डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे दर्जेदार अधिक उत्पादन

२ एकर केळीचे ४ लाख, डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने अतिपावसातही केळी निरोगी

श्री. भारत रामचंद्र पोतदार,
'सिद्धीविनायक निवास', कन्या प्रशाला रोड, मोहोळ, जि . सोलापूर,
मोबा. ९८५०९९५८९७


तीन वर्षापुर्वी 'कृषी विज्ञान' मासिक माझ्या वाचण्यात आले. त्यातील सरांचे लेख तसेच विविध भागातील शेकार्‍यांचे विविध पिकांवरील अनुभव वाचून भारावलो.

त्यानंतर जून २००६ साली डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने केळी २ एकर, ढोबळी मिरची आणि निर्मल सीडसची मैना मिरची दोन्हीची एक एकरमध्ये लागवड केली. जमीन काळी कसदार असून पाणी विहीरीचे दोन्ही (सरीने) देतो, तर केळीला ड्रीप केली होती.

ग्रॅन्ड - ९ केळीची २ एकरमध्ये ७ x ४ फुटावर लागवड केली होती. लागवडीनंतर रोपांना मोठ्या प्रमाणात जारवा फुटून ती जोमाने वाढू लागली. लागवडीच्यावेळी २ एकरमध्ये २५ ट्रोंली शेणखत टाकले होते. कल्पतरू खत वाहतुकीच्या सोयी अभावी वापरू शकलो नाही. त्यामुळे रोपांवर जादा पावसाचा विपरीत परिणाम अजिबात झाला नाही. रोपे निरोगी, सशक्त वाढू लागली. त्यानंतर केळी ३ ते ३॥ महिन्याची असताना दुसरी फवारणी सप्तामृताची घेतली. एवढ्या फवारणीवरच झाडांची पुर्ण वाढ होऊन पाने हिरवीगार रसरशीत, लांब, न फाटलेली मिळाली. त्यानंतर कमळ निघतेवेळी तिसरी फवारणी १ लि. सप्तामृताची २०० लि. पाण्यातून केली. त्याने सर्व केळीच्या झाडांची वेण एकाच वेळी झाली. बंची टॉंप किंवा पाने पिवळी पडणे, करपा असा कोणताही परिणाम झाला नाही.

पुढे लहान - लहान केळी लागल्यानंतर घडांचे (केळीचे) पोषण होण्यासाठी सप्तामृताची चौथी फवारणी केली. एवढ्यावर वर्षाच्या आत २५ ते ४० किलोचे घड मिळाले. स्थानिक व्यापार्‍यांची जागेवरून ४,७०० / - रू./ टनास भाव देऊन सर्व माल नेला. घड ९ ते १० फण्यांचा आणि फणी १८ ते २४ केळांची मोठ्या आकाराची होती. या केळीचे दोन एकरात ४ लाख रू. झाले.

त्यानंतर याच केळीचा खोडवा घेतला. मात्र त्याला कोणतीच फवारणी, खते देऊ शकलो नाही. तरी २ एकरात १.५ लाख रू. झाले. सध्या याच केळीचा निडवा (तिसरे पीक) घेतला आहे. त्याला डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरण्यासाठी माहिती घेण्यास आलो आहे.