारे काढणी केलेले गोल्डन रॉडचे दांडे लांबीनुसार १० ते १२ दांड्याच्या जुडीच्या स्वरूपात वेगवेगळे बांधावेत. प्रतवारी दांड्याची लांबी आणि फुलांचा रंग यानुसार करावी. दांड्याच्या टोकाला रबर बँड लावून खोक्यांतून, बांबूच्या उभ्य टोपल्यांमधून विक्रीसाठी बाजारात पाठवावेत. काढणी करताना प्रत्येक दांडा प्लास्टिक बादलीत स्वच्छ पाण्यात बुडवून ठेवावा.
निर्यातीसाठी शीतकरण सुविधा असणारी वाहतूक व्यवस्था आवश्यक असते. कमी गुंतवणूक, हमखास बाजारपेठ, प्रत्येक हंगामात किंवा वर्षभर विविध ठिकाणी करता येणारी लागवड तसेच रोग आणि किडींचा या पिकावर विशेष प्रादुर्भाव नसल्यामुळे गोल्डन रॉडची लागवड शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशी ठरेल.