डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी व टोमॅटो पुस्तकाप्रमाणे टोमॅटो १ एकर ९ हजार रोपे, डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा खर्च २० - २२ हजार, उत्पन्न ४ लाख ७५ हजार, नफा २।। लाख
श्री. आकाश दत्तात्रय पाडळे,
मु.पो.ता. वाई, जि. सातारा,
मो. ९१४५११७८२५
अभिनव टोमॅटो १ मार्च २०१६ ला ४ फुट रुंदीच्या बेडवर बेडच्या मधोमध ड्रीपलाईनच्या दोन्ही बाजुने
४ - ४ बोटावर १।। - १।। फुट अंतरावर झिगझॅग पद्धतीने लावले. तयार रोपे १.२० रु. प्रमाणे
आणली होती. १ एकरमध्ये ९ हजार रोपे लावली होती. शेणखत ४ ट्रॉली संपूर्ण रानात टाकले
होते आणि बेडवर २ ट्रॉली कोंबडखत आणि १२:३२:० च्या ३ बॅगा, पोटॅश २ बॅगा, झिंकसल्फेट
१५ किलो, मॅग्नेशियम सल्फेट १५ किलो, बोरॉन ३ किलो, निंबोळी पेंड १०० किलो, गंधक १०
किलो, फर्टीगो (हुमणी प्रतिबंधक) १० किलो, सिलीकॉन १०० किलो तसेच धर्ती अॅग्रोचे अंकुर
फार्ट १० किलो, ह्युसेल ४ किलो, कॅल्बोम १० किलो, वसुंधरा १० किलो, झायमो १० किलो
एवढा बेडवर डोस दिला होता. खते बेडवर मातीआड झाकल्यानंतर ठिबक लाईन अंथरून बेड भिजवले.
नंतर मल्चिंग पेपर अंथरून होल पडून लागवड केली. रोपे ट्रेमधील होती. त्यामुळे कोकोपीटच्या
गटटूसह लावून नंतर दुसऱ्या दिवशी लगेच जर्मिनेटरचे ड्रेंचिंग केले.
त्यानंतर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या टोमॅटो पुस्तकात दिल्याप्रमाणे १५ दिवसाला फवारण्या घेत होतो. मध्ये गरजेपुरते रासायनिक किटकनाशक, बुरशीनाशक फवारत होतो. तसेच ठिबकवाटे विद्राव्य खते सोडत होतो.
डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या एकूण ४ फवारण्या केला. तसेच जर्मिनेटरचे ३ वेळा ड्रेंचिंग केले. अशाप्रकारे पीक व्यवस्थापन केले, तर झाडे ४।। फुटापर्यंत वाढली होती. ४ फुटाचा बेड पुर्ण झाकला होता. पानोपान कळ्या व फळे लागली होती. २ बेडमध्ये जाण्या - येण्यासाठी (औषधे फवारणीसाठी, फळे तोडण्यासाठी) १।। फुट जागा होती, तेथेही फांद्या आल्या होत्या. त्या सुतळीने पुन्हा तारेला बांधल्या. नियमित डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या फवारण्या आणि किटकनाशक व बुरशीनाशकांच्या गरजेपुरत्या फवारण्या करत होतो. त्यामुळे पिकावरील रोग - किडीचा प्रादुर्भाव आटोक्यात होता. पिकाची रोगमुक्त सुद्दढ वाढ होत होती.
७५ ते ८० दिवसात टोमॅटो चालू झाला. १ एकरमधून १४०० क्रेट टोमॅटो मार्केटला विकला. १५ - २० मे २०१६ ला चालू झाला. तेव्हा ३०० - ४०० रु./क्रेट भाव मिळाला. नंतर पुढे ७००- ८०० रु. /क्रेट भाव मिळाला. ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये १०० रु./ क्रेट भाव झाल्यावर २०० - २५० क्रेट माल बाकी असतानाच प्लॉट काढून टाकला. सरासरी १४०० क्रेट व ४०० रु. सरासरी भाव मिळाला. सर्व टोमॅटो वाई मार्केटला विकला.
