२।। एकर हळदीपासून ३।। लाख नफा शिवाय २ एकराचे हळदीचे उत्तम बेणे

श्री. आनंदराव उत्तमराव सुरोशे, मु.पो. शिंदगी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ -४४५२०६.
मो. ९६८९१५९७५१


माझ्याकडे वडीलोपार्जीत २५ एकर जमीन आहे. मी २०१४ मध्ये पुणे येथील किसान कृषी प्रदर्शन पाहण्याकरिता गेलो असता तेथे डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या स्टोलला भेट दिली. तेथे आम्हाला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधी श्री. सुरळकर यांनी औषधांबद्दल सविस्तर माहिती दिली. आम्ही तेथून जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर हे प्रत्येकी २ लि. आणि हार्मोनी १ लि. घेऊन गेलो. मी जून २०१५ मध्ये लावलेल्या कापूस, सोयाबीन तसेच ऊस व हळद या पिकांकरीता डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर केला. त्याचा वापर केल्यानंतर आम्हाला चांगले रिझल्ट मिळाले. मात्र पुढे ही औषधे आमच्या भागात न मिळाल्याने वापरु शकलो नाही. त्यानंतर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे आमच्या भागात उपलब्ध झाल्यावर पुन्हा वापर सुरू केला.

आम्ही ७ जुलै २०१६ रोजी सेलम जातीच्या हळदीची लागवड २।। एकर मध्यम काळ्या जमिनीत ४ x १ फुटावर केली. या जमिनीतून अगोदर सोयाबीनचे पीक घेतले होते. हळद लागवडीच्या वेळी बेणे जर्मिनेटर १ लि. + क्लोरोपायरी फॉस ५०० मिली + एम ४५ ५०० ग्रॅम + १०० लि. पाणी या द्रावणात बेणे बुडवून लागवड केल्यामुळे कंदांची उगवण लवकर व एकसारखी होऊन हुमणीचा त्रास झाला नाही. त्यानंतर सप्तामृताच्या १५ ते २० दिवसाच्या अंतराने एकूण ४ फवारण्या तसेच १ -१ महिन्याच्या अंतराने जर्मिनेटरची २ वेळा ड्रेंचिंग केली. त्यामुळे माझ्या शेतात कुठल्याही रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव झाला नाही. सुरुवातीपासून हळदीची वाढ निरोगी झाली. हळदीच्या गड्ड्यांची पोषण होण्याच्या काळात राईपनर आणि न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. असे २ वेळा ड्रेंचिंग केले. त्यामुळे नेहमीपेक्षा हळदीच्या गड्ड्यांचे पोषण चांगल्या प्रकारे होऊन मला २।। एकरमधून ७३ क्विंटल हळद उत्पादन झाले. ही हळद हिंगोली मार्केटला विकली तर ६२०० रु./क्विंटल भाव मिळून खर्च जाता ३,५०,००० निव्वळ नफा मिळाला. तसेच २ एकर लागवडीस लागणारे बेणे शिल्लक ठेवले आहे.