टिश्यू कल्चर केळीचे सनबर्निंग (सौर जळ) डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने थांबून रोपे सशक्त
श्री. संपतराव केशवराव नलावडे,
रा. नागठाणे, ता. जि. सातारा,
मोबा. ९८२२८५८५८२
मी १० डिसेंबर २०१० रोजी जी - ९ केळीची लागवड २.५ एकर मध्यम प्रतिच्या जमिनीत केली
आहे. प्रथम जमिनीची उभी आडवी नांगरट केली. त्यानंतर रोटर मारले. नंतर सरी सोडून घेतली.
सरी सोडल्यानंतर लाईन दोरीने लाईन आऊट करून घेतले. त्यानंतर ५ x ६ फुटावर खड्डे काढून
घेतले. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी, पुणे यांच्याकडे दोन महिने अगोदर केळी रोपांचे बुकिंग केले होते.
ती रोपे आणून लागण केली.
पण लागणीनंतर १३ ते १४ दिवसांनी सन बर्निंग चालू झाले. रोपांना हार्डनिंग
ही कमी होते आणि थंडीमुळे वाढ ही थांबली होती. म्हणून मी आमचे पाहुणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे
डिलर 'संजय कृषी सेवा केंद्र, कराड' यांना फोन वरून ही समस्या सांगितल्यावर त्यांनी
कंपनी चे प्रतिनिधी श्री. कापसे यांना फोन करून आमचे प्लॉटवर येण्यास सांगितले. त्यानुसार
श्री. कापसे यांच्या मार्गदर्शनानुसार जर्मिनेटर ६० मिली + थ्राइवर ७० मिली + क्रॉंपशाईनर
७० मिली + प्रिझम ६० मिली + प्रोटेक्टंट पावडर ५० ग्रॅम / पंपास (१५ लिटर पाणी) घेऊन
अशा दोन फवारण्या १ आठवड्याच्या अंतराने केल्या.
त्यानंतर १५ दिवसांनी ते व्हिजीटला आल्यावर प्लॉट पाहिला असता सनबर्निंग कमी झाल्याचे आढळले व आणखी १० दिवसांनी लिहून दिल्याप्रमाणे जर्मिनेटर ८० मिली + थ्राइवर ८० मिली + क्रॉंपशाईनर ८० मिली + प्रिझम ७० मिली + प्रोटेक्टंट पावडर ५० ग्रॅम / पंप याप्रमाणे फवारणी घेतली. तेवढ्यावरच सनबर्निंग पूर्ण थांबून नवीन पाने रुंद व चांगली सशक्त फुटायला लागल्याचे दिसले. आम्ही इतक्या लवकर व इतकी वाढ होईल अशी आशाच धरली नव्हती. परंतु १५ - २० दिवसांनी जोमदार मोठी पाने, उंची वाढलेली झाडे पाहून ही कमी हार्डनिंगची रोपे असतील अशी वाटतच नव्हती. ड्रिपमधूनही आम्ही जर्मिनेटर सोडत आहोत. रोज २ तास ड्रिपने पाणी देत आहे. आता केळी प्लॉट १० महिन्यांचा असून घड पडले आहेत. मला नक्कीच चांगल्या उत्पादनाची आशा आहे.