मशागत खते, औषधे, ठिबक, मल्चिंग यावर १ लाख ६५ हजार रु. व मजुरीवर ६० हजार असा जवळपास २.२५ लाख रु. एकूण खर्च आला. यामध्ये डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीवर २० - २२ हजार रु. खर्च केला. एकूण ४ लाख ७५ हजार रु. उत्पन्न मिळाले. खर्च वजा जाता एकरातून २।। लाख रु. नफा मिळाला.
त्यानंतर दुसऱ्या १।। एकर प्लॉटमध्ये १० ऑगस्ट २०१६ ला वरील पद्धतीने झेंडू लावला. खते, औषधे (टोमॅटो प्रमाणे बेडेवर) वापरली.
१।। एकरात २२ टन झेंडू खर्च १ लाख ८० हजार, नफा २ लाख २० हजार
झेंडूची १०,००० रोपे २.८० रु. प्रमाणे आणली होती. झेंडू ५० दिवसात २५ सप्टेंबर २०१६ ला चालू झाला. २२ टन झेंडू विकला. गेल्यावर्षी वाई (लोकल मार्केट), खेड, रत्नागिरी, दापोली, महाड या भागात हारवाल्यांना मागणीप्रमाणे झेंडू पाठवत होतो. तेथे चांगले पैसे झाले. जास्तीचा माल पुणे मार्केटला आणत होतो. मात्र पुण्याला भाव फारच कमी ५ - ६ रु. किलो होते. त्यामुळे १ टन झेंडूचं पट्टी २।। - ३ हजार रु. होत असे. त्यामुळे पुणे मार्केटला काही पैसे झाले नाही.
लोकल मार्केटला व कोकणात हारवाल्यांना जो मागणीनुसार झेंडू पाठवित होतो त्यामध्ये ५०० किलो मालाचे १२ - १५ हजार रु. होत असत. याच मालाचे पैसे झाले. एकूण २२ टन माल विकला. उरलेला ३ टन माल सोडून दिला. असे १००० काडीपासून २५ टन उत्पादन आले. एकूण खर्च १ लाख ८० हजार रु. आला होता. तर ४ लाख रु. उत्पन्न मिळाले होते. खर्च वजा जाता २ लाख २० हजार रु. मिळाले.
या अनुभवातून चालूवर्षी आम्ही टोमॅटो ५ मार्च २०१७ ला १।। एकर लावला आहे. त्यासाठी बेडवर वरीलप्रमाणे खतांचा वापर केला आहे. जर्मिनेटरचे २ ऱ्या दिवशी ड्रेंचिंग केले आणि १५ दिवसाचा प्लॉट असताना पुन्हा एकदा ड्रेंचिंग केले. १।। एकरात १३००० काडी (रोपे) लावली होती. त्यातील कडक उन्हाळा असतानाही फक्त १७० काडी मेली. ती १७ मार्च २०१७ ला सांधली (नांगी भरली) आहेत. एरवी इतरांच्या १३,००० काडी लागवडीमध्ये १५०० ते २००० काडीची कडक उन्हामुळे मर होते.
१९ मार्च २०१७ ला १९ दिवसाचा प्लॉट ६ - ७ पानांवर असताना त्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या ४ ही फवारण्यांची औषधे (थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन प्रत्येकी ५ लि. आणि प्रोटेक्टंट, न्युट्राटोन प्रत्येकी ५ लि. आणि प्रोटेक्टंट २।। किलो, हार्मोनी २।। लि., हार्मोनी २।। लि., स्प्लेंडर ३ लि. प्रिझम १ लि.) घेऊन गेलो होतो. त्याच्या वेळापत्रकाप्रमाणे फवारण्या केल्या असून आज (८ मे २०१७) रोजी प्लॉट सव्वा दोन महिन्याचा ३ - ४ फुटापर्यंत उंच असून पुर्णपणे बहारात आहे. हा माल साधारण १५ मे २०१७ दरम्यान चालू होईल. झाडे फळा - फुलांनी लगडलेली आहेत. वरील सप्तामृत औषधांच्या फवारण्या नियमित चालू असल्याने प्लॉट निरोगी आहे.