अतिशय कमी पाण्यावर १२०० भगवा डाळींबापासून २५ टन मालाचे १० लाख

श्री. भुषण महादु वाघ,
मु.पो. रोहणे, ता. शिंदखेडा, जि. धुळे - ४२४००१.
मो.९८६०४९९१७७


१२' x १०' वर मी ४ एकर क्षेत्रामध्ये डाळींब बागेची डिसेंबर २०१३ मध्ये लागवड केली. जमीन मध्यम प्रतिची आहे. पाऊल बहार आम्ही धरला त्यावेळी आम्हाला डाळींबाची विशेष अशी माहिती नव्हती. त्यामुळे आम्ही डाळींब बागेचे नियोजनासाठी एका कन्सल्टंटकडून (डाळींब तज्ञ) माहिती घेतली. तेव्हा आम्हाला त्या बागेपासून खर्च वजा उत्पन्न काहीच मिळाले नाही.

तेव्हा आम्ही दुसरा बहार स्वतःच्या माहितीच्या आधारे घेण्याचे ठरविले. बागेची पानगळ वगैरे केली. बऱ्या प्रमाणात फुल निघाले. काही प्रमाणात सेटिंग ही झाले. पानगळ करून ३।। ते ४ महिन्याचा प्लॉट झालेला होता. पण बागेत पाहिजे त्या प्रमाणात फळांची फुगवण होत नव्हती. तेव्हा मी शेजारच्या गावात मित्रांची बाग पहाण्यास गेलो. तेव्हा त्यांनी आम्हाला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीविषयी माहिती दिली व त्यांनी आम्हाला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी धुळे प्रतिनिधी किशोर निकम यांच्याशी संपर्क करून दिला. तेव्हा त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही क्रॉपशाईनर + न्युट्राटोन + राईपनर या औषधांच्या ४ फवारण्या केल्या आणि ड्रिपमधून जर्मिनेटरची ड्रेंचिंग केली. त्यांचा आम्हाला इतका चांगला रिझल्ट मिळाला की बागेत मालाची फुगवण खुपच चांगली झाली व झाडांची क्वॉलिटीच बदलून गेली.

मग आम्ही तिसरा बहार पुर्ण डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या मार्गदर्शनानेच करायचा ठरविले, पण २०१६ मध्ये आमच्या परिसरात पाऊस अतिशय कमी प्रमाणत झाला. विहीरीला खुपच कमी पाणी होते. तरीही आम्ही बागेचे नियोज़न सुरू केले. जून २०१६ मध्ये बागेची पानगळ केली. पहिली फवारणी आम्ही काडीवर जर्मिनेटरची केली. त्यामुळे बागेला एकसारखी चौकी निघाली. नंतर थ्राईवर + क्रॉपशाईनर + प्रिझम + स्प्लेंडर अशा दोन फवारण्या केल्या. त्यामुळे बागेला खुपच चांगल्या प्रकारे फुले आली. विशेष म्हणजे मादी फुलांचे प्रमाण खुपच चांगले होते. नंतर न्युट्राटोन + हार्मोनी + क्रॉपशाईनर + राईपनर या औषधांच्या फवारण्या केल्या व सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्ही बागेला शेणखत दिलेले नव्हते. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी यांचे कल्पतरू प्रती झाड १ किलो व १०:२६:२६ प्रती झाडास ४०० ग्रॅम एवढा डोस दिला. कल्पतरू खतामुळे बागेस पाणी कमी असतांना देखील बागेला ताण पडला नाही व पांढऱ्या मुळांची वाढ मोठ्या प्रमाणात झाली व जारवा टिकून राहण्यास मदत झाली. बागेत सर्वसाधारण ३०० ते ४०० ग्रॅम ची फळे तयार झाली. आम्ही दर १ ते १।। महिन्याच्या अंतराने ड्रिपमधून जर्मिनेटरची ड्रेंचिंग केली.

माझ्याकडे सर्व १२०० झाडे आहेत. अतिशय कमी पाण्यात मला या झाडांपासून अतिशय चांगल्या दर्जाचा २५ टन माल मिळाला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझा खाते व फवारणीचा खर्च ८०,००० रु. झाला. नोव्हेंबर महिन्यात चलन (नोटा बंदी) बंद झाल्यामुळे डाळींबाचे रेट कमी झाले होते. त्यामुळे भाव कमी झाले होते तरी आमचा माल ५० रु. किलो प्रमाणे विकला गेला. त्यापासून १० लाख रु. मिळाले. त्यामुळे मी याच्यापुढे फक्त डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचाच वापर करणार आहे.